कित्येक वर्ष आपणच कोटी कोटी घाव घालून तिला घायाळ करून टाकलंय. तिला हीन-दीन-क्षीण करून टाकलंय. तिला धरणात अडकवलं, रासायनिक प्रदूषणानं भ्रष्ट केलं. इतके आघात सोसूनही ती मात्र आपल्या धर्माला जागतेय. गंगेच्या कोट्यवधी पुत्रांनी तिची कितीही अवहेलना केली तर ती मात्र कर्तव्याला चुकलेली नाही. आपलं काम ती तितक्याच नेटानं करतेय. कोट्यवधी भारतीयांना प्रेम आणि श्रद्धा या [...]
२००१ ते २००६ या कालावधीत गोमुख उगमापासून गंगासागपर्यंत गंगेच्या खो-यात फिरून आलेल्या अनुभवांचं संकलन म्हणजेच ‘पंचगंगा ते गंगा व्हाया मिठी’ हे पुस्तक. माझे मित्र आणि पर्यावरणप्रेमी नरेंद्र प्रभू यांनी या पुस्तकाचं शब्दांकन केलंय. लवकरच हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. मी मूळचा कोल्हापूरचा, करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी हे माझं जन्मगाव. पण माझं आजोळ वळीवडे हे पंचगंगेच्या [...]
Recent Comments