gangajal blog » मराठी Posts

सुंदर वृद्धत्व
गोष्ट आहे गेल्या आठवडय़ातली. माझ्याबरोबर अनेक वर्षे काम करणाऱ्या माझ्या  भूलतज्ज्ञ डॉक्टरांची मावशी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे निमित्त झाले  आणि एक-दोन दिवस घरातच खुरडत काढल्यावर वेदनेने घरच्यांना के. ई. एम.चा  आधार घ्यायला भाग पाडले. लीलावेली अम्मा के. ई. एम.मध्ये दाखल झाल्या.  एक्स-रेमध्ये खुब्याचे हाड मोडल्याचे निदान झाले. धातूचा सांधा बसविण्याची  शस्त्रक्रिया ठरली. पण आमच्या मनात धाकधूक. कारण लीलावेली अम्मांचे वय ८६  च्या पुढे. शरीर गलितगात्र. कुठे मेदाचा अंश नाही.   हात लावू तेथे फक्त हाडे आणि सुरकुतलेली कातडी. लीलावेली अम्मांना मी  भेटायला गेलो. माझी अटकळ होती- एक चिडलेली, चरफडणारी, करवादणारी, देवाचा  धावा करणारी किंवा त्याला बोल लावणारी आणि ‘सोडव रे आता’ म्हणून साद  घालणारी म्हातारी पाहावी लागणार. पण लीलावेली अम्माने माझे हसत, तोंडभरून  स्वागत केले. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण त्यांना ‘जाळं’  म्हणण्याची चूक मी करणार नाही. विधात्याने त्यांना वयपरत्वे दिलेला तो  नजराणा होता; ती त्याची कशिदाकारी होती. लीलावेली अम्मांच्या तोंडात दात  नव्हते. पण हसरं आणि निरागस बोळकं म्हणजे काय, याचा तो प्रत्यक्ष  साक्षात्कार होता. आपला सांधा मोडलाय, याचे त्यांना वैषम्य नव्हते. वेदनेची  तक्रारही नव्हती. उलट, मी काय करतो, माझ्या कामाचे स्वरूप इतर  डॉक्टरांपेक्षा वेगळे कसे आहे, हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता होती.

शस्त्रक्रियेच्या  आदल्या संध्याकाळी रक्तगट तपासणीसाठी नमुना गोळा करताना मला चार ठिकाणी  टोचावे लागले. माझे मन मलाच खंतावू लागले. पण लीलावेली अम्माने हू की चू  केले नाही. शस्त्रक्रियेत पूर्ण भूल द्यावी लागली. सांधा बसला. तिसऱ्या  दिवशी अम्मा आधाराने उभी राहिली आणि पाचव्या दिवशी घरी जाण्याची वाट पाहू  लागली. या संपूर्ण काळात मी तिला फक्त हसतानाच पाहिले. शुश्रूषेला येणाऱ्या  रेसिडेंट डॉक्टर व नर्सेसनी, जेवणखाण केले का, याची ती विचारपूस करायची.  मी जेव्हा पहिल्यांदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाषेची अडचण  येईल, असा माझा कयास होता. कारण लीलावेली अम्माचे कसदार केरळी मल्याळम् मला  अवगत नव्हते. मी इंग्रजीत माझ्या भूलतज्ज्ञ डॉक्टरांना म्हणालो, ”will  you please translate what I say?” तडफदार अभिमानित लीलावेली अम्मा  उद्गारली, ”I Know English, I can speak. …100%.”  साक्षरतेची  मिरासदारी मिरवणाऱ्या केरळच्या जनशिक्षण योजनांचा मला लख्खकन् परिचय झाला.  मग मी लीलावेली अम्माशी थेट बोलू लागलो. ती हॉस्पिटलमध्ये असताना तिला  मुद्दामहून जाऊन भेटण्याचा मला लळा लागला.

माझ्या अवतीभवती तर अनेक  वृद्धजन होते; पण असे काय होते लीलावेली अम्मात- जे तिच्या अस्तित्वाची  भुरळ इतरांवर घालत होते, याचा मी शोध घेऊ लागलो. लीलावेली अम्मा एक शानदार  वृद्धत्व जगत होती. Growing old gracefully- हे मी अनेकदा वाचले होते; पण  आज मी ते अनुभवले होते.

जे टाळता येणार नाही, ज्याच्या प्राप्तीसाठी  व्यक्तीला कोणतेही कष्ट वा विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत; ज्याला  शस्त्रक्रिया परतवू शकणार नाही; ज्याला औषधांच्या मात्रा लगाम घालू शकणार  नाही, अशी एकच गोष्ट म्हणजे- वृद्धत्व. ते गौतम बुद्धाला चुकले नाही,  महात्मा गांधींना चुकले नाही, की मदर तेरेसाला चुकले नाही. त्यांच्यात आणि  आपल्यात फरक एवढाच, की आपण जरत्वाशी समझोता करतो; त्यांनी त्याचे स्वागत  केले. या व्यक्ती पिकल्या, पण वठल्या नाहीत. उलट, जीवनप्रेरणा त्यांच्यात  खोलवर मुरल्या. ही वृत्ती आशकपणा आणि आसक्तीची नव्हती, तर कृतर्थता आणि  भक्तीची होती. आयुष्य खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे तर मागे वळून पाहावे  लागते हे खरे; पण मागे वळून पाहायचे असेल तर पुढे जात राहावेच लागते, हेही  खरे.

माशुक का बुढापा लज्जत दिला रहा है;

अंगूर का मज़ा किशमिश में आ रहा है।

असे  म्हणून जगजीतसिंग खटय़ाळपणे बुढाप्याचे वर्णन करतात आणि त्याची लज्जत  चाखण्याची सूचना देतात. खरे तर जसजशा तुमच्या हृदयाच्या धमन्या कडक होऊ  लागतात, तसतसे तुमचे मन मऊ होऊ लागतं. पण मऊपणा म्हणजे दौर्बल्य नव्हे, तर  ती इतरांना समजून घेण्याची वृद्धिंगत झालेली सहनशीलता आणि सहिष्णुता होय.  मी मुद्दामहून ‘सोशिकपणा’ हा शब्द टाळतो आहे. कारण ‘सोसण्यात’ एक प्रकारची  व्यथा दडलेली आहे, तर ‘साहण्यात’ एक आगळा आनंदानुभव आहे. Art of living is  nothing else, but learning how to grow old gracefully!  तेव्हा आलेल्या  वृद्धत्वाबद्दल तक्रार नको; गेलेल्या दिवसांबद्दल खंत नको. ‘आमच्या काळात  असे होते,’ याचा नगारा नको. ‘माझे कोणी काही ऐकतेय का?’ असा धोशा नको. आपण  फक्त प्रसन्नतेने येणारे वृद्धत्व स्वीकारायला शिकू या. कारण या तक्रारी,  ही खंत या फक्त आपल्या मनातल्या गोष्टी असतात. आणि आपण जर मनावर घ्यायचे  नाही, असा निग्रह केला तर मग कोणतीही गोष्ट शल्य म्हणून मनाला टोचत नाही.  मग शेजारचे पाटील आजोबा सचिन आणि रैनाची फटकेबाजी बघताना सी. के.  नायडूंमधून बाहेर येतात.. बेगम अख्तरची सुरावट खुलविण्याची ताकद कार्तिकी  गायकवाडमध्ये त्यांना जाणवते.. आणि स्वत:ची लॅम्ब्रेटा इतिहासजमा झाली तरी  बिट्टूची FZ-16 ‘किती मायलेज देते?’ याचे त्यांना औत्सुक्य असते. आपण जसजसे  वाढतो, तसतशी सुंदरता आपल्या आत खोलवर रुजायला.. भिनायला हवी, हेच खरे!

..उद्या  लीलावेली अम्मा घरी जाणार म्हणून मी तिला भेटायला गेलो. तिने मला आग्रहाने  घरी जेवायला बोलावले. मला आवडणारी अविअलची भाजी करण्याचा बेत ठरला.  लीलावेली अम्मा उद्गारली, ”I will cook; cooking is my hobby.” मल्याळी  प्रथेनुसार ‘शेरी’ म्हणून मी तिचा निरोप घेतला. ऑफिसच्या वाटेत आमच्या  इमर्जन्सी वॉर्डात डोकावलो. तेवीस वर्षांचा एक युवक अपघातात सापडून  अत्यवस्थ अवस्थेत दाखल झाला होता. जगण्याची शक्यता कमी होती. डॉक्टरांना  योग्य त्या सूचना देऊन मी ऑफिसात परतलो. खुर्चीवर बसताना मनात विचार आला..

Do not resent growing old,

many are denied that privilege.

डॉ. संजय ओक

sanjayoak@kem.edu

साभार- लोकसत्ता

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=94846:2010-08-20-08-54-03&catid=249:2009-12-30-13-44-34&Itemid=252

जागतिक तापमानवाढ – सद्यस्थिती, समिक्षा व उपाययोजना
नागरीकरणामध्‍ये महाराष्‍ट्राचा  देशामध्‍ये अव्‍वल नंबर लागतो. महाराष्‍ट्रामध्‍ये ४३ टक्‍यांपेक्षा जास्‍त  लोकसंख्‍या शहरी भागामध्‍ये राहते. त्‍यामुळे शहरी ‍ भागात नागरी  पर्यावरण सुविधांची उणीव भासते. वाढत्‍या लोकसंख्‍येमुळे व औद्योगिक  क्रांतीमुळे हवेतील प्रदूषक घटकांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढते आहे. आज  नैसर्गिक साधन संपत्‍तीचा वापर वाढला आहे. वाढत्‍या लोकसंख्‍येच्‍या मुलभूत  गरजा – अन्‍न, वस्‍त्र व निवारा भागविण्‍यासाठी मोठया प्रमाणावर  उद्योगधंदे सुरु झाले. इमारती, फर्निचर, इंधन व औद्योगिक उत्‍पादने या  सर्वांसाठी भरमसाठ जंगलतोड सुरु झाली. जंगलतोडीतून वनसृष्‍टी लोप पावली.  औद्योगिकीकरणात व वाहनांच्‍या संख्‍येत प्रचंड वाढ झाल्‍यामुळे कार्बन  डायऑक्‍साईड, सल्‍फर डायऑक्‍साईड यांचे प्रमाण खूप वाढत चालले आहे.  झपाटयाने होणारे नागरीकरण व औद्योगिकीकरण यांमुळे नैसर्गिक संपत्‍तीचा  मोठया प्रमाणावर वापर होऊन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. जागतिक तापमानवाढ  (ग्‍लोबल वॉर्मिग) ही एक जागतिक समस्‍या आहे. वातावरणात अस्तित्‍वात असलेले  काही वायू, पाण्‍याची वाफ, कार्बन डायऑक्‍साईड, मिथेन वायू,  क्‍लोरोफ्ल्युरोकार्बन, ट्रोपोस्‍पेरीक ओझोन आणि नायट्रस ऑक्‍साईड या  वायूंच्‍या वाढत्‍या प्रमाणामुळे ग्रीन हाऊस परिणाम जाणवत आहे. या वायूंचे  वातावरणातील प्रमाण वाढण्‍याचे करण हे मुख्‍यत्‍वे वाढते औद्योगिकीकरण व  नागरीकरणाचा ताण, ज्‍वलनशील इंधन, खनिज तेल, नि‍रनिराळे वायू, जंगलांची  जाळपोळ, जंगलांची खुंटलेली वाढ तसेच नायट्रोजनयुक्‍त खतांचा मोठया  प्रमाणावर होत असलेला वापर इ. आहे. भारतीय शेती ही पूर्णतः लहरी  निसर्गमानावर अवलंबून आहे.

हवामान बदलाचा भारतावरील प्रभाव :

वातावरणातील बदल हा पृथ्‍वीवरील  पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक विकासाला निःशंकपणे धोका आहे. वातावरणातील  बदलामुळे प्रादेशिक हवामानामधील प्रत्‍यक्ष व जैविक बदल तर झालेलाच आहे.  तथापि, त्‍याचा गंभीर परिणाम सामाजिक व आर्थिक उन्‍नतीवर होत आहे.  वातावरणातील बदलाचा जगभरातील सर्व देशांवर विपरित परिणाम होत असला, तरी  विकसित देशांपेक्षा त्‍याचा वाईट परिणाम विकसनशील देशांवर अधिक प्रमाणात  होत आहे. भारतामध्‍ये इतर विकसनशील देशांप्रमाणे वातावरणातील विचित्र  बदलाच्‍या घटना, समुद्राच्‍या पाण्‍याची वाढती पातळी, वन-जमिनीचा र्‍हास,  पाण्‍याकरिता होणारे संघर्ष, शेती व शेतीच्‍या उत्‍पन्‍नावर होणारे विपरित  बदल, आरोग्‍य व पायाभूत सुविधा इत्‍यादी परिणामांना समर्पकपणे तोंड  देण्‍यासाठी पुरेशा साधनसंपत्‍तीचा व तंत्राज्ञानाचा अभाव आहे.

हवामान बदलाचा भारतावरील संभाव्‍य प्रभाव :

भारताच्‍या ७६०० किमी. लांबीच्‍या समुद्राच्‍या पाण्‍याची वाढत असलेली पातळी.

समुद्राजवळ राहणार्‍या २०% लोकांना स्‍थलांतरीत करण्‍याची गरज आहे.

देशातील २५% लोकसंख्‍या ही वाढत्‍या वादळ वार्‍याचा व पुराच्‍या धोक्‍याचा सामना करीत आहे.

हिमालयातील ग्‍लेशिअर्स वितळत आहेत व त्‍यांचे नदीत रुपांतर होत आहे.

७०% वनस्‍पती नवीन बदलांचा स्‍वीकार करु शकत नाही.

२०,००० पेक्षा जास्‍त गावांचे वाळवंटात रुपांतर होत आहे.

शेतीच्‍या उत्‍पादनावर यांचा गंभीर प्रभाव पडला आहे.

रोगांचे प्रादुर्भाव होण्‍याचे प्रमाण वाढत आहे जसे मलेरिया.

हवामान बदल :- भारताचा प्रतिसाद

भारत सरकारने जागतिक परषिदेत घो‍षित  केल्‍याप्रमाणे विकसाची मुद्दे आणि त्‍यासंबधित हवामान बदलाच्‍या मुद्दयाचे  एकत्रिकरण करुन त्‍याची चौकट आखल्‍यास हवामानातील बदल परिणामकरित्‍या  हाताळता येतील. जी. एच. जी. (ग्रीन हाऊस गॅसेस) चे परिणाम सौम्‍य  करण्‍यासाठी व त्‍याचा स्‍वीकार करण्‍याची पध्‍दती अशा रितीने तयार करावी  की जेणेकरुन त्‍याद्वारे विकसनशील देशांना जलद आ‍‍र्थिक वाढ आणि दशलक्ष  विकासाचे उद्दिष्‍ट (Millennium Development Goals) गाठता येईल व त्‍यासाठी  पुरेशा साधनांची उपलब्‍धता करावी लागणार आहे. हवामान बदलाबाबत भारताचा  प्रतिसाद हा व्‍यापक स्‍वरुपाचा आहे. कमी प्रमाणात परंतु नियमितपणे घातक  वायूंच्या उत्सर्जनाचा आलेख मर्यादीत ठेवून विकासाची वाटचाल करण्‍यात येत  आहे. जसे बदलत्‍या जीवनशैलीचा आलेख, पुनर्वापर करण्‍यायोग्‍य उर्जेच्‍या  स्‍त्रोतांचा वापर, उर्जेच्‍या कार्यक्षमतेत सुधारणा, वाहतूक धोरणात  रेल्‍वे-रस्‍ते यांचा वापर करुन वाहतूक महामार्गाचे जाळे विकसित करणे,  मोटारवाहन वापराच्‍या धोरणात सर्वोत्‍तम आंतरराष्‍ट्रीय सुरक्षा व  उर्त्‍सजनाच्‍या कसोटींचा अवलंब करणे, ग्रामीण योजनेत आशावादी जीवन निर्माण  करणे, नष्‍ट झालेली हिरवळ पुन्‍हा प्राप्‍त करणे इत्‍यादींचा त्‍यात  समावेश आहे. भारत हे उभरते जागतिक केंद्र आहे. औद्योगिक उर्जा कार्यक्षमता,  निवासी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी इमारत बांधणी, नवीन उर्जा स्‍त्रोतांचा  शोध व त्‍यांचे पुनरुज्जीवन करुन त्‍यांचा विकास व त्‍याचे उपयोजन  करण्‍यामध्‍ये भारत एक महत्‍वपूर्ण भूमिका बजावत आहे.

ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन मर्यादीत  ठेवण्‍याकरीता आर्थिक कार्यक्रमात बदल आवश्‍यक असून त्‍याचा जनतेवर लादला  जाणारा खर्च कमी करणे आवश्‍यक आहे. भारताचे दरडोई (per capita) कार्बन  उत्‍सर्जन प्रमाण १.२ टन असून चीनचे ३.८४ टन आणि अमेरिकेचे २१.३ असे आहे.  जागतिक पातळीवर सौम्‍य उपाययोजनेबाबत अद्याप नि‍रनिराळया समित्‍यांमध्‍ये  चर्चासत्र आणि वादसंवाद चालू असून त्‍यात असे निदर्शनास आले आहे की,  भारतातील औद्योगिक क्षेत्राच्‍या वाटचालाचा आलेख हा कमी कार्बन  अर्थव्‍यवस्‍थेच्‍या दिशेने जात आहे. आऊटसोर्सिंग, तंत्रज्ञानाची  देवाणघेवाण तसेच कंपन्‍या व व्‍यवसाय ताब्‍यात घेणे, व्‍यापार इत्‍यादी  बाबी भारताचा जागतिक अर्थव्‍यवस्‍थेतील वाढता सहभाग दर्शवितात, भारतीय  कंपन्‍यांनी हवामानाशी सुसंगत / मैत्रीपूर्ण अशा तंत्रज्ञानाचा स्‍वीकार  करुन त्‍याद्वारे प्रक्रिया करुन खनिज तेलांवर असलेली अवलंबता कमी करण्‍यात  यश मिळविले आहे. स्थिर जीडीपी वाढीचा दर ८% असून उर्जेचा वापर हा ४%  पेक्षा कमी आहे.

ग्रीन हाऊस गॅसेस तंत्राज्ञानाची यादी

पृथ्‍वीच्‍या वातावरणातील कार्बन  वायूचे (ग्रीन हाऊस गॅसेस) प्रमाण कमी व प्रतिबंधीत करण्‍यासाठी योग्‍य  साधनसामुग्रीचा व पध्‍दतीचा अवलंब करणे ही ग्रीन हाऊस गॅसेस तंत्रज्ञानाची  व्‍याख्‍या करता येईल. ग्रीन हाऊस गॅसेस तंत्रज्ञानाच्‍या विकासासाठी  संभाव्‍य प्रकल्‍पाची निवड सर्वे ऑफ इनव्‍हायरोमेंटल प्रोटेक्‍शन  एक्‍सपेंडिचर आणि इनव्‍हायरोमेंटल इंडस्‍ट्री सर्वे या दोन पर्यावरणीय  संस्‍थांनी सर्वेक्षणाद्वारे केलेले आहे.

दि सर्वे ऑफ इनव्‍हायरोमेंटल  प्रोटेक्‍शन एक्‍सपेंडिचर यांनी ग्रीन हाऊस गॅसेस कमी प्रमाणात उत्सर्जित  करण्‍यासाठी योग्‍य साधनसामुग्री व पध्‍दती विहीत केलेल्‍या आहेत. दि  इनव्‍हायरोमेंटल इंडस्‍ट्री सर्वे यांनी ग्रीन हाऊस गॅसेस तंत्रज्ञानाचे एक  किंवा अधिक प्रकारचे उत्‍पादन, विक्री आणि विपणन याद्वारे मिळालेला महसूल  या आधारे माहिती गोळा करण्‍यात आली आहे.

सोलार एनर्जी

वेस्‍ट टू एनर्जी

विंड एनर्जी

स्‍मॉल, मिनी आणि मायक्रो हायड्रोइलेक्‍ट्रीसिटी

इंधन पेशी (वाहतूक आणि साधनसामुग्री)

पर्यायी इंधन तंत्रज्ञान

को-जनरेशन

मिथेन वायू संग्रहित करणे किंवा लॅन्‍डफिल ठिकाणांचा वापर किंवा शेतीचे साधने

स्‍वच्‍छ तंत्रज्ञान आणि संबंधित घटक

इतर नवीकरण उर्जा स्‍त्रोत (लाटा, सामुद्रिक औष्णिक उर्जा परिवर्तन)  उर्जेच्‍या रुपांतरासाठी व उपयोगितेसाठी आवश्‍यक इतर पध्‍दती किंवा  साधनसामुग्री

हवामान बदलाचे सौम्‍य धोरण(Strategies to Mitigate Climate Change)

हवामान बदलाच्‍या सौम्‍य धोरणात  निरनिराळया विभागाच्‍या एकत्रित कृतीचा समावेश आहे. नवनवीन उर्जा स्‍त्रोत  तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रासाठी उर्जेची उपयोगिता आणि उर्जा प्रकल्‍प  याव्‍यतिरिक्‍त वाहतूक, नागरी उडड्यन विभाग, ग्रीन बिल्‍डींग,  उपभोक्‍ताच्‍या आवडीनुसार पर्यावरणीय उपयंत्र व साधनसामुग्रीचा दर्जा या  विभागावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक आहे. मुक्‍त आणि खुले उर्जा आणि  कार्बन बाजारपेठ, भविष्‍यासाठी स्‍वच्‍छ संकेतमान्‍य तंत्रज्ञानाची गरज  तसेच हवामानाशी सुसंगत व मैत्रीपूर्ण नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास  करणे आवश्‍यक आहे. या व्‍यतिरिक्‍त पाण्‍याच्‍या वापराची उपयोगिता व उत्‍तम  व योग्‍य शेती व जंगलवाढ होणे आवश्‍यक आहे.

भारतातील उद्योगांनी सदर योजनांचा  अवलंब केल्‍यास कमी कार्बन अर्थव्‍यवस्‍थेसाठी बेडूकउडी ठरेल. भारताने या  आधीच उर्जाक्षेत्र – जीडीपी याबाबतीत यश साध्‍य केले आहे. सदर उद्दिष्‍ट हे  नॉन-कार्बन इंधन, नवनवीन आणि तंत्रज्ञानाचा व पध्‍दतीचा उद्योगधंदे, उर्जा  निर्मिती आणि वाहतूक, निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी योग्‍य धोरणांचा  अवलंब करुन गाठता येते. भारतीय उद्योग हा नेहमीच नवनवीन क्‍लृप्‍ती वा उकल  करण्‍यास कटिबध्‍द आहे.

भारताने हवामान बदलाच्या आव्‍हानांचा  समर्थपणे मुकाबला करण्‍यासाठी सौम्‍य तंत्रयोजनांचा स्विकार करणे आवश्‍यक  आहे. चिरंतन विकासाच्‍या आव्‍हानातील हवामान बदल हा महत्‍वाचा भाग आहे.

हवामान बदल – राष्‍ट्रीय कृती आराखडा

पंतप्रधानमंत्री यांनी नवी दिल्‍ली  येथे ३० जून २००८ रोजी राष्‍ट्रीय कृती आराखडा – हवामान बदलाची स्‍थापना  केली. चिरंतन विकासाकडे वाटचाल करण्‍यासाठी या योजनांची काळजीपूर्वक आखणी  करण्‍यात आली आहे. जेणेकरुन आर्थिक वाढ ही चिरंतन पर्यावरणाच्‍या विकासाने  व्‍हावी.  खालील आठ महत्‍वपूर्ण राष्‍ट्रीय योजनेचा / मंडळाचा समावेश त्‍यात करण्‍यात  आला आहे.

राष्‍ट्रीय सौर उर्जा योजना

उर्जा वापर उपयोगितेकरीता वाढती क्षमता योजना

सस्‍टेनेबल हॅबीटॅट

राष्‍ट्रीय जल संसाधन योजना

हिमालयीन पर्यावरण संतुलन

हरित भारत राष्‍ट्रीय योजना

शेतीच्‍या चिरंतन विकासासाठी राष्‍ट्रीय योजना

हवामान बदलाच्‍या माहितीचे राष्‍ट्रीय योजना

या योजनांच्‍या संबंधित माहिती  राज्‍याच्‍या महसुल व वने, उद्योग व उर्जा, शेती, ग्रामीण विकास आणि  मृदसंधारण, जल संसाधन, महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्‍याकडून  प्राप्‍त माहितीनुसारः

उद्योग व उर्जा विभागाने महाराष्‍ट्र  उर्जा विकास एजन्‍सीच्‍या माध्‍यमातून निरनिराळया मुद्दयांवर विचारविनिमय  करुन कृती आराखडा सुचविला आहे. कृती आराखडयात सुचविलेल्‍या मुद्दयांमध्‍ये –  नवीकरण उर्जा कार्यक्रम, वाहतूकीसाठी इंधन आणि औद्योगिक इंधन – बायोडिझेल /  बायोइथेनोल, योजनाकरीता ससाधनांची उपलब्‍धता, वायू उर्जा, बायोगॅस आधारीत  उर्जानिर्मिती तंत्रज्ञान, लघूश्रेणीचे हायड्रोपावर इत्‍यादी बाबींचा  समावेश आहे.

भारत सरकारच्‍या जल संसाधन विभागाने  राष्‍ट्रीय जल संसाधन योजनेअंतर्गत 6 समित्‍या गठीत केल्‍या आहेत. जसे  पॉलीसी ऍन्‍ड इस्‍टीटयुशनल फ्रेमवर्क, भूपृष्‍ट जल व्‍यवस्‍थापन, भूजल  व्‍यवस्‍थापन, घरगुती आणि औद्योगिक जल व्‍यवस्‍थापन, निरनिराळया कारणांसाठी  पाण्‍याचा योग्‍य वापर करणे, खोरे / पात्र पातळी योजना व व्‍यवस्‍थापन.  सचिव, जल संसाधन विभाग हे पॉलीसी ऍन्‍ड इस्‍टीटयुशनल फ्रेमवर्क समितीचे  सदस्‍य आहेत.

ऍग्रीकल्‍चर ऍन्‍ड ऐडीएफ विभागाने  स्‍थानिक परिस्थितीचा जसे हवामान, माती, पावसाचे प्रमाण याचा विचार करुन  दापोली, अकोला, परभणी आणि राहूरी या कृषि विद्यापीठांनी कृती आराखडा तयार  केला आहे. त्‍यानुसार कृषि विभागाने स्‍वयंचलित हवामान केंद्र, एरोसोल्‍स  इन्स्ट्रूमेंट, स्‍पोरस कांऊटिंग यंत्र तापमानकासह, पाने, किटकांमुळे  होणारी आर्द्रता मोजण्‍याचे प्रतिकृती, मृदु व्‍यवस्‍थापन आणि पिक  व्‍यवस्‍थापन या बाबी अंतर्भूत आहेत.

महसुल आणि वने विभागाने राष्‍ट्रीय  वने धोरणानुसार १९८८ साली महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या एकूण भौगोलिक जागेपैकी  ३३% जागा झाडांनी व्‍यापली होती. सद्यस्थितीत हे प्रमाण २०.१३%  इतके झाले  आहे. त्‍यामुळे वन विभागाने एकूण ३३ भौगोलिक भाग जंगलमय करण्‍यासाठी कृती  कार्यक्रम आखला आहे.

हवामानातील बदलावर मात करण्‍यासाठी  राज्‍य स्‍तरावर महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे स्‍वच्‍छ  तंत्रज्ञान कक्ष सुरु करण्‍यात आलेला आहे. या कक्षाद्वारे वातावरणातील  होणारे बदल रोखण्‍यासाठी, स्‍वच्‍छ तंत्रज्ञान विकासासाठी जनजागृती करणे,  स्‍वच्‍छ तंत्रज्ञान विकास प्रकल्‍प तयार करण्‍यासाठी स्‍थानिक स्‍वराज्‍य  संस्‍था, उद्योग व शासकीय संस्‍था यांना योग्‍य ते मार्गदर्शन व मदत  उपलब्‍ध करुन देणे, स्‍वच्‍छ तंत्रज्ञान विकास प्रकल्‍पासाठी खास निधीची  निर्मिती करणे, स्‍वच्‍छ तंत्रज्ञान विकासासाठी सर्वसंबंधीतांची क्रियाशील  भागीदारीचे जाळे तयार करणे. इत्‍यादी कार्ये करण्‍यात येणार आहेत.

जी.एन.वराडे

संचालक, पर्यावरण विभाग

महाराष्‍ट्र शासन

साभार- पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र

पर्यावरण विभाग

महाराष्‍ट्र शासन

http://envis.maharashtra.gov.in/envis_data/?q=GW_currentscenario

पर्यावरणरक्षणासाठी खारीचा वाटा. . . .
ढासळते पर्यावरण सावरण्याची इच्छा असणारी मनं आणि प्रयत्न करणारे हात यांची  संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, ही खूप प्रेरणादायी बाब आहे. ‘द ग्रीन  पॅट्रीऑट वर्किंग ग्रुप’ ही लॉस एंजेलिस इथे कार्यरत असलेली संख्या अशा  प्रयत्नवादींपैकीच एक. पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा घालण्यासाठी ते करत  असलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे त्यांनी प्रसिद्ध केलेले ‘५० सिंपल  स्टेप्स टू सेव्ह द अर्थ फ्रॉम ग्लोबल वॉर्मिग’ हे पुस्तक.   ‘हे पुस्तक लिहिण्याच्या निमित्तानं आमच्यात खूप सकारात्मक बदल झाले आणि  हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांच्याही मनात खूप बदल होतील’ अशी या संस्थेला  खात्री वाटते.

अशी खात्री बाळगायला हरकत नाही, अशी आजची परिस्थिती  नक्कीच आहे. कारण प्रत्येक माणसानं पर्यावरणरक्षणात अगदी खारीचा वाटा उचलला  तरी परिस्थिती आटोक्यात येऊ शकेल. त्यासाठी त्याला खूप मोठे प्रयत्न  करण्याचीही गरज नाही. अगदी साध्या साध्या प्रयत्नातूनही हे करता येईल. पण  यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते दृष्टीकोन बदलण्याची, सवयी बदलण्याची.  ‘चलता है’ ही वृत्ती सोडून देण्याची. ‘दुनिया इधर की उधर हो जाये, मला काय  त्याचं!’ ही आत्मकेंद्रीतता त्यागण्याची. स्वत:त असे बदल जाणीवपूर्वक घडवून  आणले तर पर्यावरणाचा प्रश्न सुटला नाही तरी चिघळणार तरी नाही. ही पायरी  गाठली की, हळूहळू प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही.

मग असे कोणते बदल  सामान्य माणसानं अंगिकारायला हवेत? खरं तर हे बदल वारंवार समाजासमोर  आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण अजून समाजसुधारणा होत नसेल, जनता त्याकडे  दुर्लक्ष करत असेल तर त्या गोष्टी पुन्हा पुन्हा समाजासमोर ठेवाव्या  लागतात. झोपी गेलेल्याला जागं होईपर्यंत गदागदा हलवत राहावं लागतं, तशातलाच  हा प्रकार आहे. त्यासाठी थोडय़ाथोडक्या नाही तर ५० टीप्स या पुस्तकात  एकत्रितपणे वाचायला मिळतात. यात जुन्या टीप्स आहेत, तशा काही नव्याही आहेत.  या टीप्स समाजानं का पाळाव्यात, त्याचा काय फायदा होईल, याचीही सविस्तरपणे  माहिती दिली आहे.

कार्बन डाय ऑक्साईड हा पर्यावरणाचा शत्रू नंबर वन.  साहजिकच टीप्सची सुरुवात होते ती ‘डिटरमाईन युवर कार्बन फूटप्रिंट’ या  लेखानं. कार्बन फूट प्रिंट म्हणजे दिवसाला आपण कार्बन डाय ऑक्साईड किती  मार्गानी वातावरणात सोडतो, याचं मोजमाप. वाहनं, एसी, इलेक्ट्रीकल  अप्लायन्सेस यांचा वापर ही काही मुख्य कारणं. इतर कारणं अनेक. हा कार्बन  डाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन बाहेर टाकणं आणि त्यायोगे समतोल राखणं, हे  झाडांचं काम. त्यामुळे परिसंस्थेत वृक्षांचं स्थान महत्त्वाचं असूनही  मानवानं झाडांवर बेलगामपणे कुऱ्हाड चालवून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून  घेतला आहे. व्यक्तिगत कार्बन एमिशन काऊंट मोजण्यासाठी www.safeclimate.net   किंवा www.carbonfund.org यासारख्या साईट्सचा उपयोग करता येईल आणि  त्याप्रमाणे उपाय करता येतील.

यासाठीसुचवलेल्या अनेक उपायातला एक अगदी  साधा उपाय म्हणजे तुमच्या वाहनाच्या चाकातील दाब तपासून घ्या. अमेरिकन  ऑटोमोबाईल असोसिएशनच्या निरीक्षणानुसार रस्त्यावर धावणाऱ्या ८० टक्के  वाहनांमधील एक किंवा अधिक चाकांमधील दाब कमी असतो. त्यामुळे त्यांना जास्त  शक्ती आणि पर्यायानं जास्त इंधन लागते. घरातले बल्ब बदलणे हाही एक अगदी  साधा उपाय. आतापर्यंत वापरत होतो, त्या बल्बपेक्षा सीएफएल (कॉम्पक्ट  फ्ल्यूरोसंट लाइटस्) वापरावे याचा आज सगळीकडेच जोरदार प्रसार केला जात आहे.  घरातून बाहेर पडतांना किंवा खोलीत कुणी नसताना दिवे बंद करा, हेही वारंवार  सांगितलं जातंय, त्याचप्रमाणे शक्य असेल तिथं नैसर्गिक उजेडाचा वापर  केल्यास, तेही अधिक संयुक्तिक ठरेल.

मांसाहाराचा आणि पर्यावरणाचाही  संबंध असतो, याबाबतीत आजही अनभिज्ञता आहे. ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये कार्बन डाय  ऑक्साईड नंबर एकवर आहे तर मिथेन दुसऱ्या नंबरवर आहे. ‘डाएट फॉर अ न्यू  अमेरिका’ या पुस्तकाचा लेखक जॉन रॉबिन्सच्या मते ५० टक्के मिथेन मानवी  कृत्यांमुळे निर्माण होतो आणि त्यापैकी ३७ टक्के पशुसंवर्धनामुळे निर्माण  होतो. मांसाहारींचे प्रमाण वाढत गेल्यामुळे मिथेनची पातळीही वेगाने वाढते  आहे. साहजिकच शाकाहारी व्हा, असा संदेश न देता, मांसाहाराला आठवडय़ातून एक  दिवस तरी फाटा द्या, असं या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. गाडीलाही कधी तरी  विश्रांती द्या. आठवडय़ातून एक दिवस गाडी बाहेर न काढता चालत जा किंवा सायकल  वापरा. सायकली तर आता गरीब लोकांचंच वाहन झालं आहे. पूर्वी विद्यार्थीवर्ग  फार मोठय़ा प्रमाणावर सायकलींचा वापर करत असे. पण आजकाल हा वर्ग  सायकलींपेक्षा स्कूटर, बाईक्सना प्राधान्य देतो. त्यामुळे वाहत्या  रस्त्यांवर गाडय़ा आणि टू व्हीलर्सचा नुसता सावळा गोंधळ असतो. याचा परिणाम  पर्यावरणावर खूप मोठय़ा प्रमाणावर झाला. त्यामुळेच एक दिवस तरी इंधनावर  चालणाऱ्या वाहनांना आराम देण्याची सूचना या पुस्तकात करण्यात आली आहे आणि  त्याची अंमलबजावणी करणं माणसाच्याच हातात आहे.

असाच आणखी एक निर्णय  माणूस अंमलात आणू शकतो तो म्हणजे गरम पाण्याचा कमी वापर करणे. पाणी  तापवणाऱ्या गिझर किंवा वॉटर हीटरमुळे कार्बन डाय ऑक्साईडची पातळी वाढते.  त्यामुळे रोज जे गार पाण्यानं आंघोळ करतात, त्यांचा प्रश्नच नाही. पण  ज्यांना रोज जमत नाही, त्यांनी निदान आठवडय़ातून एकदा-दोनदा तरी गार  पाण्यानं आंघोळ करून पाणी गरम करणे टाळले पाहिजे.

हे आणि असे अगदी  सोपे-सोपे ५० उपाय या पुस्तकात दिले आहेत. सध्या वेगवेगळ्या ‘डेज’ची फॅशन  आहे. सारी डे, रोझ डे, मदर्स डे, फादर्स डे अशा काहीच साध्य न करणाऱ्या  ‘डेज’पेक्षा काही तरी उद्देशाने हे ‘डेज’ पाळले गेले, तर ते अधिक संयुक्तिक  होईल. त्यामुळे ज्यानं त्यानं आपापल्या परीनं, आपापल्या सोयीनं ‘नो हॉट  वॉटर डे’, ‘नो कार डे’, ‘नो नॉनव्हेज डे’, ‘नो एसी डे’ असे वेगवेगळे ‘डेज’  पाळावेत आणि पर्यावरणाची ऱ्हास टाळण्याचा आणि हानी भरून काढण्याचा प्रयत्न  करावा, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.

५० सिंपल स्टेप्स टू सेव्ह द अर्थ

फ्रॉम ग्लोबल वॉर्मिग.

द ग्रीन पॅट्रीसॉट वर्किंग ग्रुप

जयको पब्लिशिंग हाऊस.

पृष्ठे : १६४, मूल्य : २५० रुपये

साभार लोकसत्ता.

http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=86446:2010-07-16-15-05-32&catid=34:2009-07-09-02-04-26&Itemid=11

वाहतूक, इंधन आणि वाहनांची कार्यक्षमता
‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ (सीएमएस) या संस्थेतर्फे हैदराबाद येथे नुकतीच  माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी ‘फ्युएल इफिशियन्सी’ या विषयावर कार्यशाळा  आयोजित करण्यात आली होती. त्यात भारतीय वाहतुकीचा प्रश्न व वाहनांच्या  कार्यक्षमतेचे वास्तव समजून घेता आले तसेच वाहतूक कोंडीबरोबरच एकूणच  वाहतुकीच्या व त्यातून उद्भवणाऱ्या प्रदूषण, आरोग्य ते कार्बन  उत्सर्जनाच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी किती प्रयत्न करावे लागणार  आहेत, याचासुद्धा अंदाज घेता आला.

पाश्चात्त्य देश, अमेरिका व जपानमधील वाहनांच्या तुलनेत भारतीय वाहनांची  स्थिती काय? विशेषत: इंधनाच्या बाबतीत त्यांची कार्यक्षमता किती आहे? वरवर  विचार केला तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपली वाहने व कार्यक्षमता कमी  असल्याचे वाटेल. प्रत्यक्षात मात्र स्थिती तितकी वाईट नाही. किंबहुना, इंधन  कार्यक्षमतेच्या दृष्टीने म्हणजेच एक लिटरमध्ये जास्त अंतर जाण्याचा हिशेब  मांडला तर अमेरिकन मोटारींच्या तुलनेत भारतीय मोटारी अधिक कार्यक्षम आहेत,  कारण त्या वजनाने हलक्या, कमी क्षमतेच्या इंजिनच्या आणि त्यामुळेच भारतीय  ग्राहकांच्या ‘काटकसरी’ पसंतीला उतरणाऱ्या आहेत. अर्थातच, आपण अमेरिकेला  मागे टाकत असलो तरी या मुद्दय़ावर जपान व युरोपच्या मोटारींना मागे  टाकण्यासाठी बरेच काही करावे लागणार आहे.

‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’  (सीएमएस) या संस्थेतर्फे हैदराबाद येथे नुकतीच माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी  ‘फ्युएल इफिशियन्सी’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात  भारतीय वाहतुकीचा प्रश्न व वाहनांच्या कार्यक्षमतेचे वास्तव समजून घेता  आले. एकीकडे सर्वसामान्य भारतीय नागरिकाचे मोटार बाळगण्याचे स्वप्न आणि  दुसरीकडे वाहनांची संख्या वाढून उभ्या राहणाऱ्या वाहतुकीच्या समस्या अशा  परस्परविरोधी गोष्टींमुळे निर्माण झालेली ‘कोंडी’सुद्धा तज्ज्ञांकडून सर्व  अंगांनी माहिती करून घेता आली. या कोंडीबरोबरच एकूणच वाहतुकीच्या व त्यातून  उद्भवणाऱ्या प्रदूषण, आरोग्य ते कार्बन उत्सर्जनाच्या प्रश्नातून मार्ग  काढण्यासाठी किती प्रयत्न करावे लागणार आहेत, याचासुद्धा अंदाज घेता आला.

वाहनसंख्या : वाढती तरीही कमीच!

देशात  स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात वाहनांची संख्या फारच थोडी होती.  अगदी १९७० पर्यंत ती केवळ १८ लाखांच्या आसपास होती. त्यानंतर १९८०पर्यंत  विशेष वाढ झाली नाही. मात्र, १९८३-८४ च्या आसपास कडक सरकारी नियंत्रण हटवून  काहीसे मुक्त धोरण अवलंबण्यात आले. त्यामुळे दुचाकी व हलक्या व्यावसायिक  वाहनांच्या निर्मितीत परकीय गुंतवणुकीला अंशत: मंजुरी देण्यात आली. त्याचा  परिणाम झाला आणि वाहनांची संख्या कितीतरी पटीने वाढून ती १९९० च्या सुमारास  २ कोटी १० लाखांवर पोहोचली. पुढे १९९० च्या दशकात आर्थिक सुधारणांच्या  पाठोपाठ ही संख्या झपाटय़ाने वाढत गेली. २००० साली ती आणखी दुपटीने वाढून ४  कोटी ९० लाखांवर पोहोचली. त्यानंतरही त्यात वेगाने वाढ होतच आहे. विशेष  म्हणजे १९९० ते २००४ या काळात देशाच्या लोकसंख्येत ५० टक्के वाढ झाली. याच  काळात वाहनांची संख्या मात्र तब्बल ४०० टक्क्यांनी वाढली. अलीकडच्या काळात  हाच वेग कायम आहे, किंबहुना त्यात वाढच होत आहे. त्याचे विपरीत परिणाम  मुख्यत: मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नईसह सर्वच बडय़ा शहरांमध्ये पाहायला  मिळत आहेत. या परिस्थितीला सामोरे जात असतानाच दुसरीकडे आणखी एक वास्तव  पाहायला मिळत आहे. ते म्हणजे भारतात लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची  संख्या जागतिक तुलनेत खूपच कमी आहे. मोटारींबाबत बोलायचे तर भारतात हजार  माणसांमागे केवळ आठ मोटारी आहेत. चीनमध्ये हा आकडा १०, श्रीलंकेत १३,  थायलंडमध्ये ३५ आहे. विकसित देशांत तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. जपानमध्ये  हजार माणसांमागे ४४१ मोटारी, ब्रिटनमध्ये ४४५, तर अमेरिकेत ४६५ आहेत.

सार्वजनिक वाहतुकीचा टक्का घटला

हे  आकडे दाखवून भारत मोटारींच्या वापराच्या दृष्टीने कसा पिछाडीवर आहे, हे  सांगितले जाते. त्याचबरोबर भारतात मोटारींची संख्या वाढविणे कसे आवश्यक  आहे, हे बोलले जाते. विशेषत: वाहननिर्मिती कंपन्यांचे प्रतिनिधित्व  करणाऱ्या सोसायटी फॉर इंडियन ऑटोमोबॉईल इंडस्ट्रिज (सियाम) या संस्थेकडून  हा मुद्दा मांडला जातो. अजूनही मुख्यत: मोटारींची विक्री होते ती  शहरांमध्येच! त्यामुळे शहरातील मोटारींच्या संख्येत आणखी वाढ झाल्यास  वाहतुकीचा काय बट्टय़ाबोळ होईल, याची कल्पना येईल. भविष्यात ही समस्या अतिशय  उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. पण असे असले तरी आजही अनेक  शहरांमध्ये खासगी वाहतूक व्यवस्था अजिबात समाधानकारक नाही. दहा लाखांपेक्षा  जास्त लोकसंख्या असलेल्या ३५ शहरांपैकी केवळ आठ शहरांमध्ये खास शहरी  प्रवासी वाहतुकीसाठी वाहिलेली स्वतंत्र बससेवा आहे. काही शहरांमध्ये अशी  बससेवा खासगी व्यावसायिकांना भाडय़ाने देण्यात आलेली आहे. यावरून सार्वजनिक  वाहतूक व्यवस्थेकडे किती लक्ष दिले जाते, याचा अंदाज येईल.

शहरांमधील  लोकसंख्येत वेगाने वाढ होत असताना त्याचा अंदाज घेऊन नागरी नियोजन होत  नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था  नागरिकांच्या गरजा पुऱ्या करण्यास सक्षम नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून  मोटारसायकली व मोटारींची संख्या वेगाने वाढत आहे. आता तर मध्यमवर्ग व  कनिष्ठ मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढल्याने त्यांची मोटारीची स्वप्ने सहजी  पूर्ण होऊ लागली आहेत. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा टक्का घटू लागला आहे. याचबरोबर बडय़ा  शहरांमध्ये दिसून आलेला आणखी एक बदल म्हणजे तेथील ‘नॉन-मोटराईज्ड  ट्रान्सपोर्ट’चे प्रमाण बरेच घटले आहे. म्हणजे एकूण वाहतुकीच्या प्रमाणात  सायकल चालविणारे, पायी चालणारे यांचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे.  परिणामी, वाढत्या मोटारी आणि त्यांच्यामुळे बाहेर पडणारा धूर व कार्बन  वायूंच्या प्रमाणातही वाढ हे पाहायला मिळत आहे. ही समस्या मुख्यत:  महानगरांमध्येच वाढत आहे. त्यामुळे हवेतील धूलिकण, नायट्रस ऑक्साईड, सल्फर  डाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांसारखे घातक वायू हवेत मिसळण्याचे प्रमाण  वाढले आहे. दिल्लीत असे वायू हवेत मिसळण्याचे प्रमाण रोज १०४६ टन इतके  जास्त आहे. या पाठोपाठ मुंबई (६६० टन), कोलकाता (२९४ टन) आणि चेन्नई (२२६  टन) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे दमा, फुफ्फुसाचे विकार, श्वसन यंत्रणेची  खराबी, कर्करोग, मेंदूचा विकास थांबणे, त्वचा-डोळय़ांचे विकार असे घातक  परिणाम पाहायला मिळत आहेत. अलीकडच्याच एका अभ्यासावरून असे पाहायला मिळाले  आहे की शहरी लोकसंख्येने खासगी वाहने न वापरता सार्वजनिक यंत्रणेचा वापर  केला तर कार्बन मोनॉक्साईडसारख्या अतिशय घातक वायूचे प्रमाण ९७ टक्क्यांनी  कमी करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे सल्फर डाय ऑक्साईड ४६.१ टक्क्यांनी कमी  होईल, तर हवेत मिसळणारा धूर २७.६ टक्क्यांनी कमी होऊ शकेल. यावरून  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व ठसठशीतपणे अधोरेखित होते. विशेष  म्हणजे भारतात वाहनांमुळे होणाऱ्या एकूण प्रदूषणापैकी ४० टक्के प्रदूषण  फक्त २० शहरांमध्ये होते. त्यामुळे या शहरांमधील व्यवस्था सुधारल्या तर  देशातील एकूण प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी करणे शक्य होईल. या प्रश्नाला  असलेला आणखी एक पदर म्हणजे कार्बन वायूंच्या उत्सर्जनात होत असलेली वाढ!  वस्तुत: भारताकडून होणारे माणशी उत्सर्जनाचे प्रमाण जागतिक तुलनेत बरेच कमी  आहे. प्रत्येक भारतीय वर्षांला सव्वा टन कार्बन वायूचे उत्सर्जन करतो.  प्रत्येक अमेरिकन माणसाचे हे प्रमाण २० टनाच्या आसपास आहे. पण लोकसंख्येचा  विचार करता वाहनांच्या संख्येत वाढ झाली तर भारताचा वाटा झपाटय़ाने  वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ही बाब भारतातील वाहतुकीची समस्या  वाढविण्यासही कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळेच यातून मार्ग काढणे अतिशय  महत्त्वाचे ठरणार आहे.

उपायांच्या दिशेने..

या परिस्थितीतून मार्ग  काढण्यासाठी काही उपाय हाती घ्यावे लागणार आहेत. कारण मोटारींच्या संख्येत  आतासारखी वाढ कायम राहिली तर ती शाश्वत वाहतूक व्यवस्थेसाठी हानिकारक असेल.  एकूणच आशिया खंडात ही स्थिती आहे. भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी इंधनाचा  दर्जा सुधारण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार, काही महानगरांमध्ये ‘भारत  २’, ‘भारत ३’ दर्जाचे इंधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे असले तरी  इंधनाच्या कार्यक्षमतेबाबत व मोटारींमुळे उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय  ऑक्साईड वायूबाबत भारताने कोणतेही भविष्यकालीन उद्दिष्ट ठरवलेले नाही.  वाहनांच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ असलेल्या, पण असे उद्दिष्ट नसलेल्या  महत्त्वाच्या तीन देशांमध्ये भारताचा रशिया व मेक्सिको यांच्या बरोबरीने  समावेश होतो. त्यामुळेच अभ्यासकांकडून काही उपाय सुचविण्यात आले आहेत.  त्यानुसार दिल्ली व एकूणच देशासाठी २०३० सालापर्यंत प्रदूषणाबाबत काही  किमान उद्दिष्टे ठरवायला हवीत. त्याअंतर्गतच देशपातळीवर व प्रत्येक  शहराच्या पातळीवरसुद्धा कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे कमाल उद्दिष्ट  ठरवून द्यायला हवे. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्याच्याशी सुसंगत धोरणे  निर्माण करून ती कालबद्ध कार्यक्रम ठरवून राबवायला हवी.

ही धोरणे तयार  करताना शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने  महत्त्वपूर्ण सुधारणा कराव्या लागणार आहेत. त्याअंतर्गत सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था, नॉन-मोटराईज्ड ट्रान्सपोर्ट आणि पर्यावरण संरक्षण व देखभाल या  तीन मुद्दय़ांकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागणार आहे.

लोकांनी खासगी  वाहनांकडून सार्वजनिक वाहतुकीकडे वळावे या दृष्टीने धोरणे ठरवावी लागतील.  त्यासाठी आधुनिक व सोयीनीयुक्त बस वाहतूक व्यवस्था विकसित करण्यास  प्राधान्य देणे, मेट्रो रेल व्यवस्थेच्या उपयुक्ततेचे परीक्षण करणे  (तज्ज्ञांच्या मते चीनचा अनुभव असे सांगतो, की मेट्रो करूनही तेथील खासगी  वाहनांची संख्या कमी झालेली नाही), इंधनाचे पुरेपूर ज्वलन होईल अशी इंजिन्स  बसेसमध्ये बसविणे, बसेस अधिक सुरक्षित व सोयीस्कर बनाव्यात म्हणून बंद  दरवाजे, कमी उंचीच्या पायऱ्या व सोयीस्कर बसथांबे तयार करणे असे उपाय हाती  घ्यावे लागतील.

नॉन मोटराईज्ड व्यवस्थेला प्रोत्साहन मिळावे म्हणून  पादचारी व सायकलींसाठी सुरक्षितठरतील अशी रस्त्यांची रचना करणे, सर्व मोठय़ा  शहरांमध्ये सायकलींसाठी स्वतंत्र लेन राखणे, पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग व  तत्सम व्यवस्था निर्माण करणे. याशिवाय पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने  उपायही हाती घ्यावे लागतील. त्याअंतर्गत स्वच्छ इंधन विकसित करणे आणि  इंधनाचा पुरेपूर वापर होईल, असे तंत्रज्ञान वाहनात वापरले जाईल यासाठी  प्रोत्साहन देणे.

हे उपाय मांडणे सोपे आहे, पण त्यांच्या प्रत्यक्ष  अंमलबजावणीसाठी इच्छाशक्ती, पुरेशी गुंतवणूक आणि आवश्यक तो पाठपुरावा करावा  लागणार आहे. हे उपाय प्रत्यक्षात आले तरच खासगी वाहनाची वाढती संख्या व  त्यांच्यामुळे वाढणारे प्रदूषण रोखणे म्हणजेच शहरातील जीवन सुसहय़ बनविणे  शक्य आहे.

इंधन बचतीचे काही उपाय

प्रत्येक वाहनचालकाने वैयक्तिक  पातळीवर काही उपाय केले तरी इंधनाची मोठी बचत शक्य आहे. भारतीय मोटारी ताशी  ४५ किलोमीटर या वेगाने चालविल्या तर कार्यक्षमता सर्वाधिक असते. वेग ताशी  ६० किलोमीटपर्यंत वाढल्यास १५ टक्के अधिक इंधन जळते. ताशी ८५ किलोमीटर  वेगाला ३० टक्के जास्त इंधन जळते. मोटारीने ताशी ४० किलोमीटरचा वेग  पकडल्यास ‘टॉप’ गियर टाकावा. विनाकारण वारंवार ब्रेक वापरू नये, एअर फिल्टर  नियमित साफ करावा, इंजिन नियमित टय़ून करावे, मोटारीला शिफारस केलेल्या  दर्जाचेच इंधन वापरावे.

मोटारींचे ‘लेबलिंग’

अनेक देशांमध्ये  मोटारींची कार्यक्षमता दर्शविण्यासाठी ‘लेबलिंग’ केले जाते. त्यात वाहनातून  बाहेर पडणारे कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण, एका लीटर इंधनात अंतर  कापण्याची क्षमता, त्याचे वजन-आकार अशा घटकांचा विचार करून मानांकन दिले  जाते. जपान, सिंगापूर, न्यूझीलंड, युरोपीय युनियन, ब्राझील, अमेरिका,  ऑस्ट्रेलिया, चीन या देशांमध्ये तशी पद्धत आहे. त्यामुळे वाहनाची नेमकी  माहिती उपलब्ध होते. त्यामुळे वाहनखरेदीचा निर्णय घेणे सोपे जाते.

अभिजित घोरपडे

साभार- लोकसत्ता.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=96853:2010-08-28-15-11-25&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13

एका आईची शताब्दी!
ती दयेची माता होती, ती कारुण्यसिंधू होती, ती भवदु:खहारी होती, ती  गोरगरिबांची, भुकेलेल्यांची माता होती. जशी असायला हवी तशीच तीही एक आई  होती. शंभर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जन्मलेल्या आणि नंतर दिगंत कीर्ती  झालेल्या या महिलेने हजारो-लाखो जिवांना धीर दिला, जगण्याचे बळ दिले.   ही आई म्हणजे अर्थातच मदर तेरेसा! २६ ऑगस्ट १९१० रोजी अल्बानियात  जन्मलेल्या मुलीचा हा प्रवासच मुळी थक्क व्हायला भाग पाडणारा आहे. भारत हा  देश या मुलीने आपला मानला आणि नंतरच्या काळात ‘मदर’ ही उपाधी सर्वार्थाने  सार्थकी लावणाऱ्या तेरेसांनी कोलकाता या शहराला आनंदनगरी ही ओळख दिली.  महात्मा गांधी यांचे नाव घेतले, की ज्याप्रमाणे भारताच्या तत्त्वज्ञानाचा  आरंभ होतो, तसेच मदर तेरेसा यांचे नाव उच्चारले, की भारताचा इतिहास जागतिक  पटलावर उभा राहतो. स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर मदर तेरेसांनी कोलकात्यात  आपल्या कामाला प्रारंभ केला तेव्हा त्यांनी भीषण दंगली पाहिल्या, हजारो  जणांना प्राण सोडतानाही  अनुभवले. अनेकांचे टाहो त्यांनी ऐकले, किंकाळय़ा  ऐकल्या. तो काळ अशांततेचा होता. फाळणीनंतर द्वेष, हिंसाचार, मारामाऱ्या  यांचे कोलकात्यावरच काय संपूर्ण देशावरच अधिराज्य होते. अशा वेळी त्यांनी  गरिबातल्या गरिबापर्यंत जाऊन काम करण्याचा निर्धार केला. आपला नेहमीचा  पोशाख बदलून त्या सफाई कामगाराप्रमाणे सुती साडी नेसून रस्त्यावर उतरल्या.  येशू ख्रिस्ताच्या डोळय़ांमध्ये जे कारुण्य दिसते, त्याचेच प्रतिरूप मदर  तेरेसांच्या ठायी आपण अनुभवले आहे. अगदी अलीकडच्या काळात प्रमुख निवडणूक  आयुक्तपदावरून निवृत्त झालेले नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत  चरित्रकार! त्यांनाही तेरेसा यांनी नाही, होय करत अखेरीस चरित्र लिहायला  परवानगी दिली. त्यांनी ते लिहिले म्हणून त्यांच्यावर आधीचे निवडणूक आयुक्त  जे. एम. (जेम्स मायकेल) लिंगडोह यांच्याप्रमाणे कडवट टीकाही झाली. यावरूनही  आपल्या देशात वावरणाऱ्या जात्यंध हिंदुत्ववाद्यांची वृत्ती किती संकुचित  आहे ते स्पष्ट होते. चावलांनी एकदा तेरेसांचा उल्लेख ‘जगातली सर्वात  शक्तिशाली महिला’ असा केला, तेव्हा त्या त्यांना म्हणाल्या, ‘मी खरोखरच तशी  असते तर मी जगात शांतता प्रस्थापित करू शकले असते.’ चावलांनी त्यांना  मुलाखतीसाठी बराच आग्रह केला, तेव्हा त्यांनी ते प्रश्न बाजूला करून  म्हटले, की आता मला निघायला हवे. तुम्ही  आमच्या असंख्य ‘घरां’ना भेटी  दिल्या असतील, तिथे आमच्या ‘सिस्टर्स’ अशाच पद्धतीच्या साडय़ा नेसून काम  करताना तुम्ही पाहिलेही असेल, त्या साधे जेवण घेतानाही तुम्ही पाहिले असेल,  पण मदर तेरेसा सगळीकडे कुठे असतात, तरीही काम चालतेच. आम्ही गरिबातल्या  गरिबाच्या सेवेत मग्न आहोत, तोपर्यंत या कामाला काही कमी पडणार नाही.’ आपण  आणि आपले काम यापलीकडे काहीही न पाहणाऱ्या मदर तेरेसा यांनी आपल्याला  रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि त्यासाठी रांगेत उभे राहून वेळही काढावा  लागतो, असे प्रख्यात ज्येष्ठ पत्रकार खुशवंतसिंग यांना सहज म्हटले, तेव्हा  खुशवंतसिंगांनी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहून मदर  तेरेसांना रेल्वेचा संपूर्ण देशाचा पास देण्याविषयी कळवले. त्यावर इंदिरा  गांधींनी त्यांना विमानाचा पास काढून दिला. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा  प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा  असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा बकवास होता. आपण कोणतेच  सामाजिक कार्य करायचे नाही आणि जे कोणी ते करत असतील, त्यात मोडता  घालायचा, ही वृत्तीच याही ठिकाणी दिसली आहे. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून  म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले  हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे  सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.  कोलकात्याच्या आणि लंडनच्या रस्त्यावर उभे राहून त्यांनी आपल्या  अनाथालयासाठी भाजीपाला आणि अन्नधान्य यांची अक्षरश: भीक मागितली आहे.  कोलकात्यातच रामकृष्ण मिशनने यासारखे काम केले आहे, पण अशा कामांना स्वत:ला  वाहून घेणाऱ्या संस्था फारच रोडावल्या आहेत. आज तर त्यांची संख्या नगण्य  वाटावी अशीच आहे. मदर तेरेसांनी गरिबीला उघडय़ावर संसार करण्यापासून रोखले  आणि आपल्या घरात आणून ठेवले. सर्वसाधारण मनुष्यस्वभाव हा जास्तीत जास्त  मिळवायच्या मागे लागलेला असताना, त्यांनी समाजासाठी सर्वस्व पणाला लावले  होते. जो दारिद्रय़ात आहे, ज्याला कुणीही नाही, जो मृत्यूचीच वाट पाहतो आहे,  अशांना त्यांनी आधार दिला आणि त्यांचे जीवन आणि मरणसुद्धा त्यांनी सुसहय़  बनवले. अनेक अंधांना शारीरिकदृष्टय़ा नसले तरीही त्यांनी डोळस केले. ही  त्यांची जादूविद्या नव्हती, त्यांच्यातल्या माणुसकीचा तो सर्वोच्च गुणधर्म  होता. रस्त्यावर टाकून दिलेल्या, कचराकुंडीत सोडून दिलेल्या हजारो जिवांना  त्यांनी ‘आयुष्यमान भव!’ हा आशीर्वाद दिला, त्याचे जीवन सुखावह केले. अनेक  मरणासन्न जिवांना काळाच्या तावडीतून सोडवून त्यांनी पुनर्जन्म दिला. तो जो  कुणी आहे, त्याचा धर्म कुठलाही असो, त्याला त्याच्या धर्माप्रमाणे शांतताही  लाभू दिली. ज्यांनी आयुष्यातही कधी अंघोळ पाहिली नाही, अशांना हाताने  स्पर्श करून त्यांनी अंघोळ तर घातलीच, पण त्यांच्या जखमाही धुतल्या. तो वा  ती यांच्यापैकी कुणी यातनांनी विव्हळलेच तर ‘सॉरी’ या शब्दांनी त्यांना धीर  दिला. त्यांना ताजेतवाने बनवले. ‘एचआयव्ही’बाधितांनाही त्यांनी हे जीवन  सुंदर असल्याचा साक्षात्कार घडवला. कुष्ठरोगी आणि असंख्य रुग्णांची त्यांनी  केलेली सेवा ही अपूर्व अशीच होती. या अशा अनेक जिवांसाठी त्याही वणवण  भटकल्या. त्या म्हणतात, की मी हिंडले हे ठीक आहे, पण मी तशी हिंडले नसते तर  मला त्यांची ही व्यथा कशी समजली असती? १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल  पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब  देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की आपल्याला दिव्यांच्या लखलखाटात  जायला अजिबात आवडत नाही. अशा समारंभातून जाऊ लागलो तर आपले काम बुडणार आहे,  याचे भान मात्र त्या बोलून दाखवत. कोणत्याही कार्यक्रमाला जायचे तर  त्यांची साधी मागणी साबणाच्या ३०० वडय़ा आणि ३०० साडय़ा यांची असे.  अनेकांच्या फाटक्या लक्तरांना त्यांनी ऊब लाभू दिली. ‘गांधी’ चित्रपटात  अशाच एका लक्तरे ल्यायलेल्या महिलेच्या दिशेने आपल्या खांद्यावरच्या पंचाला  सोडून देणाऱ्या गांधीजींइतकाच भावविवश करणारा हा भाग आहे. मदर तेरेसा  धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी १९८२ मध्ये  पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून  आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वत:  युद्धभूमीवर निर्भयतेने हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा  व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ  चॅरिटीज’चा प्रसार केला. तोपर्यंत कम्युनिस्टांना मदर तेरेसा हे या  पृथ्वीतलावरचे गूढ वाटत होते. (पश्चिम बंगालमधले डावे त्यास अपवाद होते.)  त्यांच्यापैकी कोणी त्या ‘सीआयए’च्या हस्तक असल्याचा शोध लावला नव्हता हे  आपले नशीबच! इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे  गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही  आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा  त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला. त्या वेळच्या  राजकारण्यांना जे साधले नाही ते त्यांनी करून दाखवले. आपल्या संस्थेसाठी  मदत देणारा कोण आहे, त्याने पैसा कशा पद्धतीने जमवला आहे, हे पाहात राहिलो  तर चांगल्या कामासाठी आपल्याला एक पैसाही जमवता येणार नाही, असे त्या  म्हणत. ते किती खरे असले पाहिजे असे आताची परिस्थिती पाहिली असता वाटायला  लागते. कोणत्याही युद्धाला त्यांचा महात्मा गांधींसारखाच विरोध होता. त्या  म्हणायच्या, की युद्ध हे राजकारणाचे फळ आहे. त्या शांततेच्या दूत होत्या  म्हणूनच त्या सर्वाच्या आई बनू शकल्या. त्या आईची आज शताब्दी आहे.

संपादकीय,

साभार- लोकसत्ता.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=95962:2010-08-25-15-45-43&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

महाराष्ट्रातील नद्यां होणार स्वच्छ… ३० प्रदूषित नद्यांसाठी कृती कार्यक्रम. ﻿
राज्यातील    भीमा, गोदावरी,    कृष्णा अशा    प्रमुख ३०    नद्यांचे    पाणी    प्रदूषित    असून या नद्या    स्वच्छ    करण्यासाठी    राज्य    सरकारने कृती    कार्यक्रम    आखला आहे. यात    भीमा नदीचे    प्रदूषण दूर    करण्याचे काम    येत्या तीन    महिन्यात    सुरु होणार    आहे.

कारखान्यामधून    सोडले जाणारे    दूषित पाणी,    महापालिका    आणि    नगरपालिका    क्षेत्रातून    बाहेर टाकले    जाणारे    सांडपाणी    यामुळे    राज्यातील ३०    नद्या    प्रदूषित    झाल्या आहेत.    देशातील अनेक    प्रमुख नद्या    प्रदूषणाच्या    विळख्यात    सापडल्या    असून त्या    नद्याचे    प्रदूषण नष्ट    करण्यासाठी    केंद    सरकारच्या    राज्य    सरकारच्या    मदतीने कृती    कार्यक्रम    आखला    आहे.

यात    राज्यातील    प्रमुख    नद्यांचे    पाणी स्वच्छ    करण्यासंदर्भात    मुख्य सचिव जे.    पी. डांगे    यांच्या    अध्यक्षतेखालील    मंगळवारी    मंत्रालयात    बैठक झाली.    नद्यांचे    प्रदूषण नष्ट    करण्यासाठी    केंद सरकार ७५    टक्के तर    राज्य सरकार    २५ टक्के निधी    देणार आहे.    वर्षभरात हा    कृती    कार्यक्रम    राबवायचा    असून या    कार्यक्रमांची    सुरुवात भीमा    नदीपासून    करण्यात    येणार    आहे.

नद्या    स्वच्छ    करतानाच    भविष्यात या    नद्या    प्रदूषित    होणार नाहीत,    यासाठी    संबंधित    महापालिका,    नगरपालिका    यांच्यावर    कायदेशीर    बंधन    घालण्यात    येणार आहेत.    तसेच    महापालिका    आणि    नगरपालिका    क्षेत्रातील    दूषित पाणी    नदीत सोडणारे    कारखाने    यांच्यावरही    कठोर कारवाई    करण्यात    येणार आहे.    प्रदूषण    करणाऱ्यांवर    कारवाई    करण्यास    दिरंगाई    करणाऱ्या    संबंधित    अधिकाऱ्यांवरही    कारवाई    करण्यात यावी,    असे आदेश    मुख्य सचिव जे.    पी. डांगे    यांनी दिले    आहेत.

साभार- महाराष्ट्र टाइम्स

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429175.cms

जयराम रमेश यांचा दणका
देशाची    आर्थिक    प्रगती    घडविण्याच्या    मार्गातला    पर्यावरण हा    एक उपदवी    मुद्दा आहे    असे    मानणाऱ्यांना    केंदीय    पर्यावरण    मंत्री जयराम    रमेश यांनी एक    जोरदार द

णका    दिला आहे. वन    संवर्धन    कायदा, वन हक्क    कायदा आणि    पर्यावरण    रक्षण कायदा    या सर्वांना    धाब्यावर    बसवून    ओरिसाच्या    नियामगिरी    हिल भागात    बॉक्साईटची    खाण सुरू    करण्याच्या    प्रयत्नात    असलेल्या    वेदान्त या    बहुराष्ट्रीय    कंपनीला तसेच    ओरिसा    सरकारला    त्यांनी ही    खाण सुरू    करण्याची    परवानगी    देण्यास    सपशेल नकार    दिला आहे.    देशाला    आथिर्क    महासत्ता    करायचे    असल्यामुळे    कारखानदारी,    औद्योगिकीकरण,    विमानतळे,    महामार्ग    बांधणे हे    आवश्यक झाले    आहे, पण ते    करताना    पर्यावरणाकडे    दुर्लक्ष    केले तरी    चालेल, असे    म्हणणाऱ्यांना    केंदीय    पर्यावरण    खात्याने या    नकाराद्वारे    चांगलाच दणका    दिला आहे. याचा    अर्थ    पर्यावरण    खात्याचा    सर्व विकास    प्रकल्पांना    विरोध आहे असे    नव्हे. कारण    जमिनीतील    खनिज संपत्ती    मिळविल्याशिवाय    आणि कारखाने    सुरू    केल्याशिवाय    देशाची    आथिर्क    प्रगती होणार    नाही. पण ते    करताना    पर्यावरणाचा    विचार टाळता    येणार नाही.    युरोपने    गेल्या शतकात    पर्यावरणाचा    विचार न करता    आपली    औद्योगिक    प्रगती साधली.    पण त्याचे    दुष्परिणाम    जाणवू लागताच    जागतिक    पर्यावरणाच्या    रक्षणासाठी    पुढाकार    घेतला.    त्यासाठी    मोठी    गुंतवणूक    करून संशोधन    केले.    त्यांच्या    अनुभवावरून    शहाणे होऊन    भारताने    पर्यावरणविषयक    कायदे केले    आहेत. ते पाळणे    अत्यंत    जरुरीचे आहे.    हे कायदे    म्हणजे    प्रगतीच्या    मार्गातील    अडथळा आहे, असा    प्रचार होतो.    तो ऱ्हस्व    दृष्टीचे    द्योतक आहे.    मुळात    पर्यावरण    कायद्यात    आदिवासी व    वनवासींच्या    जंगलात    राहण्याच्या    हक्काचा    संकोच    करण्यात आला    आहे आणि    देशातील ७३    टक्के वनजमीन    औद्योगिकीकरणासाठी    राखून    ठेवण्यात आली    आहे, असा    पर्यावरणवाद्यांचा    आक्षेप आहे. पण    हा आक्षेप    डावलून हा    कायदा    संसदेने संमत    केला आहे.    त्यामुळे    मुळातच    वनवासींचे    वनावरील हक्क    कमी केले गेले    आहेत. अशा    अवस्थेत    त्यांचे जे    काही हक्क    आहेत ते    वेदान्त आणि    ओरिसा    सरकारने    राखून मग    प्रकल्पाला    हात घालणे    आवश्यक होते,    पण हे उरले    सुरले वनवासी    हक्कही    नाकारून हा    प्रकल्प पुढे    रेटण्याचा    प्रयत्न    करण्यात येत    होता. त्याला    पर्यावरण    खात्याने    आक्षेप घेतला    यात गहजब    करण्यासारखे    काही नाही.    पर्यावरण    खात्याने असे    केले नसते तर    आपल्या    कर्तव्याकडे    कानाडोळा    केला असे झाले    असते. एवढेच    नाही तर    याबाबत जैविक    बहुविधतेसंबंधीच्या    रिओ    आंतरराष्ट्रीय    कराराचा आणि    संयुक्त    राष्ट्रांच्या    वनसंरक्षणासंबंधीच्या    शिफारसी    मोडल्याचा    ठपका आला असता.    ओरिसातील    प्रकल्प    उभारताना    पर्यावरणाकडे    दुर्लक्ष    करण्याच्या    वेदान्तच्या    या    प्रवृत्तीवर    याआधी    ब्रिटिश    सरकारनेही    ताशेरे ओढले    आहेत.    त्यामुळे    केंदीय    पर्यावरण    खात्याने    वेदान्तला    बॉक्साईटच्या    खाणीची    परवानगी    नाकारून आपले    राष्ट्रीय व    आंतरराष्ट्रीय    कर्तव्य पार    पाडले आहे.    वेदान्तला    पर्यावरणीय    संमती    देण्यासाठी    पर्यावरण    खात्याने    नियोजन    मंडळाचे एक    सदस्य एन. सी.    सक्सेना    यांच्या    नेतृत्वाखाली    एक समिती    नेमली होती. या    समितीने    खाणीच्या    जागेची पाहणी    करून, या    भागातील    आदिवासी व    ग्रामसभा    यांच्याशी    चर्चा करून    याबाबतचा    अहवाल तयार    केला आहे.    अहवालात या    भागातील    जैविक    बहुविधतेवर    होणारा    दुष्परिणाम,    या भागात    राहणारे    डोंगरिया आणि    कुटिया कोंढ    आदिवासी    जमातींचे    येथील    वनसंपत्तीवर    अवलंबून    असणारे    दैनंदिन जीवन,    वनांवर    त्यांचा    असणारा हक्क    यांचे कसे    उल्लंघन होत    आहे याचे    विस्तृत    विवेचन केले    आहे. असे असले    तरी    वेदान्तला    त्याबद्दल    दंड आकारून    परवानगी    द्यावी असे    ओरिसा    सरकारातील    काही लोकांचे    म्हणणे होते.    याचा अर्थ,    पर्यावरणविषयक    कायदे मोडा    आणि दंड भरून    मोकळे व्हा    असा झाला असता.    महाराष्ट्रासह    देशात अनेक    ठिकाणी विकास    प्रकल्पांची    आखणी करण्यात    येत आहे, पण ते    करताना    पर्यावरणाचा    विचार दुय्यम    मानण्यात येत    आहे. मग तो नवी    मुंबईतील    विमानतळाचा    प्रश्ान् असो    की, पश्चिम घाट    प्रकल्प असो.    बहुतेकांची    अशी धारणा    झाली आहे की,    आथिर्क    विकासाचा वेग    वाढवायचा    असल्यामुळे    पंतप्रधान    पर्यावरणाकडे    दुर्लक्ष    करून या    प्रकल्पांना    मंजुरी    मिळवून देतील.    पण    पंतप्रधानांचे    हात    कायद्याने    बांधले गेले    आहेत.    पर्यावरणाचा    अजिबात विचार    न करता    प्रकल्पांना    मंजुरी    द्यायची असेल    तर त्यांना    आधी पर्यावरण    खाते रद्द    करावे लागेल.    एवढेच नाही तर    पर्यावरणाबाबतचे    आंतरराष्ट्रीय    कायदे    केराच्या    टोपलीत    टाकावे    लागतील. तसे    काहीही    होण्याची    शक्यता नाही    आणि विकास    प्रकल्पांची    आखणी करताना    पर्यावरणाला    डावलता येणार    नाही, हाच    जयराम रमेश    यांच्या या    निर्णयामागचा    संदेश आहे.

संपादकीय,

साभार- महारष्ट्र टाइम्स

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429484.cms

सिंधूचा प्रकोप
पाकिस्तानात सिंधू नदीला आलेला पूर आता ओसरत असला, तरी या पुरामुळे झालेले  नुकसान भरून निघायला किमान वर्षभराचा काळ जावा लागेल. सर्वार्थाने अपयशी  (फेल्ड स्टेट) ठरलेल्या पाकिस्तानला सुमारे महिनाभर कायम राहिलेल्या या  पुराने मोठा धक्का दिला. उत्तरेच्या वायव्य सरहद्द प्रांत अर्थात खैबर  पख्तुनख्वा प्रांतापासून ते थेट दक्षिणेला सिंधपर्यंत पाकिस्तानच्या सर्वच  भागाला या पुराने तडाखा दिला.   तब्बल सोळाशेजणांचा मृत्यू, तब्बल दोन कोटी लोकांना पोहोचलेली झळ, शेती व  पशुधनाचे झालेले नुकसान इतके मोठे आहे, की त्यांनी या देशाला आणखीच गर्तेत  ओढले आहे. गेल्या ऐंशी वर्षांतील ती तेथील सर्वात भीषण पूरस्थिती ठरली.  त्या देशाचा सुमारे २० टक्के प्रदेश पाण्याखाली गेला आहे, तर झळ  पोहोचलेल्या लोकांचे प्रमाण देशातील एकूण लोकसंख्येच्या एकनवमांश इतके  जास्त आहे. रस्ते, पूल, दळणवळणाच्या यंत्रणा कोलमडल्यामुळे पुन्हा उभे  राहण्यासाठी पाकिस्तानला मोठे दिव्य करावे लागणार आहे. पूर ओसरल्यानंतर  उद्भवणारी अन्न-पाण्याची टंचाई, पसरणाऱ्या रोगराई, पिकांचे नुकसान  झाल्यामुळे होणारी भाववाढ अशी अनेक आव्हाने आपल्या शेजाऱ्याला पेलावी  लागणार आहेत. त्याची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली आहे, की आधीच  आंतरराष्ट्रीय कर्जावर जगणाऱ्या या देशाला कर्ज फेडण्यासाठी पुन्हा मुदतवाढ  मिळवावी लागेल. अन्यथा हा देश आणखी खिळखिळा होण्याची भीती व्यक्त केली जात  आहे. तेथील आजची परिस्थिती पाहता ही भीती खरीच आहे. हा पूर पाकिस्तानात  आलेला असला तरी ही केवळ त्या देशाची अंतर्गत बाब नाही. त्यामुळेच तेथील  सर्वच घडामोडींचा भारतावर होणारा परिणाम पाहता त्याकडे दुर्लक्ष करून  चालणार नाही. पूरपरिस्थितीचा फायदा घेऊन अतिरेकी संघटना आपला प्रभाव  वाढविण्यास प्रयत्नशील बनल्या आहेत. त्याचे अप्रत्यक्ष परिणाम भारतावरही  होणार आहेत. पाकिस्तानचे कमजोर सरकार, आर्थिक चणचण आणि नागरिकांपर्यंत  पोहोचण्यास आलेल्या अपयशामुळे अल् काईदा, तालिबान यांसारख्या संघटनांचे  फावले. त्यांनी मोठय़ा प्रमाणात मदतकार्यात भाग घेऊन सहानुभूती मिळवली आणि  आपले जाळे अधिक घट्ट केले, अशी चिंता अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे.  पाकिस्तानने मात्र भारताची मदत स्वीकारण्यास बराच उशीर लावला. त्याची दखल  अमेरिकेलासुद्धा घ्यावी लागली. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुराला असे अनेक पदर  असतानाच एक प्रमुख मुद्दा या पुराच्या मुळाशी आहे. तो आहे- नद्यांच्या  शोषणाचा आणि त्यामुळे होत असलेल्या अध:पतनाचा! स्थानिक पातळीवरील नद्या  असोत वा प्राचीन-प्रगत संस्कृतीला जन्म देणाऱ्या सिंधूसारख्या नद्या असोत.  एकीकडे माणसाचा भौतिक विकास होत असताना आज सर्वच नद्यांचा चेहरा अधिकाधिक  विद्रूप होत चालला आहे. सिंधूसुद्धा त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.  सिंधूला आलेल्या पुराला पाऊस कारणीभूत आहेच, पण त्याच्यामुळे झालेल्या  हानीमध्ये मोठा वाटा आहे तो या नदीला पडलेल्या अतिक्रमणांच्या विळख्याचा!  नदीच्या पात्रात घरे, रस्ते, पूल बांधण्यात आले. नदीला या वर्षी जास्त पाणी  आले आणि या पाण्याने केवळ आपला जुना मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला.  त्याचाच परिणाम म्हणून आसपासच्या प्रदेशाला पुराचा फटका बसला. लोकांची  घरेदारे वाहून गेली आणि त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली.  पाकिस्तानातील एका कवीने या बदलाचे वर्णन करताना, हा सारा ‘सार्वत्रिक हाव  आणि नदीवरील अत्याचारा’चा परिणाम असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे वर्णन  नदीबाबत बरेच काही सांगून जाणारे आहे. भारत-पाक यांच्यात १९६० साली  झालेल्या सिंधू नदीच्या पाणीवाटप करारावरून पाकिस्तानात सध्या भारतविरोधी  प्रचार सुरू आहे. सिंधूचे भारतातून येणारे पाणी अडवून किंवा कधीही सोडून हा  देश पाकिस्तानात दुष्काळ व पूर घडवून आणू शकतो, असा बागुलबुवासुद्धा या  संघटनांनी उभा केला आहे. प्रत्यक्षात मात्र भारताने पाकिस्तानविरुद्ध  युद्धाच्या वेळीसुद्धा सिंधू कराराचे पालन केलेले आहे. त्यामुळे ही भीती  निर्थक आहे आणि पुरामागे खरे कोणते कारण आहे, हे या कवीच्या वक्तव्यावरून  स्पष्ट होते. सिंधू नदीने हडप्पा, मोहंजोदारो यांसारख्या अतिशय प्रगत व  प्राचीन शहरांना आकार दिला. तिचे हे बदललेले रूप आजच्या पर्यावरणाच्या  स्थितीचे चपखल उदाहरणच आहे. सिंधू संस्कृतीच्या काळापासून म्हणजेच सुमारे  साडेपाच हजार वर्षांपासून आपल्याला या नदीची महती माहीत आहे. त्याआधीसुद्धा  तिच्या खोऱ्यात अश्मयुगीन संस्कृती नांदल्याचे अवशेष सापडले आहेत. सिंधू  संस्कृतीत आढळणारी नियोजनबद्ध शहरे, धान्याची कोठारे, तेथील पाण्याची  व्यवस्था, यामुळे तर या नदीच्या काठी किती गौरवशाली संस्कृती नांदली हेच  पाहायला मिळाले. अर्थात, त्याला कारणसुद्धा सिंधू नदीच ठरली. पुढे ऐतिहासिक  काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंतही ही नदी पाकिस्तानच्या शेतीचा आणि  अन्नधान्य उत्पादनाचा कणा ठरली आहे. तेथील पंजाब व सिंध प्रांतांत असलेल्या  मैदानी भागाला सुजलाम् करण्याचे कामही याच नदीच्या पाण्याने केले आहे.  सिंधू संस्कृतीच्या काळापासून या नदीच्या खोऱ्यात कालवे काढण्यास सुरुवात  झाली. त्यानंतर मुघल काळात, ब्रिटिशांच्या काळात आणि पुढच्या काळात  पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही धरणे बांधून तेथील कालव्यांचे जाळे अधिक घट्ट  करण्यात आले. कापूस, ऊस, गव्हासारख्या पिकांच्या बाबतीत पाकिस्तान  स्वयंपूर्ण बनला आहे तो सिंधू नदीच्या जोरावरच! याशिवाय अनेक अवजड उद्योग  आणि शहरांना पाणी पुरवून विकसित करण्यासही याच नदीने हातभार लावला आहे. या  अर्थाने सिंधू ही पाकिस्तानची जीवनरेखा आहे. तिबेटमधून उगम पावल्यानंतर ती  लेहमार्गे पाकिस्तानच्या गिलगिट प्रदेशात प्रवेश करते. ती पाकिस्तानात  वाहात असली तरी तिला मुख्यत: पाणी मिळते ते भारतामधूनच! पाच नद्यांचा  प्रांत असलेल्या पंजाबातून तिला झेलम, चिनाब, सतलज, बियास, रावी या पाच  नद्या मिळतात. ती पाकिस्तानच्या सर्वच प्रांतांना स्पर्श करत तब्बल तीन  हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापून कराचीजवळ अरबी समुद्राला मिळते.  पाकिस्तानची ही जीवनदायिनी या वर्षी का कोपली? नदीला आलेल्या पुराची  तीव्रता तिच्या पात्रातील अतिक्रमणांमुळे वाढली खरी, पण पुराला जागतिक  हवामानाचे आणि त्यात झालेल्या बदलांचे संदर्भ आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान,  चीन व लेहमध्ये आलेल्या पुराशीही संबंध आहे. जागतिक तापमानात होणारी वाढ ही  आताची मुख्य समस्या ठरली आहे. त्याला सिंधू नदीवरही विपरीत परिणाम होणार  असल्याची भीती ‘जागतिक वन्यजीव निधी’च्या अलीकडच्या अहवालात व्यक्त करण्यात  आली आहे. तापमानवाढीमुळे सिंधूच्या उगमाजवळ असलेल्या हिमनद्या वितळून या  नदीला मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होईल. त्याचा परिणाम या नदीवर होईल,  अशी ही भीती आहे. पण त्याचवेळी काही हवामानशास्त्रज्ञांनी, तापमानवाढीमुळे  मान्सूनचे वर्तन बदलेल आणि त्याचा या नदीच्या प्रवाहावर परिणाम होईल, असे  म्हटले आहे. तापमानात वाढ होईल तशी आतापर्यंत कोरडय़ा असलेल्या भारताच्या  लडाख, तसेच पाकिस्तान व चीनच्या अशाच कोरडय़ा प्रदेशात जास्त पाऊस पडण्याची  शक्यता वाढेल. या वर्षी तेच पाहायला मिळाले. पाकिस्तानात सिंधूला आलेले  पूर, लेहची भयंकर  ढगफुटीची घटना आणि चीनच्या वायव्येला असलेल्या दुष्काळी  पट्टय़ात आलेले पूर ही त्याचीच उदाहरणे आहेत. आता पुढच्या काळात तापमानाची  स्थिती काय राहाते, यावर या घटनांची पुनरावृत्ती होणार की नाही हे ठरणार  आहे. जागतिक तापमानात वाढ होण्यास काही नैसर्गिक घटक कारणीभूत ठरले आहेतच.  त्याचबरोबर आता आपणही त्याला हातभार लावत आहोत. त्यामुळेच सिंधूच्या  प्रवाहात होणारे हे बदल अधिक विचार करायला लावणारे आहेत. सिंधूने प्राचीन  काळी एका प्रगत संस्कृतीला जन्म दिला, हा ठळक इतिहास आहे. पण आता हीच सिंधू  त्रासदायक व प्रकोप घडवून आणणारी ठरते आहे. जगभरातील नद्यांचा इतिहास असे  सांगतो, की त्यांच्या मार्गात व प्रवाहात पूर्वीसुद्धा नैसर्गिकरीत्या काही  बदल झाले आहेत. त्याला कधी भूकंपासारख्या घटना कारणीभूत ठरल्या आहेत, तर  कधी अचानक झालेल्या बदलांनी हे घडवून आणले आहे. नैसर्गिक बदलांना आपण फारसे  काही करू शकत नाही. पण आता आपल्या चुकांमुळे नद्या कोपत असतील तर ते  निश्चितच स्वीकारार्ह नाही. पण आज जगभरातील नद्यांचे हेच वास्तव आहे.

संपदकीय,

साभार- लोकसत्ता

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=95695:2010-08-24-15-40-18&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

सिंधूनदीच्या पूराचे अधिक फोटो पाहण्यासठी येथे क्लिक करा – http://gangajal.org.in/blog/2010/08/nature-has-started-to-show-his-power/

प्राचीन पाळंमुळांचा शोध : पुरातत्त्व विद्या
पुरातत्त्वशास्त्राचा  अभ्यासक हा अधिभौतिक संस्कृतीचा अभ्यासक असतो व त्याचे उद्दिष्ट आपल्या  शोध गरजा भागविण्यासाठी सहकारी संघटनेद्वारा मानवी समाजाने उत्पन्न  केलेल्या साधनांचा अभ्यास करणे असे असते. याचाच अर्थ वस्तुरूप  पुराव्यांवरून मानवी समाज, त्याची संघटना, त्याच्या परंपरा, त्याच्या  कल्पना याचे तंत्रज्ञान आणि त्याची आर्थिक व्यवस्था या सर्वाचा वेध घेणे  पुरातत्त्व विद्येचे काम आहे.

पुरातत्त्वीय संशोधन भारतात तरी फारसे जुने नाही. एकोणीसाव्या शतकाच्या  दुसऱ्या चतुर्थकात या संशोधनाला ब्रिटिश अमदानीत शासकीय यंत्रणेमार्फत  अलेक्झांडर कर्निहॅम यांच्या निर्देशनाखाली सुरुवात झाली. या आधीचे संशोधन  संघटित स्वरूपाचे व योजनापूर्वक आखलेले नव्हते. मात्र एकोणीसाव्या शतकाच्या  आधीही पुरातत्त्वीय अभ्यासाची गोडी भारतातील इंग्रजी अधिकाऱ्यांना लागलेली  होती. किंबहुना याचा  परिपाक म्हणून १७८४ साली एशियाटिक सोसायटी या संशोधन  संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर कॅनिंगहॅम यांच्या कालखंडापर्यंत विविध  विद्वानांनी भारतीय शिलालेख, कलात्मक वस्तू, प्राचीन स्थळे यांच्यावर   वैयक्तिकरित्या  लेख लिहून अशा तऱ्हेच्या पुरातत्त्वीय संशोधनाला आणि  अभ्यासाच्या निकडीचा पाया घातला यात शंका नाही; परंतु कॅनिंगहॅम यांच्या  काळापासून या संशोधनाला जास्त योजनापूर्वक स्वरूप असल्याने भारतीय  पुरातत्त्वीय संशोधनाने आपल्या अस्तित्वाचे शतक पुरे केले. ‘पुरातत्त्व’ हा  शब्दही भारतात अगदी अलीकडे वापरात रूढ झालेला आहे. एकेकाळी ‘पूरक  वस्तूसंशोधन’ अशी लांबलचक संज्ञा या शास्त्रासाठी वापरली जात होती.  विद्यापीठ आणि भारत सरकार यांनी मात्र आता पुरातत्त्व या संज्ञेची निश्चिती  केली असल्याने व ही संज्ञा अर्थात त्याचप्रमाणे सुटसुटीत असल्याने ती आता  जवळजवळ सर्वसामान्य झाली आहे.

पुरातत्त्व  ही संज्ञा अगदी अलीकडे रूढ झाली असल्याने तिच्या वापराचा इतिहास शोधणे  निर्थक आहे. पुरातत्त्व या संज्ञेचा इंग्रजी भाषेतील समानार्थक शब्द  ‘आर्किऑलॉजी’ (Archaeology)  हा आहे. हा इंग्रजी शब्दही मूळ ग्रीक भाषेतून  आलेला असून त्याचे दोन भाग पडतात. अर्किऑस (Archaios) या  ग्रीक शब्दाचा  अर्थ ‘प्राचीन’ (Ancient) असा होतो. त्याचेही मूळ आर्के (arche)) म्हणजे  सुरुवात (beginning) या शब्दात सापडते. दुसरा शब्द ‘लोगोस’ (logos) असा  असून त्याचा अर्थ ‘विवेचन’ (discourse) असा आहे. तेव्हा ‘अर्किऑलॉजी’ या  इंग्रजी शब्दाचा पूर्ण अर्थ ‘मानवाच्या उत्पत्तीचे विश्लेषण’ असा शब्दश:  करता येईल. येथे ‘मानवाच्या उत्पत्तीचे’ या संज्ञेचा अर्थ मर्यादित  स्वरूपात न घेता मानवी संस्कृतीचे विश्लेषण असा करणे इष्ट ठरेल. कारण  मानवाची उत्पत्ती एवढाच अभ्यास पुरातत्त्वाला अभिप्रेत नसल्याने मानवी  विकास व संस्कृ ती असे व्यापक ध्येय या शास्त्राच्या कक्षेत येते. या  मर्यादेमुळे पुरातत्त्व म्हणजे इतिहासाला पुरावा उपलब्ध करून देणारी एक  अभ्यास शाखा एवढेच संकुचित स्वरूप या संशोधनाला होते. यामुळे या शास्त्राचे  सुरुवातीच्या काळातील स्वरूप सध्याच्या त्याच्या स्वरूपापेक्षा अगदी भिन्न  दिसून येते. इतिहासाला जोड देणारा पुरावाही र्सवकषरित्या जमवावा व  अभ्यासावा अशी जाणीव या काळात नव्हती. युरोपात मध्ययुगात विशेषत: १५/१६  व्या शतकात केवळ सुंदर पुतळे अथवा उत्कृष्ट काळे किंवा रंगीत मृदभांडी  कलात्मकदृष्टय़ा निवडून वा विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवणे यापलीकडे  पुरातत्त्वाची आवड विकसित झाली नव्हती. अर्थातच हे काम केवळ श्रीमंत  वर्गापुरतेच मर्यादित होते. कारण अशा सुंदर वस्तू संग्रही ठेवणे केवळ  त्यांनाच आर्थिकदृष्टय़ा परवडत नव्हते. अशा संग्रहाला पूर्णत्व येणे कठीण  होते. कारण प्राचीन वस्तूची  निवड ही केवळ वैयक्तिक सौंदर्यदृष्टीची बाब  होती.

पुरातत्त्वाच्या व्याख्येत आणि संशोधन कक्षेत नेत्रदीपक व्यापकता  एकोणीसाव्या शतकात झाली. इतिहासकाळाच्या बऱ्याच आधी मानवी संस्कृती कोणत्या  तरी स्वरूपात अस्तित्वात होती. याची ग्वाही तत्कालीन भूविज्ञान  शास्त्रज्ञांनी व मानव वंशशास्त्रज्ञांनी द्यावयास सुरुवात केली.  एकेणीसाव्या शतकाच्या द्वितीयार्धात पुरातत्त्वविषयक नव्या जणिवांची चाहूल  लागली.

पुरातत्त्वशास्त्राची उद्दिष्टे

१) केवळ  इतिहास उभा करणे वा कलात्मक वस्तूंचा अभ्यास करणे अथवा विशिष्ट मानवी  वंशाचा वा वर्गाचा अथवा एखाद्याच भूप्रदेशाचा अभ्यास करण्याचे संकुचित   ध्येय आता राहिले नाही. त्यामुळे विशाल मानवी समाजाच्या संपूर्ण  अस्तित्वाच्या विकासाचा आणि त्या विकासाला वा अधोगतीला कारणीभूत ठरलेल्या  सर्व पुराव्यांचा अभ्यास करणे हे ध्येय पुरातत्त्वशास्त्राने विसाव्या  शतकात पुढे ठेवल्याने या शास्त्राच्या कक्षा आता सबंध मानवी समाजाच्या  इतिहासाशी एकरूप झाल्या आहेत.

२) पुरातत्त्वज्ञ हा प्रामुख्याने  वस्तुनिष्ठ पुराव्यावर भर देतो. कारण यावरून प्राचीन मानवी जीवन कसे होते  याचे चित्रण करता येते. इतिहास प्रामुख्याने राजकीय घटकांवर भर देतो.  सर्वसामान्यांचे जीवन कसे होते याची दखल इतिहास फारसा घेत नाही. शिवाय  इतिहास हा लिखित पुराव्यावरच बहुतांशी अवलंबून असल्याने या आधीच्या काळातील  मानवी जीवनाचे चित्रण त्यामध्ये क्वचित सापडते. याउलट इतिहास पूर्व  काळातील वस्तूरूपी पुरावा मानवाने काय केले आणि कसे केले हे सांगतो.  मानवाने आपल्याबद्दल काय लिहून ठेवले आहे हे जाणण्यापेक्षा त्याने काय काय  केले हे त्याने मागे ठेवलेल्या विविध वस्तूरूपी पुराव्यांवरून जाणण्याचा  मार्ग हे पुरातत्त्वशास्त्राचे उद्दिष्ट आहे.

३) ग्रॅहॅम क्लार्क  ‘आर्किऑलॉजी अ‍ॅण्ड सोसायटी’ या ग्रंथात म्हणतात, ‘पुरातत्त्वशास्त्राच्या  अभ्यासातून मानवी व्यक्तिमत्त्व आणि नैसर्गिक परिस्थिती यांच्या  परस्परावलंबित्वाची व्याप्ती किती होती याचा मागोवा  घेणे ही  पुरातत्त्वशास्त्राची उद्दिष्टे आहेत.’

४) पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यासक  हा अधिभौतिक संस्कृतीचा अभ्यासक असतो व त्याचे उद्दिष्ट आपल्या गरजा  भागविण्यासाठी सहकारी संघटनेद्वारा मानवी समाजाने उत्पन्न केलेल्या  साधनांचा अभ्यास करणे असे असले पाहिजे, असे ते मानतात. याचाच अर्थ वस्तुरूप  पुराव्यांवरून मानवी समाज, त्याची संघटना, त्याच्या परंपरा, त्याच्या  कल्पना याचे तंत्रज्ञान आणि त्याची आर्थिक व्यवस्था या सर्वाचा वेध घेणे  पुरातत्त्व विद्येचे काम आहे.

५) पाषाण कालखंडापासून ते तद्दन अद्ययावत  कालापर्यंतचा मानवी संस्कृतीचा इतिहास वस्तुरूप पुराव्यांवरून उभा करणे हे  पुरातत्त्वशास्त्राचे कार्य उद्दिष्ट आहे. पाषाण युगातील मानवाचा इतिहास  जाणावयाचा म्हणजे खूप मागे जावे लागते. एकेकाळी युरोपात ख्रिश्चन पाद्री  लोकांनी या जगाची उत्पत्ती इ.स.पू. ४००४ या वर्षांत झाली असे मत मांडले. ते  केव्हाच पुरातत्त्वशास्त्राने कालबाह्य ठरविले. पुरातत्त्वशास्त्र व  भूविज्ञानशास्त्र यांच्या मदतीने आता पृथ्वीची व त्याचप्रमाणे मानवाची  प्राचीनता फार मागे नेता आली आहे. कालनिश्चितीच्या नवनवीन  शास्त्रीय पद्धती शोधून काढण्यात आल्याने पूर्व आफ्रिकेत सापडलेल्या मानवी  अवशेषांचा काल आता पोटॅशियम अर्गान पद्धतीने १९ लक्ष वर्ष इतका प्राचीन  ठरवला आहे.

६) पुरातत्त्वीय पुराव्यावरून मानवी मनाचा वेध घेणे हे या  शास्त्राचे उद्दिष्ट आहे. तो तसा घेणे हे पुरातत्त्वज्ञाचे काम आहे.  पुरातत्त्वीय गतध्वनन केवळ वस्तुरूप पुरावा म्हणून खणून काढले समजणे चूक  आहे. तो मानवी समाजाचे व्यक्तिमत्त्व खणून काढतो असे म्हणणे रास्त ठरते.

७)  सर्व मानवी समाजाचा र्सवकष अभ्यास करणे हे पुरातत्त्वशास्त्राचे कार्य व  उद्दिष्ट आहे. हे काम करीत असताना अशा अभ्यासात इतर शास्त्रांची मदत घेणे  अपरिहार्य ठरले आहे. मला ती मदत मानवी इतिहासाच्या कालखंडाच्या स्वरूपाशी  निबद्ध असते. ज्या काळातील इतिहासलिखित पुराव्यांवरून जाणता येते त्या  काळाच्या अभ्यासात भाषाशास्त्रज्ञांची व लिपितज्ज्ञांची मदत घेणे अपरिहार्य  ठरते. परंतु ज्या काळात लेखनाचे ज्ञानच मानवाला नव्हते त्या काळातील  त्याचा इतिहास जाणण्यासाठी इतर शास्त्रांची मदत घ्यावी लागली हे उघड आहे.

पुरातत्त्वशास्त्राचा  मानववंश शास्त्राशी संबंध : लक्षावधी वर्षांचा गतकालीन वाटचालीचा मागोवा  म्हणजे इतिहास, या गतकालीन वाटचालीच्या ज्या असंख्य पाऊलखुणा मागे उरल्या  त्या पाऊलखुणा म्हणजेच इतिहासाची साधने. या साधनांचा सविस्तर अभ्यास  करण्याच्या दृष्टीने इतिहासाशी संबंधित अशा अन्य दुय्यम अभ्यासशाखा विकसित  झाल्या त्यांना अनसिलियरी सायन्सेस म्हणून इंग्रजीत संबोधले जाते.  त्याचप्रमाणे गतकाळाचा मागोवा म्हणजे मानवाच्या समग्र वाटचालीचा आढावा. ही  समग्र वाटचाल म्हणजे मानवाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक व्यवहार  त्यांची कलात्मक अभिव्यक्ती, वाङ्मयीन निर्मिती व सांस्कृतिक धडपड.  मानवाच्या या सर्व कृतींचा अभ्यास करणाऱ्या स्वतंत्र अभ्यास शाखा,  अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र या स्वरूपात विकसित  झाल्या. या अभ्यासशाखा व ही सामाजिक शास्त्रे इतिहासाची सहाय्यकारी  शास्त्रे म्हणून ओळखली जातात. त्यात खालील शास्त्रांचा समावेश होतो आणि  पुरातत्त्वशास्त्राला पुढील शास्त्र सहाय्यकारी शास्त्र आहेत. (१)  शिल्लालेख शास्त्र, (२) लिपिशास्त्र, (३) नाणेशास्त्र, (४) कालगणनाशास्त्र,  (५) पुरातत्त्वशास्त्र, (६) मानववंशशास्त्र, (७) पुराभिलेखशास्त्र, (८)  भूगर्भशास्त्र, (९) मूर्तीशास्त्र, (१०) शिल्पशास्त्र, (११)  स्थापत्यशास्त्र, (१२) विज्ञानशास्त्र.

पुरातत्त्वशास्त्र व मानववंशशास्त्र संबंध : उत्खननामध्ये  सापडणाऱ्या अस्थी अवशेषांचा म्हणजेच हाडांचा  अभ्यास करून मानववंश कसा कसा  विकसित होत गेला याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला  मानववंशशास्त्र असे म्हणतात. इंग्रजी भाषेत हे शास्त्र अँथ्रॉपॉलॉजी म्हणून  ओळखले जाते. मानवीकवटीच्या अभ्यासावरून, नाकाच्या ठेवणीवरून, कपळाच्या व  हनुवटीच्या प्रकारावरून, डोळ्यांच्या खोबणीवरून मानवाचे निरनिराळे वंश या  शास्त्रात ठरविले गेले आहेत. पाच लाख वर्षांपूर्वीच्या माणसाच्या कवटय़ा चीन  या राष्ट्रात पेकिंग येथील उत्खननात तसे अग्नेय आशियातील जावा येथील  उत्खननात सापडल्या आहेत. त्यावरून या काळात माकडाचा माणूस झाला असा  निष्कर्ष मानवंशशास्त्राने काढला आहे.

उत्खननात सापडलेल्या अस्थी  अवशेषांवरून त्या काळात तेथे कोणत्या वंशाच्या लोकांची वस्ती होती याची  माहिती मानववंशास्त्राच्या सहकार्यानेच देता येते. हाडप्पा व मोहंजोदरोच्या  उत्खननात कोणकोणत्या मानववंशाच्या लोकांचे अवशेष सापडले हे या  शास्त्राच्या आधारे प्रतिपक्षिले गेले.

उदा. : सिंधू संस्कृती (१) मंगोलियन, (२) अल्पाईन, (३) पोटोअ‍ॅस्ट्रोलाईड

पुरातत्त्वशास्त्राचा विज्ञानशास्त्राशी असलेला संबंध

१)  रेडिओ कार्बन २) कार्बन १४ ही रासायनिक प्रक्रिया करून उपलब्ध झालेल्या  अस्थी अवशेषाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून उपलब्ध अस्थी  अवशेषांचे वयोमान काढण्यासाठी रेडिओ कार्बन व कार्बन १४ यांचा वापर  झाल्यामुळेच निश्चित अशी कालगणना करण्यात आली. कालगणनेसाठी  विज्ञानशास्त्राची मदत घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

भारतीय पुरातत्त्वाचा इतिहास (१७८४ ते १९०२)

भारतीय  प्राचीन अवशेषांबद्दल जास्त माहिती मिळवण्यासाठी जिज्ञासा असलेल्या काही  उत्साही विद्वानांनी १५ जानेवारी, १७८४ रोजी ‘एशियाटिक सोसायटी’ या  संस्थेची स्थपना केली. ही संस्था स्थापण्यात सर विल्यम जोन्स यांचा पुढाकार  होता आणि या संस्थेला तत्कालीन मान्यवरांचे पाठबळ लाभलेले होते. या  मान्यवरात वॉरन हेस्टिंग्ज यांचे नाव प्रामुख्याने घेतले पाहिजे. विल्यम  जोन्स आणि एशियाटिक सोसायटी स्थापन करण्यापूर्वी अनेक इतिहासकारांनी,  विद्वानांनी भारतीय प्राचीन स्मारकांचा, शैलग्रहांचा व प्राचीन शिल्पांचा  अभ्यास

करण्याचा संशोधनपर लेखनात अथवा प्रवासवर्णनात प्रयत्न केला होता  हे जरी खरे असले तरी या प्रयत्नांचे वा संशोधनाचे स्वरूप काहीसे विस्कळीत,  अद्भुत, आत्मकेंद्रित होते.

एशियाटिक सोसायटीचा उद्देश : आशिया खंडातील विविध देशांच्या इतिहासाचा, प्राचीन अवशेषांचा, कलांचा,  शास्त्रांचा, वाङ्मयांचा अभ्यास व संशोधन करणे असा असल्याचे स्पष्टपणे नमूद  करण्यात आले. मान्यवरांचा पाठिंबा व तत्कालीन इतिहास संशोधकांची जिज्ञासा  यामुळे सोसायटी थोडय़ाच काळात नावारूपाला आली. नवनवीन शोधांची माहिती  सोसायटीकडे खूप मोठय़ा प्रमाणात येऊ लागल्याने १७८८ साली सोसायटीने  ‘एशियाटिक रिसर्चेस’ नावाचे नियतकालिक सुरू केले. सोसायटीच्या सदस्यांनी व  इतर संशोधकांनी जमा केलेली माहिती लेखरूपाने या नियतकालिकातून प्रसिद्ध होऊ  लागली. उत्साही संशोधकांनी व सदस्यांनी जमा केलेल्या विविध अवशेषांचे नीट  जतन व्हावे व ते अनेकांना पाहता व अभ्यासता यावेत या उद्देशाने संस्थेने  १८१४ साली कलकत्ता या ठिकाणी वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली. याचाच परिणाम  म्हणून मुंबई व मद्रास या ठिकाणीही अशाच तऱ्हेच्या सोसायटय़ांची स्थापना  झाली. अशा प्रकारे संस्थांची स्थापना झाली तरी सभासदांना पुरातत्त्वीय  संशोधनाचे शास्त्रीय तंत्र अवगत नसल्याने सुरुवातीचे त्यांचे संशोधन केवळ  प्राचीन वाङ्मयाच्या अभ्यासापुरते मर्यादित राहिले. ताजमहाल, वेरुळ अथवा  कुतुबमिनार यांचे वर्णन एकेणीसाव्या शतकातील प्रवासी इतिहासकारांनी केले  आहे; परंतु त्यात शास्त्रीय माहितीपेक्षा सौंदर्य समीक्षण व  आश्चर्यकारकतेला जास्त प्राधान्य दिले.

फॅनिंगहॅमनंतर आलेल्या  बर्जेसच्या कारकीर्दीतही उत्खननाच्या तंत्रात फारसा बदल झाला नाही. कलेचा  इतिहास म्हणजेच पुरातत्त्वविद्या ही त्यांची प्रामाणिक समजूत होती.  बर्जेसच्या कारकीर्दीत महाराष्ट्र, सिंध, विदर्भ, मध्य प्रदेश, कच्छ,  कर्नाटक या प्रदेशातील प्राचीन अवशेषांची नोंदणी विस्तृतपणे केली गेली आणि  या अवशेषांची अचूक माहिती योग्य छायाचित्रांसह बर्जेसने प्रसिद्ध केली.  १८७६ ते १८७९ या काळात बर्जेस यांनी महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे  विस्तृत विवरण करणारा ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. बर्जेस यांच्या  कारकीर्दीत मथुरेला कंकाळी टिला या भागात १८७७-८८ च्या दरम्यान उत्खनन  करण्यात आले. या उत्खननातून अनेक जैन शिल्पे व लेख उपलब्ध झाले.

पुराणवस्तुशास्त्रज्ञ  होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे कलात्मक दृष्टिकोन, संयम, बुद्धिचातुर्य, उच्च  दर्जाची उत्कंठा, वाचन, लेखन, मनन आणि चिंतन करण्याची मानसिकता,  सूक्ष्मावलोकन, नाजूक वस्तू हाताळण्याइतपत हस्तकौशल्य, समूहात (आणि प्रसंगी  अगदी एकटय़ानं) काम करण्याची तयारी या गोष्टी हव्यातच. शिवाय उत्खननातून  एखाद्या गोष्टीचा शोध लागला तर त्यातला अवर्णनीय आनंद लुटता येण्याइतपत तो  सर्जनशीलसुद्धा असायला हवा. हे संपूर्ण शास्त्र घरापासून कुठं तरी दूर घेऊन  जाऊन कार्यरत करणार आहे हे लक्षात ठेवून आपल्याला सततच ‘आऊटडोअर’ काम  आवडणार, झेपणार आणि परवडणार आहे का, याचा नीट अंदाज घेऊनच या शाखेत प्रवेश  घ्यावा. अलीकडेच पुराणवस्तुशास्त्रात सागरी पुराणवस्तुशास्त्राच्या (Marine  Archaelogy) नव्या शाखेचा अंतर्भाव आहे. जगप्रसिद्ध ‘टायटॅनिक’ या  बुडालेल्या बोटीचं जे सागरी उत्खनन झालं ते प्रत्यक्ष पाहणं रोमहर्षक होतं.  त्याच न्यायानं आपल्या बुडालेल्या द्वारकेचं सागरी उत्खनन होऊ शकलं तर  आपल्या सुवर्णयुगाचा साक्षात्कारच होऊ शकेल. आपल्या देशात या विशेष शाखेचं  ज्ञान ‘मरीन आर्कियॉलॉजी  सेंटर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑशनोग्राफी, गोवा या  विशेष संस्थेत उपलब्ध आहे.

या शाखेतील काही निवडक संस्था

१) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव-४२५००२.

२) बेंगलोर विद्यापीठ, बेंगलोर-५६००५६.

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद-४३१००४

४) कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र- १३६११९.

५) मेंगलोर विद्यापीठ, मंगलागंगोत्री-५७४१९९.

६) एम. एस. बडोदा विद्यापीठ, बडोदा-३९०००२.

या विद्यापीठांमध्ये सोयीसुविधा आहेत.

पदव्युत्तर शिक्षणक्रम

१) अलाहाबाद विद्यापीठ, अलाहाबाद-२११००२.

२) ओस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद-५००००७.

३) मद्रास विद्यापीठ, चेन्नई- ६००००५.

४) म्हैसूर विद्यापीठ, म्हैसूर- ५७०००५.

५) आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टणम-५३०००३.

या विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत.

शिवाय  कुरूक्षेत्र, पंजाब, पटणा, विश्वभारती या विद्यापीठांमधून हे विशेष ज्ञान  प्राप्त करून घेता येईल. याव्यतिरिक्त आर्कियॉलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया,  इन्स्टि. ऑफ आर्कियॉलॉजी (२४, टिळक मार्ग, नवी दिल्ली-११०००१) या ठिकाणी  दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. काही विशिष्ट अनुभवी  विद्यार्थ्यांना या संस्थेत रु. १५०० प्रतिमासी विद्यावेतन मिळू शकते.  दिल्ली इन्स्टि. ऑफ हेरीटेज रिसर्च अ‍ॅण्ड मॅनेजमेंट (इंद्रप्रस्थ  विद्यापीठ, १८-अ, सत्संग विहार, कुतुब इन्स्टि. एरिया, नवी दिल्ली-११००६७)  या संस्थेद्वारासुद्धा दोन वर्षे कालावधीचा विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम  राबविला जातो.

कोणत्याही समाजाची सांस्कृतिक आणि नैतिक समृद्धी त्या  समाजाच्या भूतकाळातील संस्कृतीचं संकलन आणि संवर्धनावर अवलंबून असते.  आपल्या भारतवर्षांला जगात इतर कोणत्याही देशाला लाभला नाही असा हजारो  वर्षांचा सुवर्णेतिहास आहे. सुदैवाने पुनश्च भारत जगातील एक समृद्ध  सांस्कृतिक देश होण्याच्या मार्गावर आहे. संगणक शास्त्राला हाताशी धरून  आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविता येणं आता  शक्य झालं आहे. म्हणूनच केवळ धनदौलत आणि प्रतिष्ठेच्या मागे न लागता आपल्या  नव्या पिढीच्या पाईकांनी पुराणवस्तूशास्त्राचा अवलंब केला पाहिजे.  काळजातून कळ निर्माण करणाऱ्या उद्ध्वस्त करुणामय बुद्धमूर्तीना हीच असावी  आपली सुमनांजली!

ज्या विद्यार्थ्यांना फल पुरातत्त्व भारतवर्ष संस्कृती आणि भारतीय पुराणवस्तूसंशोधन या विषयात प्रावीण्य मिळवायचे असेल अशांना:

१)    पुणे विद्यापीठ, पुणे-४११००७.

२)    डेक्कन महाविद्यालय पोस्ट ग्रॅज्युएट अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टि. येरवडा, पुणे-४११००६.

३)    नागपूर विद्यापीठ, नागपूर-४४०००१.

४)    गुजराथ विद्यापीठ, अहमदाबाद-३८०००९.

५)    कलकत्ता विद्यापीठ, कलकत्ता- ७००००७३.

६)    बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी-२२१००५.

७)    छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ, कानपूर-२०८०२४.

८)    शिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर-४७४०११.

९)    एम. एस. विद्यापीठ, बडोदा-३९०००२.

१०)    राणी दुर्गादेवी विश्वविद्यालय, जबलपूर-४८२००१.

पुष्कर मुंडले

साभार- लोकसत्ता

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=94304:2010-08-18-03-33-16&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116

‘न्यू दिल्ली’चा हल्ला पर्यावरणावरचा!
‘न्यू  दिल्ली’ हे शब्द गेल्या आठवडय़ात अचानक जगभर चर्चेत आले. ते राष्ट्रकुल  स्पर्धासाठी नव्हते, भारताच्या ६४व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त किंवा इतर  कोणत्या कामगिरीसाठीसुद्धा नव्हते. या चर्चेमागचे कारण होते आरोग्य आणि  पर्यावरणाशी निगडित असलेल्या एका समस्येशी! त्याच्या मुळाशी आहे ‘न्यू  दिल्ली मेटॅलो-बी-लॅक्टोमेस १’ अर्थात ‘एनडीएम-१’ हा जनुक (जीन)!   अनेक रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंमध्ये (बॅक्टेरिया) हे जनुक आढळले.  त्याचे गुणधर्म इतके अफलातून असल्याचे समजले, की वैद्यकीय आणि औषधनिर्मिती  क्षेत्रात काम करणाऱ्या भल्याभल्यांना त्याच्याकडे लक्ष देणे भाग पडले.  काहीजणांनी या जनुकाचे वर्णन ‘सुपरबग’ असेही केले, पण असे काय होते या  ‘एनडीएम-१’ मध्ये आणि त्याची आताच इतकी चर्चा होण्याचे कारण काय?

‘एनडीएम-१’ची  खासियत अशी, की या जनुकामुळे कोणताही बॅक्टेरिया सध्या अस्तित्वात  असलेल्या प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) समर्थपणे सामना करतो आणि औषधांना  निष्प्रभ ठरवतो. त्यामुळेच या जनुकाचा सर्वत्र प्रसार झाला तर जिवाणूंमुळे  होणाऱ्या रोगांवर मात कशी करायची, ही चिंता सध्या औधषनिर्मात्यांना सतावत  आहे. या जनुकांचा उगम भारत व पाकिस्तानात झाला असल्याचे सांगितले जात  असल्याने आपल्याला तर ही समस्या अधिक गांभीर्याने घ्यावी लागणार आहे.  अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनप्रबंधात ही बाब उघड झाली. पाठोपाठ  त्याची चर्चासुद्धा सुरू झाली आहे. वरवर विचार करता हा प्रश्न वैद्यकीय  क्षेत्राशी संबंधित वाटेल, पण त्याची व्याप्ती त्याहून कितीतरी मोठी असून,  एकूणच पर्यावरणाची मोठी समस्या म्हणून ती उभी राहात आहे. विशेष म्हणजे  त्याच्या प्रसाराचा जवळचा संबंध सामान्य माणसाशी आणि त्याच्या बऱ्यावाईट  सवयींशीसुद्धा आहे.

सतत युद्ध आमचे सुरू

जिवाणू आणि माणूस यांच्यातील  संघर्ष पुरातन काळापासून सुरूच आहे. त्यांच्यामुळे माणसाला अनेक रोग  होतात. हे रोग होत असतानाच काही काळानंतर माणसात त्या जिवाणूसाठी  प्रतिकारकशक्तीसुद्धा निर्माण होते किंवा काही जिवाणूंवर मात करण्यासाठी  प्रतिजैविकेसुद्धा माणूस विकसित करतो, मात्र ही प्रतिजैविके एकदा विकसित  केली म्हणजे त्या जिवाणूच्या कारवायांवर संपूर्ण विजय मिळवला असे होत नाही.  कारण आपण काही प्रतिजैविके आणि ती वापरून औषधे विकसित केली, की  जिवाणूसुद्धा त्याच्या वैशिष्टय़ांमध्ये बदल करून घेतो. असे करण्यात ते  अतिशय पटाईत असतात. परिणामी, जिवाणू त्या औषधांना दाद देईनासा होतो.  त्यामुळे त्याच्या बदललेल्या गुणधर्मावर मात करण्यासाठी नवे प्रतिजैविक आणि  नवे औषध याची आवश्यकता भासते. हाच लढा गेली कित्येक दशके सुरू आहे आणि  पुढेसुद्धा असाच सुरू राहील. याच टप्प्यात अचानक काही वैशिष्टय़पूर्ण जिवाणू  उद्भवतात किंवा ते गुणधर्म बदलतात. त्याचा परिणाम म्हणून खूप मोठय़ा  प्रमाणावर रोगराई/ संसर्ग पसरतो, तेव्हा खूप मोठी चर्चा होते आणि ते आव्हान  पेलण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या जातात. अलीकडच्या काळात  विषाणूंमुळे निर्माण झालेल्या ‘बर्ड फ्लू’, ‘स्वाइन फ्लू’मुळे उद्भवलेली  युद्धजन्य परिस्थिती अनुभवायला मिळालीच. आता जिवाणूंमध्ये आढळणाऱ्या  ‘एनडीएम-१’ या जनुकाने असाच धुरळा उडवला आहे.

‘एनडीएम-१’ची करामत

जिवाणूंमुळे  होणाऱ्या विविध संसर्गाना रोखण्यावर व त्यावर उपचार करण्यासाठी जगभरात  सध्या सव्वाशेहून अधिक प्रतिजैविके उपलब्ध आहेत. जुन्या प्रतिजैविकांचा  प्रभाव हळूहळू कमी होत गेला, की नवी प्रतिजैविके विकसित केली जातात.  त्यांची ढाल वापरूनच जिवाणूंमुळे उभ्या ठाकणाऱ्या नव्या आव्हानांचा सामना  केला जातो. सध्या अशी सुमारे १४ प्रभावकारी प्रतिजैविके जगभरात उपलब्ध  आहेत. त्यात इमिपेनेम, सेफोटॅक्झिम, जेन्टॅमायसिन, टोब्रामायसिन,  मायनोसायक्लिन, टायगेसायक्लिन, कोलिस्टिन अशा अव्वल प्रतिजैविकांचा समावेश  आहे. ही उपलब्ध असलेली फौज वापरूनच सध्या अनेक घातक जिवाणूजन्य आजारांचा  सामना केला जात आहे. पण ‘एनडीएम-१’ हे जनुक या प्रतिजैविकांनाही दाद  देईनासे झाले आहे. त्याची ही क्षमता इतकी आहे, की १४ पैकी १२  प्रतिजैविकांना ते अजिबात जुमानत नाही. तर उरलेल्या टायगेसायक्लिन या  प्रतिजैविकाचा त्याच्यावर ६४ ते ६७ टक्के परिणाम होतो. खऱ्या अर्थाने केवळ  कोलिस्टिन या प्रतिजैविकाचीच मात्रा त्याच्यावर पूर्णपणे लागू पडते.  त्यामुळेच ‘एनडीएम-१’ला अडविण्याची एक-दोनच अस्त्रे आपल्याकडे उपलब्ध  असल्याने त्याकडे अधिक गंभीरपणे पाहावे लागणार आहे. विशेष म्हणजे  ‘एनडीएम-१’ने झटपट गुणधर्म बदलले आणि या एक-दोन अस्त्रांवरही मात केली, तर  त्याला लगाम घालण्यासाठी आपल्या हाती काहीही नसेल. म्हणूनच त्याची इतकी दखल  घेतली जात आहे.

‘एनडीएम-१’ हा जनुक सध्या तरी मोजक्याच जिवाणूंमध्ये  आढळला आहे. त्यात ई-कोलाय, क्लेब्सिएला न्यूमोनिए, एन्टोरोबॅक्टर एसपीपी,  प्रोविडेन्सिया एसपीपी, स्रिटोबॅक्टर फ्रेउंडी, मोर्गानेला मॉर्गनी अशा  जिवाणूंमध्ये आढळला आहे. तो मुख्यत: रुग्णालयांमधील संसर्ग पसरण्यास  कारणीभूत ठरत आहे. त्याच्यामुळे विशेषत: मूत्रमार्गातील व उघडय़ा जखमांचा  संसर्ग पसरतो.

‘एनडीएम-१’च्या उगमाकडे

‘एनडीएम-१’ जनुक २००८ साली  पहिल्यांदाच आढळून आले. त्यानंतर   गेल्या वर्षी स्वीडनचा एक रुग्ण  भारतातून शस्त्रक्रिया करून गेल्यावर त्याला या जनुकामुळे बाधा झाल्याचे  लक्षात आले. त्यानंतर या जनुकाबाबत सविस्तर अभ्यास सुरू झाला. मद्रास  विद्यापीठाच्या मायक्रोबायॉलॉजी विभागाचे डॉ. के. के. कुमारस्वामी  यांच्यासह ब्रिटनमधील काही संस्था आणि भारत-पाकिस्तानमधील विविध  प्रयोगशाळांच्या अभ्यासकांनी मिळून याबाबत एक शोधनिबंध प्रसिद्ध केला.  त्यासाठी भारत, पाकिस्तान व ब्रिटनमधील काही रुग्णांचे नमुने तपासण्यात  आले. त्यात भारत व पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये त्याचे अस्तित्व आढळून  आले. ब्रिटनमध्ये ज्या १७ रुग्णांमध्ये त्याचा संसर्ग आढळला. ते सर्वजण  वर्षभराच्या काळात भारतात येऊन गेले होते आणि त्यापैकी १४जण विविध  उपचारांसाठी रुग्णालयातही दाखल झाले होते. त्यामुळे या ‘एनडीएम-१’ जनुकाचा  उगम भारत-पाकिस्तानात असल्याचे जाहीर करण्यात आले. खरंतर एखाद्या जनुकाचा  किंवा जिवाणूचा उगम कोणत्या प्रदेशात आहे हे शोधून काढण्यासाठी कराव्या  लागणाऱ्या अभ्यासासाठी व्यापक सर्वेक्षण करावे लागते आणि मोठय़ा प्रमाणावर  नमुने तपासावे लागतात. त्यामुळेच या जनुकाचा उगम भारत-पाकिस्तानात असल्याचे  मानणे घाईचे ठरेल.

औषध कंपन्यांचे कारस्थान?

‘एनडीएम-१’ जनुकाची आता  सुरू असलेली चर्चा हा औषध कंपन्यांचे कारस्थान असल्याचा आरोपही केला जात  आहे. या जनुकाला जी एक-दोन प्रतिजैविके निष्प्रभ करतात, त्या  प्रतिजैविकांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पैसे देऊन हा अभ्यास करवून  घेतला, असा आरोप करण्यात येत आहे. त्यात तथ्य नसल्याचे हा अभ्यास करणाऱ्या  संशोधकांनी म्हटले आहे. त्यात किती तथ्य आहे, हे भविष्यात कदाचित पुढे  येईलच. हा वादाचा मुद्दा, तसेच या जनुकाचा उगम भारतात आहे की अन्यत्र कुठे,  अशा कोणत्याही गोष्टींमुळे या प्रश्नाचे गांभीर्य निश्चितच कमी होत नाही.  कारण काहीही असले तरी हा जनुक आपल्या अंगणात आलेला आहे, ही वस्तुस्थिती  आहे. त्यामुळे त्याला तोंड देण्यासाठी काय उपाययोजना करायची, याकडे संशोधक व  वैद्यकीय क्षेत्राकडून पुरेशी काळजी घेतली जायला हवी. इतकेच नव्हे, तर  आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही त्याच्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

(या  लेखासाठी शास्त्रीय माहिती व संदर्भ पुण्यातील राष्ट्रीय पेशीविज्ञान  संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी पुरविले आहेत.)

अभिजित घोरपडे

abhighorpade@rediffmail.com

साभार- लोकसत्ता

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=93872:2010-08-16-16-07-34&catid=96:2009-08-04-04-30-04&Itemid=108