
गंगाजल प्रदर्शनाचे अवलोकन करताना ज्युलियन हाँलिक.
एक दिवस सकाळी उल्हास लाटकर यांनी फोन करुन ज्युलियन हाँलिक यांच्या गंगा या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवादीत पुस्तक प्रकाशित करित असल्याचे कळविले. त्याचा मराठी अनुवाद महाराष्ट्र टाइम्सचे जेष्ट पत्रकार लेखक श्री. प्रकाश अकोलकर यांनी केल्याचे सांगितले. ‘गंगाजलच्या’ संकेतस्थळावरुन माझ्या विषयी कळल्याचे त्यांनी सांगितले. मनात उत्सुकता होती. पुस्तक वाचले.
ज्युलियन हाँलिक यांच गंगाप्रेम पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत.
केवळ थेम्स नदीच्य काठी बालपण गेल या पार्श्वभूमीवर एक विदेशी त्यांना गंगानदीचे आकर्षण निर्माण होते. आणि ते आपल्य आयुष्यातील वीसवर्षे, भारताची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी महानदी गंगानदी हीच्यावर अभ्यासार्थ खर्ची घालतात. आपली निरीक्षणे,अंदाज, निष्कर्ष तसेच प्रदूषणावर काम करणा-या अनेक स्वंयसेवी संस्था तसेच व्यक्ती यांच्यासी संवाद साधतात. त्या सगळ्यांची मतं संकलीत करतात. शासकीय संस्था तसेच आधिकारी व मंत्री यांच्यासीही संवाद साधतात. त्या बरोबरच ते सर्वसामान्यंनाही विसरत नाहीत त्यांचा गंगानदी विषयीचा आदर हळूवार शब्दात मांडतात. गंगनदीचा पौराणिक संदर्भ तिचे धार्मिक महत्व याचे पदर उलघडण्या बरोबरच शेतीसाठी गंगानदीच्या पण्याचा होणार अतीवापर तसेच कारखानदारी व नागरी वस्त्याच्या सांडपाण्यामुळे होणा-या गंगाप्रदूषणावर ते टीकेची झोंड उठ्वतात. तितक्याच हळुवारपणे गंगाजलातील अगम्य गुढ, त्याला आपण अम्रुत का म्हणतो ते उलघवडण्याचा भावस्पर्षी प्रयत्न करतात. आणि तेवढ्याच कठोरपणे गंगेच देवत्वच कसं गंगानदीच्या मुळावर आलयं ते पटवूनही देतात.

'जन जोडो गंगा यात्रा' जन जागरण अभियाना बाबत चर्चा करताना ज्युलियन हाँलिक.
कानपूर ते कोलकोता हा प्रवास बोटीतून करण्यासाठी लागणा-या अनुमतीसाठी केंद्रसरकारच्या प्रशासकिय अधीका-याच्या भेटी दरम्यान ‘फराक्का’ बाधांच्या संदर्भात काहिही न लिहीण्याची प्रशासकिय अधीका-याची सूचना फेटाळून केवळ सर्वसामांन्य भारतीयांना कळावे म्हणुन बिहार मधील आजच्या पूरस्थितीला जाबादार असलेल्या ‘फराक्का’ बांधावर आभ्यसपुर्ण असे एक प्रकरण लिहितात.
अशा या गंगावेड्या फिरंग्याची ओळ्ख करून द्यायची झालीतर, बी बी सी चा सजग पत्रकार आणि लेखक, रेडिओवरील अनेक कर्यक्रमाचे निर्माते, इस्लाम आणि साउथ एशिया याविषयावरील रेडिओसाठी बनविलेल्या मालिकानां विविध पुरस्कार मिळाले आहेत्. मँसँच्युसेट येथे ना नफा या तत्वावर सुरू असलेल्या इंडपेन्डंट ब्राँडकास्टिंग असोसीअस या कंपणीचे संस्थापक,बी बी सी रेडिओ, बी बी सी वर्ल्ड सर्विस तसेच टोरोंटो येथील बी बी सी रेडिओसाठी अनेक कर्यक्रम स्वतंत्रपणे सादर. स्मिथ्सेनिअन मँगेझिन द न्यू रिपब्लिक या नियतकालिकामधे भारता विषयी विपूल लिखाण. द टाइम्स आँफ इंडिया आणि द हिन्दू या व्रुतपत्रांचे स्थंभ लेखक, अशी करून देता येईल.
आणखी उशिर होण्यापुर्वी या नदीला श्वास घ्यायची फुरसत द्यायला हवी. त्या साठी संघटित लोकश्क्तीचा दबाव आणून राजकिय इच्छाशक्ती या प्रश्र्नाकडे वळवणे, हाच गंगानदील वाचव्ण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. गंगामाईला वाचवणे आता सर्वसामान्यांच्या हातात असल्याच ते प्रांजळपणे सांगतात. त्यांच पुस्तक वाचल्या पासून त्यांना भेटन्याची इच्छा मनात होती.
गंगामाईला वाचवणे आता सर्वसामान्यांच्या हातात असल्यान त्यांनाच जाग करण्याचा संकल्प सोडला तो जन ‘जोडो गंगा यात्रा’ या जनजागरण आभियानाच्या माद्यमाने. मार्च २०१० मध्ये गंगानदीच्या उगमा पासून ते गंगासागरा पर्यंत गंगाकाठावर ‘गंगाजल’ छायाचित्र प्रदर्शनाच्या माद्यमाने सर्वसामान्यांना गंगानदी सोबत जोडण्याचा प्रयत्न ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’ करणार आहे. या उपक्रमाची माहिती ज्युलियन हाँलिक यानां मेल द्वारे कळवले व या अभियानात सहभागी होण्याची विनंती केली असता त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. एवढेच नाही तर फेब्रुवारी-मार्च म्ध्ये भारतात असून कानपूर येथील कार्यक्रमात सहभागी होण्याच अश्वासनही दिले. काल झालेल्या त्यांच्या सोबतच्या बैठकीत त्यांनी ‘गंगाजल’ या छायाचित्र प्रदर्शना विषयी समाधान व्यक्त केले. या गंगापुत्रा सोबत चर्चा करताना भाषेची अडचण होती. ती, माझे मित्र गंगाजल चे सभासद श्री. नरेंद्र प्रभू यांच्यामुळे दूर झाली.
Recent Comments