gangajal blog

Gangajal Nature Foundation's Blog, http://www.gangajal.org.in



Archive for February, 2010

Ganges river becoming more salty !

without comments

Ganges river is the largest river in India, and home of many unique ecosystems. However these ecosystems could soon come under great threat because rising sea levels are causing salt water to flow into India’s biggest river. This is happening because sea levels in some parts of the Bay of Bengal were rising at 3.14 mm annually against a global average of 2 mm, and if temperatures continue to rise not only Ganges will become more salty but also large number of population in Indian subcontinent will be severely hit with more frequent and more powerful natural disasters such as floods and storms, which will very likely result in more disease and more hunger.

Ganges river, the largest river in India, does not only have problem with pollution but is also becoming more salty because of sea levels rise.

Indian university in the city of Kolkata that published this study was very surprised with the discovery of the mangrove plants, a rare phenomenon along the Ganges river belt, that usually live 100 km (60 miles) away in the swampy Sundarban archipelago spread over a 26,000 sq km (10,000 sq mile) area on the world’s largest delta region. They also spotted more saline water fish in the river as Ganges river is becoming more and more salty. It looks like Ganges river does not only have problem with pollution but also with salinity.

Courtesy

http://pollutionarticles.blogspot.com/search/label/Ganges

I QUIT….

without comments

Written by Rohan Mudshingikar

February 27th, 2010 at 11:06 pm

Ocean pollution – A really big problem!

without comments

Many people aren’t still aware that ocean pollution is a major problem that isn’t only affecting the ocean but the rest of the Earth as well. Ocean pollution directly affects living organisms in ocean and indirectly humans and their health. There are many sources of pollution and the most dangerous is illegal dumping, especially of poisonous materials. This illegal dumping is unfortunately so, wide spread and is causing damage to many plants and animals in the ocean. On top of the food chain we could easily end up eating seafood that was harmed by some toxic materials before it came to our plates. Especially dangerous is the lead which can cause a lot of health problems, especially damaging brain and kidneys. Recycling is the right answer but unfortunately not for all people.

Dumping is the biggest problem but there are other problems as well like wastewater, use of pesticides and other chemicals in agriculture, which you definitely wouldn’t think of right away. Wastewater is a run-off from rainwater that ends up in rivers, lakes and oceans as well. Majority of people still don’t know that this run-off is going into the ocean at daily bases in small amounts which are piling hence creating a major problem. Agriculture is also harmful to the ocean because pesticides and other dangerous chemicals are taken off of the plants and carried to the oceans when it rains.

Oil pollution also has tremendous affects on oceans and presents real dangers in form of tankers and their possible failure or crash which could lead to oil leakage as it was the infamous Exxon Valdez incident. In this accident 10.8 million gallons were spilled, causing deaths of many animals, including 250,000–500,000 seabirds, 2,800–5,000 sea otters, approximately 12 river otters, 300 harbor seals, 250 bald eagles, and 22 orcas, as well as the destruction of billions of salmon and herring eggs.

Oil spill cleaning efforts usually need months or even years to clean up the polluted area and by the time cleaning is done many fish species, seabirds and even some mammals had already died because of it. And as the scientific results in infamous Exxon Valdez oil spill showed effects are far more lasting than it was expected, and some habitats may take more than 30 years to recover, which is very long time so you can imagine total negative impact on affected ecosystems.

Global warming is another major problem and is concerning oceans as well. Global warming causes the water to rise and when it rises, it covers low land islands with plants, animals, and even some people’s homes on them. This can hurt animals in the different layers of the ocean. Other problem is warm water that is killing some algae which can’t stand this temperature, and this has effect on complete food chain because there are some fishes that eat these algae, meaning they don’t have food, some other fishes eat this fishes meaning they don’t have food as well, etc, and the food chain is irreversibly broken.

There are indeed many problems but not that many answers because all ecological problems are connected on the global scale and therefore solving one of them isn’t completely possible without solving all of them, which is at this moment almost impossible task. Public conscience still isn’t on the required level, scientists’ warnings aren’t still seriously understood and legislation is insufficient and not strict enough. There’s also need for global action, because world is one big community and some individual action won’t solve anything, although it could point out way the things should go to. Now, will this way be followed and by whom it remains to be seen. We can only hope for the best and contribute as much as we can.

ocean_pollution

Ocean Pollution

Ocean pollution happens every day and is harmful to many sea plants and animals and eventually to the human health as well.

Courtesy

http://pollutionarticles.blogspot.com/2007/11/ocean-pollution.html

परिसर : हमी पर्यावरणाचीसुद्धा!

without comments

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण भागात हक्काचा रोजगार तर उपलब्ध होणारच आहे. या योजनेचा व्यापक पातळीवर विचार केला तर ती पर्यावरणरक्षणासाठीही उपयुक्त ठरणार आहे. पाणी व जलसंधारणाची कामे नियोजनपूर्वक हाती घेतली तर राज्यातील बऱ्याचशा ओसाड भागावर पाणी व त्याद्वारे हिरवाई बहरेल. त्यातून पर्यावरणाचीसुद्धा हमी लाभेल.. महाराष्ट्रात उदयाला आलेली रोजगार हमी योजना म्हणजे आपल्या राज्याने संपूर्ण देशाला दिलेली देणंच. १९७२ सालच्या दुष्काळाच्या काळात सुरू करण्यात आलेली ही योजना २००५ साली देशाने स्वीकारली. त्यातूनच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा बवनिण्यात आला आणि संपूर्ण देशभर ग्रामीण भागातील कुटुंबास किमान १०० दिवसांचा रोजगार मिळविण्याचा हक्क प्राप्त झाला. महाराष्ट्राने कायदा केला तेव्हा रोजगारनिर्मिती हा प्रमुख उद्देश होता. आता मात्र जल संधारणाच्या कामांवर भर देऊन स्थानिक रोजगार निर्मिती असे या कायद्याचे साधारण स्वरूप आहे. त्यामुळेच त्याचा योग्य उपयोग करून घेतला, तर एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करणे शक्य होणार आहे. रोजगाराच्या निमित्ताने पाण्याची कामे करता येतील आणि अप्रत्यक्षरीत्या पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्टही साधता येईल.
सध्या महाराष्ट्रातील साधारणत: १७ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे. म्हणजेच उरलेली ८३ टक्के जमीन कोरडवाहू आहे. या भागात मुख्यत: केवळ पावसाळ्यातच शेती करणे शक्य असल्याने त्यानंतर लोकांचे रोजगाराच्या दिशेने स्थलांतर करतात. नाइलाजाने स्थलांतर करणाऱ्या लोकांसाठी, या कायद्यातील तरतुदी अत्यंत उपयुक्त आहेत. गावाजवळ रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी या कायद्यात आहे. या कामांमध्ये जल व मृद संधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामागचा उद्देश एवढाच की या कामांमुळे त्या-त्या भागात पडणारा पाऊस अडवण्याच्या, जिरवण्याच्या व साठवण्याच्या व्यवस्था निर्माण व्हाव्यात, जेणेकरून या पाण्याच्या आधारावर वर्षांतून जास्तीत जास्त काळ शेतीत उत्पन्न मिळविणे शक्य होईल. त्यातूनच अप्रत्यक्षरीत्या स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल.
सिंचनाचा पारंपरिक विचार म्हणजे धरण बांधून पाण्याचा मोठा साठा निर्माण करणे आणि पाणी उपलब्ध करून देणे. मोठय़ा धरणांमुळे पर्यावरणाची हानी होते व त्याचे अनेक इतर सामाजिक परिणाम आहेत. अशाप्रकारचे केंद्रीकरण हे मुळात पर्यावरणीयदृष्टय़ा हानीकारक आहे. सध्या हे आपल्याला शहरीकरणाच्या रूपाने दिसतच आहे. त्यामुळे पाणी विकेंद्री पद्धतीने म्हणजे ज्या-त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर साठवून स्थानिक उत्पादकता वाढवणे हा विकेंद्रीकरणाच्या दिशेचा होणारा प्रवास आहे. त्यामुळेही तो पर्यावरणीयदृष्ट्या सुसंगतही आहे. इतकेच नव्हे तर त्यातून थेट पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक ठरणारी कामे करणेही शक्य होणार आहे. जलसंधारणाची कामे करताना पाणलोट क्षेत्र डोळ्यासमोर ठेवले व ही कामे तांत्रिकदृष्टय़ा योग्य असतील तर स्थानिक पर्यावरणाच्या संवर्धनाशी सुसंगत असा हा मार्ग आहे. माथ्यापासून पायथ्यापर्यंत ही कामे झाल्यास पावसाचे पाणी अडविणे व मातीची धूप थांबणे असा दुहेरी उद्देश साध्य होईल. रोजगार हमीद्वारे शेततळी, विविध प्रकारचे बांध, लहान तळी, सलग समतल चर अशी जलसंधारणाची बहुतांशी कामे करणे शक्य आहे.
सध्या रोजगार हमीचे स्वरूप ‘मागेल त्याला काम’ असे आहे. ज्या व्यक्तीस इतर रोजगाराच्या संधी नाहीत, त्या या योजनेचा लाभ घेतात. साहजिकच ज्या ठिकाणी तत्कालीन रोजगाराची गरज आहे, तिथेच ही कामे होतील अशी या कायद्यातच तरतूद आहे. त्यानुसार तत्कालीन गरज याला पहिले प्राधान्य असेल आणि त्यातून झालेच तर जलसंधारण व पर्यायाने निसर्गाचे संवर्धनही होईल. परंतु, या कामातून खरंच पाणलोटाची कामे होऊन गावात जास्त काळासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले तर गावाची उत्पादकता वाढेलच. त्याद्वारे या योजनेची अंमलबजावणी केवळ तत्कालीन रोजगाराच्या गरजेतून न होता त्यामागे जलसंधारण हाही व्यापक उद्देश असू शकेल.
निसर्गाच्या संवर्धनातूनच पाण्याचे उत्तम व्यवस्थापन शक्य आहे आणि मुख्यत: पाणी उपलब्धतेवर ग्रामीण भागातील उत्पादकता व सधनता अवलंबून आहे. राज्याच्या बऱ्याचशा भागात आजही नजर जाईल तिथपर्यंत पडीक जमीन, माळराने पाहायला मिळतात. सध्या या जमिनीचा कुठल्याही प्रकारे उपयोग केला जात नाही. अशा जमिनीवर रोजगार हमीतून योग्य पद्धतीने पाणी व मातीसंधारणाची कामे करता आली तर तिथे झाडोरा वाढविणे शक्य होणार आहे. वनस्पती आवरण वाढले की पाणी मुरण्याचे व टिकण्याचे प्रमाण वाढेल आणि पाणी जास्त काळ टिकले की वनस्पती आवरण वाढण्यासही फायदा होईल. या वाढणाऱ्या वनस्पतीतून सरपण तर मिळेलच, शिवाय चारा उपलब्ध होऊन दुभत्या जनावरांनाही फायदा होईल. सांगली जिल्ह्य़ातील खानापूर तालुक्यातील रेणावी व रेवणगाव ही गावे याची उत्तम उदाहरणे आहेत. या गावांमध्ये २००३-०४ च्या दुष्काळी वर्षांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत खूप मोठय़ा प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यात गावाच्या पाणलोटातील डोंगरापासून ते माळरानापर्यंत सलग समतल चर, नाला बांध, पाझर तलाव यांची निर्मिती तसेच, जुन्या पाझर तलावातील गाळ काढणे अशी कामे रोजगार हमीतून हाती घेण्यात आली. त्यातूनच ही गावे पाणी आणि त्यामुळे चाऱ्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली आहेत. त्या भागात पावसाळ्यानंतर लगेचच कोरडे पडणारे ओढे आता किमान ८ महिने प्रवाही बनले आहेत. रोजगार हमी योजनेचा योग्यप्रकारे उपयोग करून पाणी व हिरवाई मिळवता येते व टिकवून ठेवता येते, हे या उदाहरणांमधून स्पष्ट झालेच आहे. हेच ठीकठिकाणी झाले तर ते पाणी व पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.
मुळात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली रोजगार हमी योजना आता पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन व त्यातून स्थानिक रोजगार निर्मिती अशा तिहेरी उद्देशाने राबवली जाऊ शकते. योजना तीच व कामेही तीच, पण त्याकडे बघण्याची दृष्टी बदलली तर त्याच कामांची परिणामकारकता अनेक पटींनी वाढवता येते. सततच्या पाणीटंचाईने ग्रस्त व त्रस्त असलेल्या भागांतील या समस्यांना या दृष्टिकोनामुळे कायमची मुक्ती देता येऊ शकेल. एकदा पाणी मिळाले की एरवी उघडय़ा बोडक्या दिसणाऱ्या टेकडय़ा व माळराने हिरवी होऊन पर्यावरणही सुधारेल. त्यासाठी आवश्यकता आहे थोडा व्यापक विचार करण्याची! राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यातील तरतुदींमुळे या ग्रामपंचायतींना अनेक अधिकार मिळाले आहेत. या कायद्याचे आणखी महत्त्व असे की या कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद आधीच झालेली आहे. त्यामुळे यासाठी कुठलाही पुढारी किंवा अधिकाऱ्याकडे हात पसरण्याची गरज नाही. केंद्रीय कायद्यात जरी कुटुंबास किमान १०० दिवसाच्या रोजगाराची हमी असली, तरी महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तीस ३६५ दिवस रोजगारांची हमी आहे. त्यामुळे या कामांसाठी इतर योजनांसारखी निधीची मर्यादाही पडणार नाही. त्यामुळे सलग कामे हाती घेणेही शक्य होणार आहे. म्हणूनच या गुणी योजनेचा योग्य उपयोग करून घेतला तर त्याद्वारे राज्याचे पर्यावरण निश्चितच सुधारेल.. आता गरज आहे ती व्यापक विचार करण्याची!

प्रियदर्शन सहस्रबुद्धे,

(‘निर्माण’ प्रतिनिधी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ)

साभार- लोकसत्ता.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=49877:2010-02-22-16-09-14&catid=96:2009-08-04-04-30-04&Itemid=108

पाणी जपून वापरणेच हिताचे !

without comments

पाणी टंचाई

पाणी टंचाई

तलावांमधील गढूळ पाणी शुद्धीकरण केंद्रांतून शुद्ध होऊन आपल्या घरी पोहोचल्यानंतर ते कसे वापरायचे हे ज्याचे त्याने ठरविले पाहिजे. सामाजिक भान राखून प्रत्येकाने काटकसरीने पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.
यंदा पाऊस कमी पडल्यामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीतही पाण्याचा जपून वापर करण्याकडे लोकांचा कल दिसून येत नाही. पाणी जपून वापरले नाही तर भविष्यात मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. अशा वेळी मुंबई

महानगरपालिकाही हतबल होईल. तलावांमध्येच पाणी नसेल तर पालिका मुंबईकरांना पाणीपुरवठा कुठून करेल. त्यामुळे नागरिकांनीच आता सजग होऊन ‘पाणी बचती’चा मूलमंत्र अवलंबायला हवा.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई झपाटय़ाने विस्तारत गेली. दिवसागणिक मुंबईच्या लोकसंख्येने कोटय़वधीचा आकडा पार केला. त्याबरोबर पाण्याची गरजह वाढत गेली. मात्र उपलब्ध जलसाठय़ांचा विस्तार मात्र पाहिजे तेवढय़ा प्रमाणात झाला नाही. आजघडीला मुंबईकरांची पाण्याची तहान भागविण्यासाठी प्रतिदिनी ४३०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रतिदिनी ३४०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा पाऊस कमी पडल्यामुळे मुंबईवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. महापालिकेतर्फे मुंबईला प्रतिदिनी २९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यातही पाणी चोरी आणि गळतीमुळे मुंबईकरांपर्यंत प्रतिदिनी २९०० दशलक्ष लिटर पाणी पोहोचतच नाही. त्यापैकी शेकडो दशलक्ष लिटर पाणी वाटेतच वाया जाते किंवा त्याची चोरी केली जाते.
महानगरपालिका मुंबईकरांना प्रतिदिनी प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी उपलब्ध करते. मात्र सध्या पाणीटंचाई असल्यामुळे प्रतिदिनी प्रतिमाणशी ९० लिटर पाणी पुरविले जात आहे. तर यापुढे मुंबई शहरात उभ्या राहणाऱ्या नव्या इमारतींना प्रतिदिनी प्रतिमाणशी ४५ लिटर पाणी देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच नव्या इमारतींमध्ये बोअरवेल, तसेच रेनवॉटर हार्वेस्टसारख्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही पालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. जेणेकरून नव्या इमारतींना पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी लागणारे पाणी सहज उपलब्ध होऊ शकेल.

महानगरपालिकेतर्फे मुंबईतील जुन्या चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घरगुती वापरासाठी २ रुपये २५ पैसे प्रतिहजार लिटर दराने पाणी उपलब्ध करते.

पाणी वाचवा !

पाणी वाचवा !

तर मुंबापुरीतील सोसायटय़ांना ३ रुपये ५० पैसे प्रतिहजार लिटर दराने पाणी पुरवले जाते. तलावातील पाणी शुद्ध करून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेला प्रतिहजार लिटरसाठी  ७ रुपये ८० पैसे इतका खर्च येतो. मात्र खर्चाच्या तुलनेत पालिका मुंबईकरांना अतिशय कमी दरात पाणी उपलब्ध करते. साडेतीन रुपये प्रतिहजार लिटर दराने पालिका पाणी देते. म्हणजेत पालिकेकडून मिळणाऱ्या एक लिटर पाण्याचा दर

अतिशय नाममात्र होते. पण बाजारात ब्रॅण्डेड कंपन्यांची एक लिटर पाण्याची बाटली मुंबईकर १२ रुपये दराने खरेदी करतात. १२ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केलेले पाणी मुंबईकर प्रवासात जपून वापरत असले तरी नाममात्र दराने पालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याची नासाडी करताना दिसतात. हे चित्र आता बदलायची वेळ आली आहे. सध्या पाणीटंचाई आहे म्हणून नव्हे, तर एकूणच पाण्याचे महत्त्व ओळखून ते जपून वापरणे गरजेचे आहे.
पाणीटंचाई असल्यामुळे सध्या महापालिका बोअरवेल खणण्यास परवानगी देत आहे. परंतु मोठय़ा प्रमाणावर बोअरवेल खोदले गेल्यास भूगर्भातील जलसाठय़ावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भूगर्भातील गोडे पाणी बोअरवेलच्या माध्यमातून काढल्यास ती जागा समुद्राचे खारे पाणी घेईल. असे झाले तर मुंबईकरांना गोडय़ा पाण्यासाठी वणवण करावी लागेल. त्यामुळे आता महानगरपालिका रेनवॉटर हार्वेस्टचे महत्त्वही मुंबईकरांना पटवून देऊ लागली आहे. पावसाळ्यात रेनवॉटर हार्वेस्टद्वारे जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरविले, तर भूगर्भातील जलसाठय़ांचे जतन होण्यास मदत होईल.
दरम्यान, यंदा पाऊस कमी पडला म्हणून तो दरवर्षीच कमी पडेल असे नाही. पुढील वर्षी समाधानकारक पाऊस पडल्यावर तलाव भरभरून वाहतील आणि पाणीटंचाईचे संकट दूर होईल. मात्र पाणीटंचाईचे संकट दूर झाले तरी मुंबईकरांनी भविष्यात पाणी जपूनच वापरायला हवे.

प्रसाद रावकर

prasad.raokar@expressindia.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

साभार – लोकसत्ता.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it