Monthly Archives: March 2010

पाण्याचे शतक !

आज जागतिक जलदिन. जगभर विविध उपक्रमांद्वारे पाळला जाणारा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय दिवस; पण त्याचबरोबर विकासाच्या मार्गात पाण्याच्या समस्यांमुळे उभ्या ठाकलेल्या आव्हानांची आठवण करून देणारासुद्धा! या वर्षीच्या जलदिनाची संकल्पना आहे- ‘आरोग्यादायी जगासाठी स्वच्छ पाणी’. पण याबाबतच्या वास्तवाचा विचार केला तरी आपल्यासमोरील आव्हानांचा अंदाज येईल. ब्राझिलमधील रिओ-द-जनेरियो शहरात १९९२ साली पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्याचा ठराव करण्यात आला आणि १९९३ साली जगाने पहिला जलदिन साजरा केला. सध्याचे शतक पाण्याचे म्हणून ओळखले जाते, कारण विकास घडला तर तो पाण्यामुळेच घडेल आणि या प्रक्रियेत कोणता प्रमुख अडथळा आला तरी तो पाण्याशी संबंधित समस्यांचाच असेल. अशा या महत्त्वाच्या स्रोताशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाची, साधनांची देवाण-घेवाण, याबाबतचे सहकार्य-सामंजस्य घडवून आणण्याचा व्यापक प्रयत्न हा जलदिनामागचा प्रमुख हेतू! पाण्यावरून समस्या चिघळायला लागलेल्या असतानाच १९९३ पासून जलदिनाची सुरुवात हे संयुक्त राष्ट्रांचे महत्त्वपूर्ण पाऊल होते. अमेरिकादी ‘दिग्गज’ राष्ट्रांच्या अरेरावीमुळे आजच्या काळात संयुक्त राष्ट्रांचे स्थान काय, असे प्रश्न उपस्थित केले जातात. पण पाणी-आरोग्य यासारख्या मूलभूत मुद्दय़ांवरही संयुक्त राष्ट्रांकडून उत्तम पाठपुरावा केला जात आहे. जलदिन व त्याचे निमित्त साधून कायमस्वरूपी सुरू राहणारे उपक्रम हे त्याचे उत्तम उदाहरण! आजचा अठरावा जलदिन इतर वर्षी येणाऱ्या जलदिनासारखा भासला तरी त्याचे वेगळे महत्त्व आहे. कारण संयुक्त राष्ट्रांनी २००५ ते २०१५ हे ‘जल दशक’ म्हणून जाहीर करून काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. आज या दशकाच्या नेमक्या मधल्या टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत. त्यामुळेच आताची पाण्याची नेमकी स्थिती जाणून घेण्याची आवश्यक आहे. पाणी हे जीवन तर आहेच, पण आजच्या काळात प्रमुख जागतिक घटक कोणता असेल तर तोसुद्धा पाणीच! कारण आज विविध भागातील विकसित राष्ट्रे, विकसनशील राष्ट्रे किंवा अगदी दारिद्रय़ भोगत असलेल्या राष्ट्रांच्या समस्या जगभर एकसारख्या आहेत. इतकेच नाही तर पाण्यावरून काहीही घडले तरी त्याचे परिणाम अतिशय व्यापक स्वरूपाचे असतील, मग त्यावरून सामंजस्य घडून आले तरी आणि युद्धे भडकली तरीसुद्धा! ‘आरोग्यदायी जगासाठी स्वच्छ पाणी’ या संकल्पनेच्या निमित्ताने या वर्षी मांडण्यात आलेला अशुद्ध पाण्याचा मुद्दाही असाच व्यापक व जागतिक आहे. शुद्ध पाण्याच्या अभावामुळे आरोग्याचे प्रश्न सर्वत्रच वाढले आहेत. संयुक्त राष्ट्रांचा अहवाल सांगतो की जगातील एक अब्जापेक्षा अधिक लोक स्वच्छ पाण्यापासून वंचित आहेत आणि त्याच्या दुपटीहून अधिक लोकांना शौचालयांच्या सुविधा नाहीत. एकूण साडेसहा अब्ज लोकसंख्येपैकी एक-तृतीयांश लोक या समस्येला तोंड देत आहेत, यावरून या समस्येची व्याप्ती लक्षात येईल.  परिणामी दररोज सहा हजार लोक पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांचे बळी ठरतात. सर्वच विकसनशील देशांमधील सर्व प्रकारचे सुमारे ९० टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्या, तलाव, समुद्र व भूजलात सोडले जाते. अतिश्रीमंत देशांमध्येही असेच व्यापक प्रश्न आहेत. गरीब देशांमध्ये एक माणूस दिवसभरात पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, स्वच्छतेसाठी व इतर वापरासाठी जितके पाणी उपयोगात आणतो, तेवढे पाणी श्रीमंत देशातला माणूस  एका ‘फ्लश’मध्ये वाया घालवतो. यावरून पाण्याचा गैरवाजवी वापर दिसून येतो आणि पाणीवापरातील विषमताही ठळकपणे पाहायला मिळते. बदलत्या काळातील पाण्याच्या स्वरूपातील आणखी एक प्रमुख आव्हान म्हणजे पाण्याचा वाढता वापर! हा वापर केवळ लोकसंख्येच्या प्रमाणात वाढत गेलेला नाही, तर गेल्या शतकात लोकसंख्यावाढीच्या तुलनेत जगातील पाणीवापर दुपटीने वाढलेला आहे. पाण्याचा वापर अशाप्रकारे वाढलेला असतानाच, सर्वच जलस्रोत झपाटय़ाने दूषित होत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले नाही तरच नवल! त्यातच हवामानबदलाचा परिणाम म्हणून कॅनडासारख्या भल्या-भल्या देशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच आता केवळ ‘पाणी वाचवा’ या पारंपारिक उपायाने प्रश्न सुटणार नाहीत; बऱ्याच भागात पाणीच कमी असल्याने आहे ते पाणी प्रक्रिया करून वापरावे लागणार आहे. एरवी गटारात सोडले जाणारे सांडपाणी शुद्ध करून ते पिण्यासाठी वापरावे लागणार आहे. त्याला सुरुवातही झाली आहे. सिंगापूरमध्ये पिण्याच्या पाण्यात ७० टक्के पाणी हे असे शुद्ध केलेले आहे, तर इस्रायलमध्ये ते ८० टक्क्य़ांपर्यंत आहे. काल भरलेले पाणी शिळे झाले म्हणून टाकून देणाऱ्या आपल्याकडील काही महाभागांना हे वाचून कदाचित धक्का बसेल, पण पाणीप्रश्नावर हेच भविष्यातील उपाय असतील. पाण्याचे वेगवेगळ्या प्रकारे शुद्धीकरण करून ते पिण्यासाठी, शेतीसाठी किंवा शौचालयात वापरण्याच्या दर्जाचे बनविणे आणि वेगवेगळ्या प्रकारे पुरविणे हेसुद्धा भविष्यात करावे लागेल. शेतीच्या पाण्याचाही कुशलतेने वापर करण्याचे भान ठेवावे लागेल. (प्रतिहेक्टर शेतीसाठी सरासरी आठ हजार घनमीटर पाणी वापरणाऱ्या महाराष्ट्राला यातून भरपूर काही करून दाखवावे लागेल. हे प्रमाण तीन हजार घनमीटपर्यंत कमी करण्याची शिफारस डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील सिंचन आयोगाने केली आहे, पण त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही.) याहून महत्त्वाचा मुद्दा आहे तो पाण्यावरून भडकणाऱ्या संघर्षांचा! या वास्तवाबाबत ‘प्राईस वॉटर हाऊस कूपर्स कन्सल्टन्सी’पासून ते संयुक्त राष्ट्रांच्या अहवालापर्यंत सर्वानीच नुसते सूतोवाचच केलेले नाही, तर पाण्यावरून होणाऱ्या संघर्षांबाबत गंभीर व तातडीचा इशारासुद्धा दिलेला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू नदीच्या वाटपावरून असलेला वाद, भारत-बांगलादेश दरम्यान गंगेच्या पाण्यावरून असलेले मतभेद यांच्यासह जगाच्या सर्वच भागांतील नद्यांचा त्यात समावेश आहे. आफ्रिका खंडात नाईल, वोल्टा, झांबेझी, नायगर, सेनेगल या नद्यांवरून असेच पाणीवाटपाचे वाद आहेत. मध्य आशियात अमू दरिया-सिर दरिया या नद्यांवरून उझबेकिस्तान, किर्गिजिस्तान, ताजिकिस्तान हे देश झगडत आहेत. कमी पावसाच्या मध्य-पूर्वेत जॉर्डन, युफ्रेटिस, तायग्रिस या नद्या अशाच संघर्षांचे कारण ठरल्या आहेत. मध्य-पूर्वेतील संघर्षांत पाणी हा प्रमुख मुद्दा आहेच. इस्रायलने १९६७ साली आक्रमण करून बळकावलेल्या आसपासच्या प्रदेशातच त्यांचे पाण्याचे दोन-तृतीयांश स्रोत आहेत. तिथल्या वाळवंटी भागात पाणी हाच सर्वाधिक किमती स्रोत आहे. अशाप्रकारे तिथल्या संघर्षांत पाणी हेच केंद्रस्थानी आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या काश्मीरच्या वादात पाणी हा प्रमुख मुद्दा असल्याचे वेगळे सांगायला नको. पाकिस्तानातून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या पाचही उपनद्यांचा उगम भारतीय हद्दीत असल्याने ते आपल्यासाठी लष्करीदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. यामुळेच भारताकडून काश्मीरमध्ये किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाची उभारणी होते, तेव्हा पाकिस्तान आक्षेप घेतो. हीच कृती चीनकडून ब्रह्मपुत्रेबाबत होते तेव्हा भारताचा आक्षेप असतो. अशाचप्रकारे गंगेच्या पाण्यावरून बांगलादेशकडून भारताविरोधी ओरड केली जाते. पाण्यावरून वाढणाऱ्या संघर्षांना कोणत्याही प्रदेशाची मर्यादा नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, विविध देशांमधून वाहणाऱ्या जगातील २६३ सामाईक नद्यांपैकी १५३ नद्यांबाबत अद्याप पाणीवाटपाचे करार झालेले नाहीत. या नद्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण जगातील वाहत्या पाण्यापैकी ६० टक्के इतके जास्त आहे. ही स्थिती पाणीहक्कावरून आंतरराष्ट्रीय संघर्ष भडकण्यास आमंत्रण देणारी आहे. दोन किंवा अधिक देशांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याबाबत तातडीने राजनैतिक तोडगा काढणे हाच उपाय आहेत. पाण्यावरून युद्ध पेटणार असल्याचा इशारा देण्यात आला असला तरी वाद चिघळत न ठेवता जलस्रोतांचे वाटप करून घेणे उपयुक्तही ठरते. भारत-पाकिस्तान यांच्यात सिंधू नदीच्या पाण्यावरून वाद असले तरी १९६० च्या सिंधू करारामुळे बरेच संघर्ष टळले व शांतता प्रस्थापित झाली आहे. हा करार झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात १९६५ आणि १९७१ मध्ये दोन मोठी युद्धे झाली. पण युद्धकाळातही सिंधू कराराचे पालन दोन्ही देशांकडून झाले. हेच नाईलबाबत इजिप्त, सुदान, युगांडा यांच्यातील कराराने साध्य केले आहे. पाण्याबाबतची आव्हाने पेलताना सामंजस्य व सहकार्य हीच उत्तरे आहेत. पाण्यावरून युद्धे पेटू शकतात, त्याचप्रमाणे पाणी हे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रमुख साधनही ठरू शकेल. म्हणूनच एकविसावे शतक पाण्याचेच आहे!

संपादकीय

साभार लोकसत्ता,

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=56353:2010-03-21-14-54-02&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

‘जन जोडो गंगा यात्रा – मार्च २०१०’ ‘Awareness Campaign Drive’ (Connecting people to the River Ganga)

Jan Jodo Ganga Yatra 2010

Awareness Campaign Drive, (Connecting people to the River Ganga)

The most serious problem today is the destruction of our environment. General population is ignorant about it. Pollution, draught, flood, soil and water problems are not natural but they are consequences of uncaring and selfish attitude of mankind. Not only present but future generations too will suffer due to the ill-effects of this. Gangajal Nature Foundation was making an effort to awaken people from their deep slumber.

We appreciated the work done by Hon. Shri Rajiv Ji Gandhi on the Dying Ganga. River Ganga has been declared as a National River of India by Prime Minister Mr. Manmohan Singh in 2008 which was ‘International Year of Rivers’

Gangajal Nature Foundation is working hard for last five years towards awakening and educating people about upkeep of rivers and lakes by organizing photo exhibitions, screening of the documentary, by holding national level competitions in essay-writing, photography and documentaries.

Gangajal Nature Foundation has organized awareness campaign for people at the bank of the river Ganga from Gangotri – the source of Ganga to Gangasagar near Bay of Bengal. This awareness campaign called “Jan Jodo Ganga Yatra” (Connecting people to Ganga) had been organized from 3rd March to 18th March 2010.

During this campaign, Gangajal Nature Foundation has organized “Gangajal” photo exhibitions, It also tried to increase public awareness screening of documentary in different towns and Villages (2525 K.M.) along the banks of Ganga.

We have sailed through country boat from Hardwar to Diamond Harbour different location. Through this sailing in Ganga, we have collected meaningful data like pollution, ill-effects on people’s lives, video records of the discharge of sewerage water into Ganga by factories and townships.

The Foundation is going to submit this collected data, suggestions and memoranda by ordinary people to Prime Minister’s Office through the hands of Mr. Kumarji Ketkar, (Chief Editor, Loksatta, Indian Express Group, Mumbai). Through this campaign we have reconnected the soul of at least one crores (ten million) people with the river Ganga.  It has definitely helped in reducing the pollution load on the river Ganga. This is Gangajal Nature Foundation’s first step towards ‘Save Ganga Movement’.

———————————————————

कथा जणांच्या गंगा अभियानाची….

गंगाजल नेचर फौंडेशन ही मुंबईतील संस्था गेली  अनेक वर्षे, छायाचित्र प्रदर्शने व माहितीपट सादरीकरणाच्या तसेच राष्ट्रीय पातळीवरील छायाचित्र  आणि माहितीपट व निबंध स्पर्धांच्या माध्यमातून नद्यांच्या, तलावांच्या संवर्धना विषयी समाज प्रबोधन व जनजागृतीचे कार्य करीत आहे. गंगानदीच्या संवर्धनासाठी व्यापक जनजागरण व्हावे म्हणुन, ५ मार्च २०१० पासून जनजागरण  अभियानाचे  आयोजन केले होते. १५ दिवसांच्या जन जोडो गंगा जनजागरण  अभियानात, हिमालयातील गंगानदीचे उगमस्थळ गंगोत्री ते गंगासागर, बंगालच्या उपसागरापर्यंत. २५२५ कि.मी.  अंतराच्या गंगाकिनायावरील १० ठिकाणी धार्मिक स्थळांबरोबरच  अनेक शहरातं  गंगाजल छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागरणाचा तसेच गंगा किनायावरील सर्वसामान्यांशी संवाद साधुन त्यांना गंगानदीशी जोडण्याचा प्रयत्न केला.

तीन मार्चला सकाळी अकरा वाजता पश्चिम एक्सप्रेसने मुंबई सोडली आणि आमच्या जन जोडो गंगा  अभियानाची सुरवात झाली. चार मार्चला सकाळी  आकरा वाजता  आम्ही नवी दिल्लीला पोहचलो. येथे टवेरा गाडी घेवून कानपूरचे उमाशंकर दिक्षीत हे आमचे सहकारी आमची वाट पहात होते. याच गाडीने दिल्लीहून गंगोत्री ते गंगासागर पर्यंतचा साडेतीन हजार कि.मी. प्रवास होणार होता. मुंबईहून माझ्या सोबत सूरेंद्र मिश्रा, मछिंद्र पाटिल, संतोष मरगज, उन्मेश  अमृते, केवल नागवेकर हे गंगाजल चे सदस्य होते. गंगाजलचे कायदे विषयक सल्लागार प्रदिप अगरवाल हे दिल्लीतलेच त्यांच्या हस्ते या अभियानाच्या शुभारंभाचा नारळ फोडून आम्ही गंगोत्रीकडे रवाना झालो. रात्रभर प्रवास करून पाच मार्चला दूपारी १२ वाजता आम्ही उत्तरकाशीच्या हॉटेल भंडारीमधे दाखल झालो. मनोज सेमवाल हा उत्तराखंडचा  आणखी एक साथीदार आमच्यात सामावला.

मुंबईहून निघाल्याला जवळपास चाळीस तास झाले होते. प्रवासाने शरीर अगदी थकलं होतं पण ही तर सुरवात होती. गंगासागर पर्यंतच्या या अभियानात दिवसा प्रदर्शन व जनजागरणाचा कार्यक्रम तर पुढचा टप्पा गाठण्यासाठी रात्रीचा प्रवास या मुळे थकायला होणार हे स्पष्ट होतं. गंगोत्रीमध्ये खुपच बर्फवृष्टी झाल्याने गंगोत्रीपर्यंत पोहचणे शक्य  नसल्याचे मनोजने सांगितले. शितकालात गंगामाईची मुर्ती मुखवा येथे सहा महिने असते. मुखवा ते गंगोत्री  हे १८ कि.मी. अतंर आहे. दुपारी २ वाजता  आम्ही मुखव्याला निघालो. संध्याकाळी ५ वाजता मुखव्याच्या गंगामंदिराच्या प्रांगणात पोहचलो. शितकाल असल्याने इथलेही बरेचसे रहिवासी उत्तरकाशीला राहतात. मंदिराचे पुजारीही हजर झाले त्याच्यां सोबत बरेचसे ग्रामस्त जमा झाले.  आम्ही  गंगाजल प्रदर्शन  अवघ्या दहा मिनीटात उभे केले. गढवाली लोकांना गंगादर्शन नेहमी मनोहरी होतं  असत. प्रदर्शनात कानपूरच्या पुढची गंगा पाहून बरेचजण व्यथीत झाले. लोकवस्ती कमी  असूनही या  अभियानाची सुरवात येथूनच केली. भारतीय हिंदू संस्कृतीने गंगेला नेहमीच देवीच्या रूपात बंदिस्त करून ठेवल आहे. पण  आता मात्र देवत्वाच्या पलीकडे जावून ती एक नदी असून तीचही स्व:ताचं अस जीवन  आहे. आणि  तीच्यावर करोडो भारतीयांच जीवन अवलंबून आहे हे वास्तव स्विकारने गरजेच झालं आहे.

ग्रामस्तांनी या अभिायानाची खुपच स्तुती केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरा पुन्हा उत्तरकाशीच्या हॉटेल भंडारीमधे मुक्कामाला पोहचलो. ६ मार्चला सकाळी ८ वाजता काशीविह्णानाथाच्या मंदिराच्या आवारात गंगाजल प्रदर्शन उभ झाल. मंदिराचे महंत  अजय पुरी यांनी प्रदर्शनाच उद्‌घाटन केलं. हळूहळू गर्दी जमू लागली. शाळेला जाणारे विद्यार्थी इकडे वळू लागले तसेच सर्वसामान्य ही प्रदर्शनाकडे वळाले. ‘गंगे तव दर्शनात मुक्ती’ अस मानणारा वर्गही गंगेच हे प्रदुषीत रूप पाहुन भांबावला. तर महाविद्यालयातील काही तरूण शंकीत चेहयाने  आम्हाला भेटले. त्यांच्यापैकी काहीनी हे  अभियान गरजेच  सल्याच मत व्यक्त केलं पण गंगेवर बांधलेल्या धरणामुळे आम्हाला नोकया मिळणार आहेत. तुमची संस्था धरणंच्या विरोधात असेल तर आम्ही या अभियानात सहभागी होऊ शकणार नसल्याची खंत व्यक्त केली. आमच्या परिसरात गंगाप्रदुषण तितकस नाही. कानपूर, बनारस तसेच कोलकात्याला कडक कायदे करून गंगाप्रदुषणावर नियंत्रण आणता येईल का अशी सुचना केली.

सुरवात तर चांगलीच झाली होती. प्रदर्शनाला लोक येत होते तर शंकानिरसनातून संवाद साधला जात होता. दुपारी १ वाजता जेवणानंतर ऋषीकेशला जाण्याकरीता आम्ही निघालो. आता पर्यंतचा प्रवास रात्रीचा झाला होता. पण उत्तरकाशी ते ऋषीकेश हा चार तासाचा प्रवास दिवसा झाला. लोहारी नाग पाला जल बिजली प्रकल्पामुळे गंगानदीच्या पात्रात पाण्याच प्रमाण खुपच कमी दिसत होते. पुढे ३९ कि.मी. लांबीच्या टनेलमधुन प्रकल्पासाठी वापरलेलं गंगाजल धरासु जवळ पुन्हा गंगेला  र्पण केलेलं दिसलं. गंगानदीवर  अनेक प्रकल्प असुनही पुढेही काही नविन प्रकल्प उभारले जातील. कारण  आपली वाढती वीजेची मागणी. हिमालयाच्या कुशीत नागमोडी वळणाने जाणारा रस्ता तसेच जागोजागी एन टी पी सी ने लावलेले बोर्ड ‘टिहरी धरण भारताची शान’ जगातील सगळयात उचांवरील धरण अशी त्याची ख्याती आहे. हेच धरण फुटल तर हरिद्वार आणि ऋषीकेशला कायमच ‘गंगा’जलसमाधी देऊन गंगेच पाणी दिल्लीला धडकेल. हे सगळ किती मिनीटात कस आणि काय होईल यांचा एक तक्ता राष्ट्रीय नदी निदेशालयाच्या दस्तावेजात आहे. त्याचे छायाचित्र गंगाजल प्रदर्शनात आहे जे पाहून अनेकांचे डोळे विस्परतात. कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला वाहत जाणारी गंगानदी.  आणि तीच ते निळशार पाणी पुढे कानपूर, बनारस नंतर काळभोर दिसणार आहे. तसंच डोंगरांच्या  आंगाखांदयांवर दिमाखाने डोलणारे चिड व देवदार वृक्षांची गर्दी जी हरिद्वारच्यापुढे तुरळक होऊन कानपूर नंतर गंगेच्या काठावर एकही वृक्ष दिसणार नाही. गंगेच्या काठावर मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज  आहे.

आमचा गाडीचालक  आशोक सफाईदारपणे गाडी चालवत होता. सहा तासाचा प्रवास अवघ्या पाच तासात त्याने  आम्हाला ऋषीकेशला पोहचवले. सहा वाजता त्रिवेणी घाटावर गंगाजल प्रदर्शन उभ झालं. महाकुंभमेळयामुळे ऋषीकेशलाही बरीच गर्दी होती. विदेशी पर्यटकही प्रदर्शन पाहयला जमा होत होते. अनेकजण स्वःताहून आमच्याशी संवाद साधत होते. तर काही लोकांशी आम्ही संवाद साधत होतो. चर्चा घडत होती. पण कुभमेळयात पवित्रस्नान करण्यास आलेला भाविकवर्ग गंगेच्या प्रदुषणाकडे लक्ष देत नसल्याच आमच्या नजरेत आलं. गंगामैया कितीही प्रदुषित झाली तरीही ती या भाविकासाठी पवित्रच आहे. प्रदर्शन पाहिल्यावर गंगापरिक्रमा घडवल्याबद्‌ल आवर्जुन आभार माननारे गंगाभक्त गंगा प्रदुषणावर बोलण्यास मात्र उत्सुक नसल्याच जाणवलं. तसंच या गंभीर समस्येची जाण  सेणारेही भेटले. पण त्यांच प्रमाण तुलनेन कमी होतं. आमच्या या मराठी प्रयत्नाची दखल ‘सहारा राष्ट्रीय’ या वर्तमानपत्राने घेतली तसेच ऋषीकेश येथील एका गंगाप्रेमीने रात्री निलकंठधाममधे  आमची राहण्याची व्यवस्था केली. व भविष्यात या उपक्रमाला मदत करण्याचे  आश्वासन दिले.

दुसया दिवसी सकाळी ८ वाजता आम्ही हर की पौडीवर हजर झालो. महाकुंभमेळा असल्याने सुरक्षाव्यवस्था  अगदी कडक होती. हर की पौडीवर गंगाजल प्रदर्शन लावण्यासाठी परवानगी घेणं गरजेच होतं म्हणुन मी व सुरेंद्र मेळा धिकायाच्या कार्यालयात गेलो. ८ मार्च रविवार असल्याने ते कार्यालयात नसल्याचे कळले. त्यामुळे  आम्ही  हर की पौडी पोलीस चौकीतील पोलीस अधिक्षकांना भेटून परवानगीसाठी विचारणा केली. रविवार असल्याने गंगास्नानासाठी  गर्दी होण्याची शक्यता असल्याने हर की पौडी ऐवजी सुभाषघाटावर प्रदर्शन लावण्याची परवानगी मिळाली. थोडयावेळातच सुभाषघाटावर प्रदर्शन उभ झालं. कुंभमेळयामुळे गंगास्नासाठी गर्दी खुपच होती. दरम्यान पोलीसांनी  आम्हाला खूप सहकार्य केलं. गंगाजल प्रदर्शनाचं माहितीपत्रक वाटण्याच काम उत्तराखंड पोलीसांनी केलं हे जागरूतेच लक्षण होतं. इथही ऋषीकेश सारखाच  नुभव आला जी काही लोक प्रदर्शन पाहायला गर्दी करत होते ते  कुंभमेळयाच्या गंगास्नासाठी  आले होते. त्यांना गंगाप्रदुषणाची काहीही खंत वाटल्याच जाणवत नव्हतं. उलट काही गंगाभक्तांनी गंगापरिक्रमा घडविल्या बद्‌दल साष्टांग दंडवत घातला. या प्रकाराने  आम्ही निराश न होता गंगानदीच  स्तित्व धोक्यात  आल्याच त्यांच्या निदर्शनास पुन्हा पुन्हा आणत होतो. गंगानदीच्या संवर्धनासाठी काय करता येईल ? हे त्यांना विचारत होतो. कुंभमेळयात गंगास्नान करून पुण्य मिळवण्याच्या भानगडीत गंगेच्या संवर्धनासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. आम्ही मात्र  आमच काम करत होतो. गंगाप्रदुषणाची माहिती देत होतो. झोपेचं सोंग घेतलेल्या समाजाला जाग करण्याच काम मनापासून करत होतो.

सहकार्या बद्‌दल पोलीसांचे आभार मानुन आम्ही दुपारी १ वाजता कानपूरकडे रवाना झालो. बिजनोर, रामपूर, लखनऊ करीत ८ मार्चला पहाटे चार वाजता कानपूरला पोहचलो. १६ तासाच्या प्रवासाने सगळेच थकले होते. पुन्हा दिवसभर प्रदर्शनासाठी उभ राहयच होतं. उमाशंकर दीक्षित हे कानपूचे त्यांनी हॉटेल हिमालयन मधे  आमची व्यवस्था केली व ते त्यांच्या घरी गेले. सकाळी  आठ वाजता येतो म्हणाले. आम्ही सात वाजेपर्यंत झोप काढली. त्या तीन तासाच्या झोपेमुळे  आम्ही पुन्हा ताजेतवाने झालो. ९ वाजता परमटघाटावर गंगाजल प्रदर्शन लावले. सोमवार  सल्याने जवळपास  आठ हजार लोक शंकराच्या मंदीरात येतात  अस दीक्षितांच मत होत. त्यातील  आर्ध्या लोकांनी जरी हे   प्रदर्शन पाहिल तर सा-या कानपूरमध्ये गंगासंवर्धनाचा संदेश पोहचणार होता. आणि झालंही तसचं मंदीराच्या दर्शनी  भागातच प्रदर्शन लावल होत. त्या मूळे देवदर्शना नंतर प्रदर्शनाला गर्दी वाढू लागली. काळीभोर गंगा पाहायची सवय झालेल्या कानपूरकरांना हिमालयातील निळीशार गंगा बघून संकोच वाटूलागला. काही लोक तसं बोललेही. “तुम्ही मुंबईहून येवून प्रदर्शनाच्या माध्यमातून आमच प्रबोधन करताय आणि आम्ही मात्र गंगाप्रदुषण करतोय.” काही लोक आपले  अभिप्राय लिहू लागले. श्रीवास्तव नावाच्या निसर्गप्रेमीने आपल्या अभिप्रायात ‘जल नही तो कल नही’  असा संदेश लिहून जल संवर्धनाच तहत्व प्रगट केलं. काहींनी हा उपक्रम किमान आठवडाभर तरी कानपूरमध्ये सुरू ठेवला पाहिजे अस सुचवलं. हा उपक्रम इथल्या सगळया शाळेंमध्ये तसेच महाविद्यालयातही केला तर इथला तरुणवर्ग या चळवळीत    ओढला जाईल त्यामुळे जागृती होऊन गंगाप्रदुषणावर आळा बसण्यास मदत होईल. त्यांची सुचना तर चांगली होती पण पुरेसा निधी नसल्याच तसेच आमच्या या उपक्रमाला कोणी प्रायोजक मिळाला नसल्याच सागिंतले. महाराष्ट्रातातुन गंगानदी वाहत नसल्याने कोणी मराठी प्रायोजक मदत करण्यास तयार नव्हते तर कानपूर, बनारस,  कोलकात्यातून या उपक्रमाला मदत न मिळण्याच कारण हा प्रयत्न परराज्यातून म्हणजे महाराष्ट्रातातुन आलेली मंडळी करताहेत. असा प्रांतवादाचा दुहेरी फटका आम्हाला बसल्यानेच पुरेसा निधी जमला नाही. ‘लोकसत्ताच्या’ सहकार्यातून आणि गंगाजलचे सभासद तसेच हितचितंकाच्या मदतीनेच कमीतकमी दिवसात हा उपक्रम पुर्ण करित असल्याच सांगाव लागत होतं.

दुपारी बारा वाजता मी व सूरेंद्र आणि उन्मेश सरसय्याघाटाकडे आलो. दीक्षितांनी एका बोटीची व्यवस्था केली होती. सरसय्याघाट ते जाजमाऊ पर्यंतचा १५ कि.मी. परिसर गंगेच्या पात्रातून बोटीने प्रवास करून गंगेला प्रदुषीत करणा-या लेदरटेनरीतून आलेल्या ‘रासायनीक जहर गंगानदीत’ सोडणाया नाल्यांच छायाचित्रण करणार होतो. दीक्षित गाडीने  अशोक सोबत जाजमाऊ कडे गेले. मी व सूरेंद्र  आणि उन्मेश बोटीने जाजमाऊ पर्यंत गंगानदीच्या खो-याचा ‘सर्वे’ करण्यास निघालो. सोमवार  सल्याने गंगास्नानासाठी  अनेक घाटांवर लोकांची गर्दी दिसत होती. गंगास्नाना आधी घरून  आणलेलं निर्माल्य गंगार्पण केलं जात होतं. दुधाचे  अभिषेक केले जात होते. काही ठिकाणी धार्मिक चालू होते. एकंदरीत गंगानदीचं देवत्व सकाळी सकाळी भराला आले होतं. त्याच बरोबर  अनेक घाटांच्या शेजारीच  नागरीवस्त्यांतून आलेले सांडपाण्याचे नाले बिनदिक्कत गंगानदीच्या पात्रात आदळत होते. काहीजण तर तिथेच गंगास्ननाचं पवित्र कर्म आवरत होते तर काहीजण पैल तिरावर जाऊन कमी प्रदुषीत गंगेत स्नान उरकत होते. हे सगळ आम्ही छायाचित्रीत करत होतो. त्यातल्या काहीनां आमच्या विषयी उत्सुकता वाटल्याने संवाद साधत होते तेव्हा परमटघाटावर ‘गंगाजल प्रदर्शन’ असुन ते पाहण्याच निमंत्रण आम्ही देत होतो.

काही ठिकाणी नाले पुर्णपणे बंद केल्याच आमच्या पाहण्यात आलं. तर काही ठिकाणी जसच्यातस असल्याचही जाणवल. उन्हाचा तडका वाढत होता. सोबत  आणलेल्या थंड पाण्याच्या बाटल्या तापत होत्या. गोलाघाटाजवळचा नाला तुडूंब वाहत गंगेच्या पात्रात कोसळत होता. दोन वाजले होते. आम्ही जाजमाऊ परिसरात येऊन पोहचलो. येथे  सलेल्या जुन्या पुला शेजारीच नविन पुल बाधला जातोय. या मार्गे लखनऊ ला जाता येते. जाजमाऊ  परिसरात  नेक लहानमोठे चामडयाचे उद्योग आहेत. त्याना ‘लेदर टेनरी’ असही म्हणतात. कानपूरात गंगानदीला प्रदुषणाचा शाप  सल्याच पदोपदी जाणवत. या कारखान्यांचे रासायनीक जहर  अगदी जसच्यातस गंगानदीत सोडल जात. बहुतेक कारखाण्यांचे सांडपाणी जलशुध्दीकरण प्रकल्प आहेत पण २४ तासापैकी १८ तासावर लोशेडींग असल्याने त्या दरम्यान रासायनीक जहर तसेच गंगेत जातं. मग उरलेल्या सहा तासात जलशुध्दीकरण प्रकल्प चालऊन काय हसिल होणार म्हणुन बहूदा त्या वेळेसही हे प्रकल्प बंदच  असावेत असच वाटू लागत. या कारखान्यात लेदरप्रोसेसिंगसाठी क्रामियम हा जडधातू वापरावा लागतो. तो खूप महागडा असून सांडपाण्यावर प्रक्रिया करून हा क्रोमियम बाजूला केल्यास मालकांचाच फायदा होतो. अस असूनही क्रोमियम मिसळलेलं जहर गंगेत का सोडल जातं ? या मुळे जलचर तसेच मानवी जीवनही धोक्यात आलं आहे. आमचे दीक्षितही नियमित गंगानदीत स्नान करतात. जाजमाऊ  परिसरातील सगळयात मोठया नाल्याजवळ आमची बोट आली. क्रोमियमचं जहर घेऊन तो नाला गंगेच्या पात्रात ऊसळी घेत होता. तो नाला गेल्या दहा वर्षांत अनेकवेळा पाहिला आहे. जेव्हा जेव्हा हा नाला पाहतो तेव्हा माझे डोळे भरून येतात. आजही तसचं झालं आवरूनही आवरता येईना. उन्मेषने सांगितल्यावरच बोट किनाया घेतली त्याला हव तेवढे फुटेज मिळाले होते तर माझ्या संग्रहात छायाचित्राची भर झाली होती.

प्रदर्शनाला खुपच चांगला प्रतिसाद मिळत होता. आमच सगळयांच रात्री प्रवासामुळे जागरण झालेलं. कामाच्या व्यापात कोणलाही जेवण घेता आल नव्हतं. संध्याकाळीही लोकांची गर्दी केली विद्यार्थ्याशीं संवाद साधता आला. अनेकानी  आपले संपर्क क्रमांक व पत्ते नोंदवले होते. कानपूरात रामजी त्रिपाठी हे गंगाप्रदुषणावर काम करीत आहेत. सभा, संमेलनं तसेच गंगेच्या पात्रातील बेवारस मानवी प्रेतं बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावणे. अशा अनेक प्रयत्नातून जनजागरण करित आहेत. ते दर सोमवारी परमट घाटावर गंगाप्रदुषणा बाबत पत्रकार परिषद घेतात. एकाप्रकारे दबावगटाच काम करतात. त्यांनी ‘गंगाजल’ची माहिती पत्रकारानां सागिंतली. रामजी त्रिपाठीनीं छायाचित्रणाच्या माध्यमातुन जनजागरण हि कल्पना मनापासून आवडल्याच सांगितले. कानपुरातून दहा जागरूक नागरीकांनी गंगाजलचे सभासदत्व घेण्यास उत्सुकता दाखवली त्यांचासी दीक्षितांच्या  मध्यस्थिने संपर्क ठेऊन ‘गंगाजल’ चा एक दबावगट तयार करण्यात येईल. याच वेळी आमचे सहकारी उमाशंकर दीक्षित यांचा ‘गंगाजल’ च्या वतीने सत्कार करून  आभार मानले. रात्री आठ वाजता दीक्षितांच्या घरी थोडासा  अल्पोउपहार करून  आम्ही अलाहाबादकडे रवाना झालो. रात्रीच जेवण धाब्यावर झाले.

तिन्ही त्रिकाळ नेहमीच प्रयागला यात्रेकरूंचा मेळा जमलेला असतो. दरवर्षी होणारा माघमेळा, दर सहा वर्षांनी येणारा अर्धकुंभमेळा आणि बारा वर्षांनी होणारा महाकुंभमेळा हे इथलं आणखी एक वैशिष्टय. कुंभमेळा या एकाच कार्यक्रमासाठी सर्वाधिक लोकांची गर्दी होणारं हे जगातलं एकमेव ठिकाण आहे. कुंभमेळ्यादरम्यान प्रयागला सात ते आठ कोटी एवढे लोक येतात असा अंदाज आहे. देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं आणि त्यातून अमृतकलश बाहेर आला. त्या अमृतकुंभावर ताबा मिळवण्यासाठी झालेल्या युद्घाच्या वेळी अमृताचे काही थेंब पृथ्वीलोकात पडले ते प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी. देवदानवांच हे युद्घ बारा दिवस चाललं. देवांचे बारा दिवस म्हणजे मानवाची बारा वर्षं, म्हणून कुंभमेळा बारा वर्षांनी एकदा येतो. या कुंभमेळ्याच्या वेळी इलाहाबाद श्रद्घाळूंनी भरून वाहत असतं.

९ मार्चच्या पहाटे दोन वाजता अलाहाबादच्या दारागंज परिसरातील काशीमठात पोहचलो. सकाळी सहावाजे पर्यंत सगळयानी ब-यापैकी झोप काढली. सकाळी मी व सुरेंद्र महाराष्ट्र मंडळाच्या पित्रे गुरूजीनां भेटलो. काशीमठात त्यांनीच आमची व्यवस्था केली होती. आता पर्यंतचा अनुभव तसेच पुढील कार्यक्रमाची रूपरेखा त्यानां सागिंतली. संगमावर लागणाया नावेची सोयही त्यांनी केली तसेच त्या सहकारी ननका याला आमच्या सोबत दिले. पुण्यात जसं मारूतीचं प्रस्त आहे तसच लाहाबादला गंगा यमुना व सरस्वती या नद्यांच्या संगम स्थळाजवळच झोपलेला मारूतीच मंदिर आहे. आज ९ मार्च त्यात मंगळवार सल्याने मारूती भक्तांची लोट गर्दी होणार यात काही शंकाच नव्हती. ८ वाजता ‘लेटा मारूती’ मंदिराच्या प्रागंणात ‘गंगाजल’ प्रदर्शन उभे झाले. बजरंगबलीच्या दर्शनानंतर ‘गंगाजल’ प्रदर्शनाकडे गर्दी होऊ लागली. आता पर्यंत नघडलेली गोष्ट इथे घडली. ती म्हणजे प्रश्नउत्तरे झडू लागली. इथे अनेक प्रश्न  अनेक शंका समोरून येऊ लागल्या. ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते इथे होऊ लागलं. तुम्हाला या उपक्रमासाठी निधी कोणी दिला इथ पासून ते कानपूरच्या टेनरींच काय करायचं ? इलाहाबादला गेल्या दहा वर्षापुर्वी जसा पूर येत होता तस पुन्हा घडण्याची शक्यता आहे काय ? टेहरी धरण खरोख्ररच फुटेल काय ? फरक्का बांध मोडीत कधी निघणार काय ?  अशा  अनेक प्रश्नांतुन संवाद घडत होता. चर्चा झडत होती. इलाहाबादला गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम होतो. गंगा आणि यमुना या दोन नद्यां दिसतात तर सरस्वती गुप्त सल्याच म्हणतात मात्र इथल्या जागरूक लोकांबरोबर झालेल्या चर्चे दरम्यान साक्षात सरस्वतीच दर्शन झाल्यासारखं वाटले. कानपूर प्रमाणेच दबावगट निर्माण करण्यास मदत होणार होती.

अभिप्राय तसेच संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांकाची नोंद होत होती. लोक गंगानदी सोबत जोडली जात होती.  अभियानाची वाटचाल उदिद्‌ष्ठांच्या दिशेने होत होती. दुपारी  आमची  आर्धी टिम ननका सोबत बोटीतून गंगा, यमुना संगमस्थळ पाहून  आले. मग मी, सुरेंद्र व उन्मेष छायाचित्रणासाठी ननका सोबत निघालो. आतापर्यंत गंगाप्रदुषणाची बरीच माहिती व छायाचित्रणाच संकलन केल होत. आता यमुना नदी विषयी बरच काही संकलन होईल याची आशा वाटत होती. आमची बोट यमुनेच्या पात्रातुन चालली होती. किल्याच्या पाठीमागे एका साधूच बेवारस प्रेत तंरगताना दिसलं. पुढे यमुनेच्या पात्रातून होणारी बेसुमार वाळूउपसा पाहीला. संगमस्थळावर गंगा आणि यमुनेच्या पाण्याचा पाठशिवनीचा खेळ पाहीला. मातकट रंगाची गंगा तर हिरवट निळया रंगाची यमुना यांचा संगम होऊ न पुढे विशाल रुपात वाहणारी गंगा! खरतर कानपूरच्यापुढे गंगा मरणासन्न झाल्याच दिसतं. इलाहाबादला यमुना गंगेला मिळते म्हणुन गंगा पुन्हा जीवन धारन करते. दोघींच्याही जल साठयाचा विचार केला तर इथून पुढे वाहणाया प्रवाहाला यमुनाच म्हणयला पाहिजे. पण धर्माच्या तराजूत गंगेच महत्व जास्त असल्याने इलाहाबादच्या पुढे गंगाच वाहत राहिली. संगम स्थळावर यात्रेकरूची गर्दी झाली होती. गंगा यमुना संगमात स्नान करता यावे म्हणून अनेक बोटीनां बांधुन कायम स्वरूपी एक प्लाटफार्म तयार केला आहे. गंगास्नान होत होती. कर्मकांड झडत होती. सोबत आलेल्या आपल्या मृत झालेल्या आप्तांची रक्षा गंगार्पण केली जात होती. दिल्लीला ताजच्या मागचं यमुनेच झालेल गटार मला आठवल. तर कानपूरात क्रोमियम सारखं जहर ओतणारा तो प्रचंड नालाही आठवला. श्रध्दा ही भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. या श्रध्देत प्रचंड ताकद असते. जळत्या निखायावरून चालणे, अनवानी चारधामची यात्रा करणे, पाठीमध्ये लोखंडी हूक खुपसने या मध्ये कदाचित मनःशक्ती साथ देत असावी. पण अतिशय घातक अशा रसायनाने दुषित झालेल्या या पाण्यात स्नान केल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्याची प्रतीकार शक्ती कशी मिळणार ?

दुपार झाली होती. आम्ही प्रदर्शनाकडे परतलो. थोड्याच वेळात अवरा आवर करून तसेच पित्रेगुरूजींच्या घरी जऊन त्यांचे  आभार मानले. दुपारचं जेवण धाब्यावर झालं. रात्रीचा मुक्काम वाराणसीच्या जवळ सीतामढीला सुरेंद्र मिश्राच्या घरी झाला. मुंबईहून निघाल्या पासून घरच जेवण नव्हतं पण मिश्रांच्या घरी मनासारख जेवण झाल. इतक्या दिवसात प्रथमच रात्रभर झोप मिळाली आणि आम्ही सगळेच पुन्हा ‘रिचार्ज’ झालो उर्वरीत अभियानासाठी. येथूनच मछिंद्र पाटील, संतोष मरगज आणि केवल नागवेकर हे त्यानां व्यवसाईक रजा नसल्याने मुंबईला परतले.

१० मार्चला सकाळी ९ वाजता वाराणसीच्या दशाश्वमेधघाटवर गंगाजल प्रदर्शन लावले. आता आम्ही पाचजणच त्या त्या ठिकाणच्या आमच्या सभासदाच्या सहकार्याने या अभियानाची पुर्तता करणार होतो. गंगाघाटावर लोकांची वर्दळ  असतेच. प्रदर्शन पाहयला लोक अपसूकच जमू लागली. सुरेंद्रच हिंदी बयापैकी असल्यानं तो संवाद साधायला सुरवात करायचा मग मी त्याच चर्चेत रूपातंर करायचो. सुचना यायच्या अभिप्राय लिहले जायचे. संस्थेच्या सभासदत्वासाठी  विचारणा व्हायची. बेल्जियमहून आलेली एक तरूणी ‘चारलोट नेल’ हे तीचं नाव. गंगाप्रदुषणावर प्रोजेक्ट करण्यासाठी वाराणसीत ठिय्या मारून राहीलेली. गंगेबाबत भरभरून बोलत होती. गंगेपासून दूर असलेल्या मुंबईतील एक संस्था गंगाप्रदुषणाबाबत जनजागरणाच काम करते याचं तीला कौतूक वाटत होत. तीने आपला  अभिप्रायही लिहिला. आमच्या या चर्चेत वाराणसीचा एक तरूण सहभागी झाला होता. बाबू त्याच नाव. त्याची स्वःताची मोटरबोट  आहे. गंगेच्या पात्रातुन छायाचित्रण आणि निरीक्षण करण्यासाठी ती मोटरबोट विनामुल्य देण्यास तयार झाला. आता आमचं मनुष्यबळ कमी होत त्यामुळे थोडी धावपळ होत होती. त्यात बाबूची भर पडली. दीक्षित त्याच्यां क्षमते पेक्षा जास्त धावपळ करत होते. सुरेंद्र, दीक्षित आणि शोक प्रदर्शनाजवळ थांबले. अशोक रात्रभर गाडी चालवायचा तेव्हा  आम्हा सगळयांना थोडीतरी विश्रांती मिळायची. पण अशोक दिवसभरही प्रदर्शनात श्रमदान करायचा. अशोक गंगाजलचा सभासद नव्हता तर त्याची गाडी आम्ही दिल्लीतून भाडयाने घेतली होती. जन जोडो होत होतं ते असं.

बाबू त्याच्या मोटरबोटवर आम्हाला घेऊन गेला. वारणा आणि अस्सी या दोन्ही नद्यां वाराणसीच्या दोन टोकाला  आहेत. आता मोटरबोट  असल्याने कानपुर सारखा त्रास होणार नव्हता की फार वेळही लागणार नव्हता. बाबू  आम्हाला  अस्सीघाटावर घेऊन गेला. कधीकाळी स्वच्छ  असलेली  अस्सीनदी  आज नाल्याच्या रूपात गंगेत सामावत होती. वाराणसीत जवळपास ६० ते ७० नाले गंगेत सोडलेले आढळतात. त्यात अस्सी आणि वारणा हे मोठे नाले ठरावेत. येथे  बाबूची मुलाखत चित्रीत केली. त्याने वाराणसीतल्या गंगाप्रदुषणाबाबत तळागळातील लोकही जागृत  सल्याच दाखऊ न दिले. हरिश्चंद्रघाट आणि मणीकर्णिकाघाट तसेच जवळपास सगळेच घाट  आम्ही पालथे घातले. वारणानदी, नदी कसली नालाच तो गंगेत मिसळतो तिथेच वळवळणारे लालसर कीडेही दिसले. बाजूलाच एक बेवारस प्रेत तरंगत होतं. ते खाण्यासाठी काही कुत्रे टपून बसले होते. हे सगळ चित्रीत झाल होत. संध्याकाळच्या आरती पर्यंत प्रदर्शन सुरू होतं. इथेही नविन लोकं जोडली होती. गंगानदी  आणि सर्वसामान्यातील  अतर कमी करण्याचा  आमचा प्रयत्न सफल होताना दिसत होता. या चळवळीतलं ‘जन जोडो गंगा अभियान’  हे पहिल पाऊल ठराव हीच एक इच्छा  आहे. रात्री ८ वाजता   आम्ही वाराणसी सोडली पटण्याकडे जाण्यासाठी. बिहारमध्ये रात्रीचा प्रवास धोक्याचा  सल्याचं सगळेच म्हणतात पण मी एकटाच अनेकवेळा रात्री अपरात्री बिहारमध्ये भटकलो आहे. आणि आताही आम्ही पटण्याकडे जाण्यासाठी रात्रीच निघालो.

आरा, बक्सार मार्गे ११ मार्चला सकाळी ७ वाजता पटण्याच्या हॉटेल स्वागतम्‌ मध्ये दाखल झालो. पाटणा, गंगा नदी इथे नदी न राहता तिचं रूप सागरासारखं विराट होतं. हिमशिखरांतून वाहत येणारी अवखळ गंगा सुमारे पावणे दोन हजार किलोमीटर एवढा प्रवास करून इथे येते, तेव्हा पार बदलून गेलेली  असते. या तराई क्षेत्रात येते तेव्हा गंगा जरा थकलेलीच असते. गंगेचा संथ आणि अथांग पसरलेला प्रवाह या मैदानी प्रदेशाला दरवर्षी संपन्न करत असतो. उन्हाळ्यात हिमालयात वितळणारं बर्फ  आणि त्यानंतर येणारा वर्षा ऋतू यामुळे प्रत्येक वर्षी गंगेला जो पूर येतो त्याचं पाणी गंगेचं पात्र सोडून बिहारच्या मैदानी प्रदेशात पसरतं. त्यामुळे नुकसान होतं. पण जवळजवळ दोन अब्ज टन सुपीक गाळ संपूर्ण गंगेच्या खोर्‍यात पसरवला जातो. गंगा खरोखरच जीवनदायिनी आहे. एकटीच्या ताकदीवर पन्नास कोटी जनतेचं पालनपोषण करते. हीच गंगा जर लुप्त पावली, सरस्वतीच्या मार्गाने गेली तर तो विचारही करवत नाही.

आता इथे  आराम करायला सवड नव्हती. तासाभरात आम्ही तयार झालो. ९ वाजता गोलघराला खेटून गंगाजल प्रदर्शन उभ राहील होतं. हे गोलघर उलटया करवंटीच्या  आकारासारखं आहे. अगदी वरपर्यंत चढून जाण्यासाठी पायर्‍या बांधल्या  आहेत. वरून पाटणा शहर आणि गंगा नदी यांचा नजारा पाहायला मिळतो. आतमध्ये धान्याचं गोदाम  आहे. ऐतिहासीक वास्तू असल्याने शालेय सहली नेहमी येत असतात. शालेय विध्यार्थी तसेच महाविद्यालयीन तरूणांची वर्दळ प्रदर्शनाकडे वाढली. गंगेच्या संवर्धनासाठी काम करणाया काही संस्थांचे सभासद असलेले काही तरूण मंडळी भेटली. हे प्रदर्शन इथल्या शाळा व महाविवद्यालयात लावण्याची इच्छा प्रगट केली. त्यानी त्यांचे संपर्क तसेच अभिप्राय नोंदवले. ‘अभियान इंडिया’ या संस्थेचे संजय कुमार हे म्हणाले “गंगानदी  आपल्या संस्कृतीच प्रतीक आहे. गंगानदीच राहीली नाही तर आपली संस्कृती  आपला देश तरी राहील काय?”  दूपारी २ च्या दरम्यान प्रदर्शन बंद करून  आम्ही सगळेच कलेक्ट्रीघाटाकडे गेलो. एक मोटरबोट भाडयाने ठरवून गंगेच्या पात्रातून प्रवास करीत छायाचित्रणाच संकलन केल. बासघाटाजवळचा मोठा नाला सगळया पटण्याची घाण गंगानदीत सोडताना दिसला. लहानमोठे अनेक नाले पात्रात  वाहताना दिसत होते. स्मसानाची राख गंगेतच ठाकली जाते असल्याच बोटवाल्याने सांगितले. एके ठिकाणी मोठा स्टिमर उभा असलेला दिसला. ‘गंगा विहार’ असा मोठा फलक त्यावर लावलेला होता. ‘गंगा’ जलपर्यटनाकडे विदेशी पर्यटकानां खेचण्याचा सरकारी प्रयत्न दिसला. इथेच गंगानदीवर महात्मा गांधी सेतू  आहे. अशियाखंडातील सर्वात लांब सेतू म्हणुन त्याची गणना होते.

संध्याकाळी ५ वाजता गाधी मैदानात गंगाजल प्रदर्शन लावलं. मुंबईच्या शिवजीपार्क पेक्षाही मोठ असलेल्या मैदानात शिवजीपार्क इतकीच लोकांची गर्दी सध्याकाळी होते. प्रदर्शनाला अपसूकच गर्दी झाली. जलपर्यटन विभागात काम करणा-या एक तरूणाने आमच्याशी संवाद साधला. विवेक कुमार हे त्याच नाव. आता प्रक्रिया उलट होत होती. आता पर्यंत आम्ही लोकांशी संवाद साधत होतो. लोक आमच्याशी संवाद साधत होते. जल पर्यटन विभागातील  प्रमुखा पर्यंत या अभियानाची माहिती पोहचवण्यासाठी  माहितीपत्रक तसेच ब्रोशर विवेकने घेतले. अनेकांनी अभिप्राय देऊन आमचा उत्साह वाढवत या चळवळीत सहभागी होण्याची हमी दिली. गांधी मैदानात  आम्हाला कमी वेळ मिळाला. हा परिसर भारताच्या पुर्व भागात सल्याने मुंबईच्या मानाने सुर्यास्त लवकर होतो. सहा वाजताच अंधार वाटूलागला. तशा संधी प्रकाशातही लोक प्रदर्शन पाहत होते. पाटण्यातही लोक जोडली गेली होती. आता पुढचा टप्पा कोलकाता.

१२ मार्चला सकाळी ६ वाजता अम्ही पाटणा सोडलं. गया मार्गे कोलकात्याला निघालो. गयेतील गंगाजलचे सभासद अच्युत मराठे यांच्या घरी गेलो. त्यांनी दूपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पुढे झारखंड मार्गे पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश केला. हा दिवसभर केलेला प्रवास खुपच कंटाळवाना वाटला. आळस जाण्यासाठी मध्येच चहापाण होत  होते. दुसया दिवसी पहाटे ३ वाजता कोलकात्याला पोहचलो. हाजरा रोडवर असलेलं महाराष्ट्र निवास शोधयला थोडा त्रास झाला. कोलकात्यातील गंगाजलचे सभासद यशवंत सागडयांशी आधीच बोलण झालं होतं. ते महाराष्ट्र निवासात व्यवस्थापक म्हणुन काम करतात. केवळ महाराष्ट्रातच परप्रांतीय येतात अस नाही तर ब-याच परप्रांतात मराठी माणूस सूध्दा पिढयानं पिढया राहतोय. एवढया पहाटे सागडे आमची वाट पहात होते. महाराष्ट्र निवासात आमची व्यवस्था झाली. दिवसभराच्या प्रवासाने थकवा आला होता. कधी झोप लागली कळलसुध्दा नाही.

१३ मार्चला ८ वाजता गजरामुळे जाग आली. एका तासाभरात आमची तयारी झाली. सागडे डयुटीवर हजर होते. आमच्या चहा फराळाची व्यवस्था केली होती. बंगाली बांधवाचे श्रध्दास्थान म्हणजे कालीमाता, तीच्या मंदिरा जवळच  प्रदर्शन लावायच होतं म्हणजे जास्तीजास्त लोकां पर्यंत गंगासंवर्धनाचा सेदेश पोहचणार होता. एक प्रदर्शन कालीघाटावर लावयचं तर दुसर दक्षिणेह्णार घाटावर. आतापर्यंतची सकाळी ९ वाजता लागायचीच इथही तसच झाल. अभियानाच्या शेवटी  आळसामुळे ढिलाई येऊ द्यायची नाही असा आमचा कटाक्ष होता. कालीघाटावर मंदिराच्या सुरक्षेसाठी पोलीसांच कवच आहे. त्यांच्या परवानगीने मंदिराच्या जवळ प्रदर्शन लावलं. कालीच्या दर्शनासाठी झालेली गर्दी दर्शनानंतर प्रदर्शनाकडे वळली. पोलीसानीही  प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन पाहिल्यावर विचारपूस होत होती. अभिप्राय लिहले जात होते. शंका विवचारल्या जात होत्या त्यांच निरसनही केले जात होत. उन्मेश अशोकला घेवून कालीघाटाच चित्रीकरण करून आला. आम्ही सगळयानी मनोभावे कालीमातेच दर्शन घेतल. दुपारच्या जेवणानंतर दक्षिणेह्णार घाटावर पोहचलो.

कालीघाटा पेक्षा खुपच स्वच्छ असा हा परिसर तितकाच वर्दळीचाही वाटला. प्रदर्शन लावतानाच गर्दी होऊ  लागली. कालीघाटावर तळागळातील लोकांचा जास्त प्रतीसाद होता. मात्र येथे उच्चप्रभू आणि शिक्षीत लोकांची चहलपहल जास्त होती. कोलकात्यात गंगेला हुगळी म्हणतात. दक्षिणेह्णारच्या स्वच्छ, सुंदर वातावरणात स्वामी रामकृष्ण परमहंस   भरून राहिले आहेत असं वाटत राहिलं. इथेच कालीमातेनं रामकृष्णानां दर्शन दिल्याचं सांगितलं जातं. बारावीची परिक्षा देऊन कालीच दर्शन घेण्यासाठी आलेले काही महाविद्यालयीन तरूण भेटले. त्यानी गंगाजलचे सभासद होण्याची  तयारी दाखवली. या माध्यमाने जलसंवर्धनासाठी काम करण्याचा संकल्प सोडला. अनेक अभिप्राय तसेच सुचना यानी दक्षिणेह्णार घाटावरचं गंगाजल प्रदर्शन भरगच्च झालं. दरम्यान इथल्या एका फुलाच्या दुकानदाराशी चर्चा केली. हुगळीत  गाळाच प्रचंड वाढल्याच सांगत कारखदारांनाही तो शिव्या देऊ लागला. कारखाण्याचं रासायनिक सांडपाणी हुगळीच प्रदुषण वाढवतं  तसेच शहराच सांडपाणीसुध्दा प्रदुषणात भर घालते आहे. आम्ही काहीही करू शकत नसल्याची खंत वाटते. मात्र तुमचं हे प्रदर्शन पाहिल्यावर वाटतं हळुहळू का असेना पण बदल संभव  आहे.  आपल्या  अनेक मित्रांच्या सहकार्यने दबागट निर्माण करण्याच आश्वासन त्याने दिलं. कोलकाता पुर्वेला असल्याने सुर्यास्त लवकरच होतो. ६ वाजताच  अंधार पडायला लागला. त्या  अंधुक प्रकाशातही प्रदर्शन पाहणारे होते. हे किती दिवस राहणार अंसल्याची विचारणा होत होती. एकच दिवस असल्याच ऐकून चरचरत होते. काहीजण एक दिवस वाढवण्याचा अग्रह करीत होते. आमची अडचण त्यानां सागांवी लागत होती.

महाराष्ट्र निवासात साडेनऊ पर्यंतच जेवणाची व्यवस्था असते त्या मुळे आम्ही निवासात परतलो. उद्या गंगासागर या अभियानाचा शेवटचा पडाव. तिथे फक्त १४ जानेवारीस मकर संक्रातीला होणा-या गंगासागर यात्रेलाच लोक जातात. इतर वेळेस तुरळक गर्दी  असते. पण ‘जन जोडो गंगा भियानाची’ सांगता गंगासागरला होणार होती. कोलकाता ते ‘हाडहूड पाँइट’ (२४ परगना) इथ पर्यंत आमची टवेरा गाडी जाऊ शकली हे अंतर ७५ कि. मी. होतं. लॉट- ८ वरून स्टिमरने कुच्चुबेरीया फेरी घाटावर पोहचायला अर्धा तास लागला. हे अंतर सागरी ८ मैल होत. दिल्लीहून निघाल्या पासून एकाच गाडीने आमचा प्रवास झाला होता. इथे मात्र आम्हाला दुसरी सुमोगाडी घ्यावी लागली. कुच्चुबेरीया फेरी घाट ते कपिलमुनी  आश्रम हे ३५ कि.मी. अंतर होत. एक तासाभरात आम्ही कपिलमुनी आश्रमा समोर हजर होतो तेव्हा दुपारचे २ वाजले होते. आता अशोक चक्रधर म्हणुन नव्हे तर गंगाजलचा सभासद म्हणुन काम करीत होता.   अगदीच तुरळक लोकाची गर्दी होती. आम्ही प्रदर्शन उभा करत सतानाच जे काही लोक होती ती जमा झाली. त्यातल्या   अनेकाना गंगाप्रदुषणाची ओळख आधी करून द्यावी लागत होती. काही लोक समझत असूनही आम्ही यात्रेकरू आहोत  आम्ही काय करणार ?  असा प्रश्न आम्हालाच विचारत होते. एक मोठा ग्रुप आला. बहुदा दाक्षिनात्य असावा. कोरडया नजरेन चालता झाला. कुठलाही अभिप्राय नाही. चर्चा नाही. पण अभियानाची सांगता कपिलमुनिच्या साक्षिने करायची होती. त्याच्यां एका शापामुळेच तर राजा भगिरथाने स्वर्गीय गंगेला पृथ्वीवर आणुन प्रदुषणाच्या खाईत लोटले होते. प्रदर्शन तसेच ठेऊन आम्ही गंगा आणि सागर यांच्या संगमस्थळाकडे गेलो. समोर अथांग सागर पसरलेला गंगासाग बेटाला आपल्या कवेत घेऊन गंगामाई सागरात विलीन होत होती. अनेक मंडळी या संगमात स्नान करीत होती. पुण्य पदरात पाडुन घेत होती. सुरेंद्र, अशोक आणि दीक्षितांनी गंगासागरात स्नान केल. उन्मेश आणि मी चित्रीकरणात व्यस्त होतो. गोमुखातील शुघ्द प्रदुषण विरहित गंगाजल सोबत आणले होते. मी दीक्षितानां बरोबर घेऊन गंगाजलाने भरलेलं पात्र बंगालच्या  अथांग सागरात मनोभावे  अर्पण केले. त्याच्या मागे भावना अशी होती की, आमच्या या खारीच्या प्रयत्नाने गंगा शुध्द होईलच असा आमचा दावा नाही की गंगा काठावरच्या लोकानां जागृत केल्याचा हमगंडही नाही. जी आमची जबाबदारी होती ती आम्ही पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला इतकच. भविष्यात कधीतरी कोणाच्यातरी प्रयत्नाने गोमुख येथील शुध्द, प्रदुषण विरहित गंगानदी या अथांग सागरा पर्यंत प्रवाहित राहो अशी आशा करून आमच्या ‘जन जोडो गंगा अभियानाची’ सांगता केली.

विजय मुडशिंगीकर

अध्यक्ष,

गंगाजल नेचर फाऊंडेशन, मुंबई

भ्रमणध्वनी ०९८६९०८६४१९

संकेतस्थळ-  http://www.gangajal.org.in/

ईमेल – admin@gangajal.org.in

Route of the Mission 'Jan Jodo Ganga Yatra - 201', 'Connecting people to the River Ganga'

Mission inaugurated by our legal advisor Shri Pradeepji Aggarwal at New Delhi

Mukhava

(Ganga Temple)

Mukhava - 1
Visitors viewing the Gangajal Photo Exhibition, Mukhava

Mukhava – 2

Mukhava – 3

River Ganga worrier team from Gangajal Nature Foundation, Mumbai.

Uttarakashi

(Kashiviswanath Temple)

Uttarakashi -
Visitors viewing the Gangajal Photo Exhibition, Uttarkashi

Our team stand up the exhibition.

Uttarkashi

Visitors viewing the Gangajal Photo Exhibition, Uttarkashi.

Students viewing the Gangajal Photo Exhibition, Uttarkashi

Visitors viewing the Gangajal Photo Exhibition, Uttarkashi

Students viewing the Gangajal Photo Exhibition, Uttarkashi.

Visitor’s feedback, Uttarkashi

Visitor’s feedback!

Hrishikesh

(Triveni Ghat)

Hrishikesh – 1

Hrishikesh – 2

Hrishikesh – 3

Hrishikesh – 4

Hrishikesh – 5

Hrushikesh - 6
Hrishikesh – 6

Media News about Mission !

Haridwar

(Subhash Ghat)

Haridwar – 1

Haridwar - 2
Haridwar – 2

Haridwar

Haridwar

Haridwar

Haridwar

Haridwar – 3

Haridwar – 4

Haridwar – 5

Haridwar – 6

Haridwar – 7

Gangajal Team

Gangajal Team

Kanpur

(Parmat Ghat)

Kanpur – 1

Kanpur – 2

Kanpur – 3

Kanpur – 4

Visitor’s feedback at Kanpur !

Drainage in the Ganga near Powar House at Kanpur.

Kanpur – 5

Kanpur – 6

Visitor’s feedback at Kanpur !

Kanpur – 7

Kanpur – 8

Kanpur – 9

River basin or dust bin ?

Drainage in the Ganga near Jajmou, Kanpur

Drainage in the Ganga near Jajmou, Kanpur

Near Golaghat, Kanpur

Lather Factory, Kanpur

Lather Factory, Kanpur

Lather transport, Kanpur

Lather transport, Kanpur

Lather dust bin, Kanpur

Local Ganga worriers with us.

Our appreciation Shri Umasankar Dixit from Kanpur.

Allahabad

(Leta Maruti Temple)

Allahabad – 1

Allahabad – 2

River basin or dust bin ?

Allahabad – 3

Allahabad – 4

Visitor’s feedback at Allahabad !

Allahabad – 5

Allahabad – 6

Allahabad – 7

Allahabad – 8

Allahabad – 9

Visitor’s feed back at Allahabad.

Banaras

Dashaswamedhghat

Banaras – 1

Banaras – 2

Banaras – 3

Banaras – 4

Visitors feed back at Banaras.

Banaras -5

Banaras – 6

Banaras -7

Banaras – 8

Banaras – 9

Banaras – 10

Banaras – 11

Banaras – 12

Banaras – 13

Banaras – 14

Banaras – 15

Banaras – 16

Banaras – 17

River Assi or drainage flow in the Ganga at Varanasi.

Banaras – 19

Banaras – 21

Banaras – 22

Banaras – 23

Banaras – 24

Banaras – 25

Banaras – 26

Banaras – 27

Banaras – 28

Banaras – 29

Banaras – 30

Banaras – 31

Banaras – 32

Banaras – 33

River Varana like drainage in the Ganga at Varanasi.

Patna

Golghar

Patna – 1

Patna – 2

Patna – 3

Patna – 4

Patna – 5

Patna – 6

Patna – 7

Patna – 8

Visaitor’s feed back at patna.

Patna – 9

Patna – 10

Patna – 12

Patna – 13

Patna – 14

Patna – 15

Patna – 16

Patna – 17

Patna – 18

Patna – 19

Patna – 20

Patna – 21

Patna – 22

Patna – 23

Patna – 24

Patna – 25

Patna – 26

'Mahatma Gandhi Setu' Asia's longestu Bridge.
‘Mahatma Gandhi Setu’ Longest bridge in Asia, Patna, Bihar.

Old Patliputra

Old Patliputra

Old Patliputra

Patna – 31

Patna – 32

Gandhi Ground.

Patna – 33

Patna – 34

Patna – 35

Patna – 36

Kolkata

Kalli ghat

Kolkata – 1

Kolkata – 2

Kolkata – 3

Kolkata – 4

Kolkata – 5

Kolkata – 6

Kolkata – 7

Kolkata – 8

Kolkata – 9

Kolkata – 10

Kolkata – 11

Kolkata – 12

Kolkata – 13

Kolkata – 14

Kolkata – 15

Kolkata – 16

Kolkata – 17

Kolkata – 18

Kolkata – 19

Kolkata – 20

Kolkata – 21

Kolkata – 22

Dakshineswar Ghat

Kolkata – 23

Kolkata – 24

Kolkata – 25

Visitor’s feed back from Kolkata.

Kolkata – 27

Kolkata – 28

Kolkata – 29

Visitor’s feed back from Kolkata.

Kolkata – 30

Visitor’s feed back from Kolkata.

Kolkata – 31

Kolkata – 32

Kolkata – 33

Kolkata – 34

Kolkata – 35

Kolkata – 36

Kolkata – 37

Kolkata – 38

Kolkata – 39

Lacky Ghat, Titaghar, Kolkata.

Lacky Ghat, Titaghar, Kolkata.

Back yard of Bellur Math.

Back yard of Bellur Math.

Kali Ghat

Ganga Bath, Kali Ghat

Ramchandra Goenka Ghat

Ramchandra Goenka Ghat.

Ganga Sagar

Journey by Car to Gangasagar.

Journey by Steamer to Gangasagar.

Journey by Steamer to Gangasagar.

Journey !

Visitors viewing the Gangajal Photo Exhibition, Kapilmuni Ashram, Gangasagar

Visitors viewing the Gangajal Photo Exhibition, Kapilmuni Ashram, Gangasagar

Visitors viewing the Gangajal Photo Exhibition, Kapilmuni Ashram, Gangasagar

Kapilmuni Ashram, Gangasagar, West Bengal.

Sacred Confluence of the river Ganga and Bay of Bengal, Ganga Sagar.

Sacred Confluence of the river Ganga and Bay of Benga, Ganga Sagar.

Sacred Confluence of the river Ganga and Bay of Benga, Ganga Sagar.

We carried pollution free Gangajal (water of the river Ganga) from  starting point of Ganga ‘Gomukh’, poured in the Bay of Bengal as a wish that one day mother Ganga will come at Gangasagar as pollution free River.

Head of the Mission Vijay Mudshingikar

Mission Coordinator Surendra Mishra

The Ganga Worrier Team from Gangajal Nature Foundation, Mumbai

The Ganga Worrier Team from Gangajal Nature Foundation, Mumbai

जल नही तो कल नही !

Save Ganga Save India !

हमे चाहीये निर्मल धारा !

नही चाहीये गंदा नाला !

जलच् जीवनम् !

Water is Life !

बहुमोल : तूर्तास झाडे वाचली !

picfornewslettolive-treesझाडांना जीव आहे, फक्त ती हालचाल करू शकत नाहीत आणि सामान्यांच्या भाषेत बोलू शकत नाहीत एवढेच! पण त्यांची भाषा मला समजू लागली होती. कारण नाशिक-धुळे महामार्गावर तुटणारी झाडे रात्रं-दिवस आक्रोश करून सर्वकाळ माझ्याशी केविलवाणी बोलू लागली. त्यांना जाणवणारी वेदना व भीती मी स्वत:ला त्यांच्या जागी मानून अनुभवली. त्यामुळेच त्यांची काढली जाणारी साल, त्यांच्यावर पडणारे कुऱ्हाडीचे घाव, प्रत्येक उन्मळून पडणारे झाड पाहिले की त्रास होतो. त्यातूनच २००६ सालच्या एप्रिल महिन्यापासून आम्ही याच विषयावर ढिम्म अजगराप्रमाणे असलेल्या सरकारी, निमसरकारी यंत्रणांशी लढायला सज्ज झालो. भिवंडी-धुळे या महामार्गावरील तुटणारी झाडे वाचवावीत म्हणून आम्ही एप्रिल २००६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (४१/२००६) दाखल केली. या मार्गावरील तब्बल साडेचार हजार झाडे तुटली होती, नाशिक महापालिकेच्या हद्दीतील आणखी तेवढीच तुटणार होती. त्या विरोधात लढायचे ठरविले. त्यासाठी माहिती गोळा करतानाही अनेक अडथळे आले. नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन मंत्रालय, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण यांच्याकडे माहितीच्या अधिकारात वृक्षतोडीबाबत माहिती मागितली, पण त्यांनी दाद लागू दिली नाही. मी आणि ऋषीकेश नाझरे हा माझा सहकारीही मध्यमवर्गीयच! पैसे कुणाकडेच मागायचे नाहीत आणि पैसे संपले की थोडे दिवस काम बंद असे धोरण आम्ही अवलंबले. अनेकांनी घरी, ऑफिसात बोलावल्यावर आशेने जायचो, पण काही मिळाले नाही तर निराश होऊन तसेच मुकाट माघारी परतायचो. एक कायमस्वरूपी प्रश्न पर्यावरणावर लढा देणाऱ्यांना विचारला जातो की ‘विकासाला तुम्ही विरोध का करता?’ हाच प्रश्न मुंबई हायकोर्टाने आम्हाला विचारला. त्याला उत्तर म्हणून आम्ही भिवंडी ते धुळे दरम्यानच्या ४५० किलोमीटर महामार्गाची छायाचित्रे काढली- संपूर्ण उजाड बनलेला मैलोन् मैल रस्ता कॅमेऱ्यात पकडला. या छायाचित्रांबरोबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने झाडे वाचवून, पुनरेपण करून व पुनर्लागवड करून तयार केलेल्या सुंदर रस्त्याचे फोटोही काढले. ही दोन्ही प्रकारची छायाचित्रे शेजारी-शेजारी ठेवली, मग नेमके मला काय म्हणायचे ते कोर्टाला ताबडतोब समजले. जोडीला माहितीच्या अधिकारातून जमवलेले पुरावे जोडले होतेच.

एका सरळ रेषेतील झाडे का वाचवली जात नाहीत, जिथून रस्ता होणार नसतो त्या बाजूचीपण झाडे का कापली जातात, लाकडाची वखारवाले २०-२० किलोमीटर लांबीचा रस्ता एकमेकांत वाटून घेऊन अर्निबध वृक्षतोड कशी करतात, १५०-२०० वर्षे वयाची वडाची, पिंपळाची, चिंचेची झाडे नष्ट झाल्यावर होणारी हानी कशी भरून निघणार, असे बरेच प्रश्न आहेत. बरे या स्थानिक व महावृक्षांच्या बदल्यात कण्हेर, बोगनवेलची लागवड कशी काय ग्राह्य़ धरली जाते? झाडे पुनर्रोपण (Transplant) करताना त्या विषयाच्या तज्ज्ञांची मदत का घेतली जात नाही? शासनाने पुनरेपण केलेली सर्वच्या सर्व झाडे कशी काय मरतात, असे माझे प्रश्न होते. त्याला उत्तर म्हणून आम्ही स्वत: १०० वर्षे वयाच्या व ३०-४० फुटाच्या वडाच्या चार-पाच झाडांचे दोन क्रेन एक जेसीबी व मोठ्ठा ट्रेलर लावून नाशिकजवळ सातपूर व भगूर येथे पुनरेपण केले. बुरशीनाशक जंतुनाशके, प्रोटिन पावडर व सर्वात महत्त्वाचे टँकरद्वारे पाणी घातले. सांगायला आनंद वाटतो की सर्व ‘बाळे’ सुदृढ व ठणठणीत आहेत. वड, पिंपळ, उंबर ही फायकस जातीची झाडे आहेत. त्यांचे पुनरेपण शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास १०० टक्के यशस्वी होतात, आम्ही कडुलिंबाचेपण १०० वर्षांचे झाड पुनरेपण केले आहे. पर्यावरणाच्या भविष्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
आमची ही धडपड गेल्याच महिन्यात फळाला आली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी झाडे तोडण्यास स्थगिती दिली. झाडे तोडण्याआधी एकास तीन या प्रमाणात १५ हजार झाडे लावा. विकासाच्या कामांसाठी पर्यावरणाचा विनाश करू नये आणि झाडे कापण्याआधी ती ‘झाडे जतन व संवर्धन १९७५’ या कायद्यानुसार स्थानिक झाडे लावावीत, असा निर्णय दिला. यात महाराष्ट्र शासनाने लागवडीची झाडे ही १० सेंटिमीटरपेक्षा जास्त घेराची आणि ९-१० फूट उंच असावी हा अगदी ताजा निर्णय या नागपूर अधिवेशनात केला आहे. त्यामुळे आम्हाला काहीसा उत्साह वाढला. असे वाटू लागले की या कायद्याची अंमलबजावणी करायला शासनाला आपणच भाग पाडले पाहिजे.
जागतिक तापमान वाढीमुळे, वाढणाऱ्या प्रदूषणामुळे कुठल्याही झाडावर कोणा एकाचा वा भारत सरकारचा अधिकार नाही तर प्रत्येक झाडावर जागतिक मालकी आहे. रस्त्यासाठी, धरणांसाठी, खाणींसाठी ऊर्जाप्रकल्पांसाठी मोठय़ा प्रमाणावर पर्यावरणाचा विनाश होत आहे. धरणे गाळाने भरत आहेत. पाणलोट क्षेत्रात झाडेच लावली जात नाहीत. अन्य पशू-पक्षी विस्थापित किंवा नष्टच होत आहेत. सरकार निष्क्रिय आहे. समुद्र किनाऱ्यावरची अनेक गावे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. अशा विकृत नियोजनशून्य, पर्यावरणाच्या मुळावर घाव घालून, भकास करून केलेल्या विकासाचा उपयोग आम्हाला जरूर होईल जर आम्ही शिल्लक राहिलो तरच!

अश्विनी इनामदार-भट,

ashwini.bhat97@gmail.com

साभार लोकसत्ता.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=49878:2010-02-22-16-10-04&catid=96:2009-08-04-04-30-04&Itemid=108

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Did you know ?

Did you know ?

The world generates incredible 400 billion tons of industrial waste each year.

Our planet is so heavily polluted and we are not doing enough to prevent further pollution. Every single day different waste is being dumped into our oceans, rivers, seas.

How & Who forbidden it ?