‘सायकलस्वारी’

17 Nov
2009

amsterdam-bicyclesसंजय मोने मिच्र्या-कोथिंबीर आणायला माहीमवरून चक्क सायकलने रानडे रोडला जातो, तर अविनाश खर्शीकरदेखील बँकेच्या कामासाठी सायकललाच पसंती देतो असे तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल ना! स्वत:ची चारचाकी गाडी असूनही व त्यांच्या पेशाला ती गाडी शोभेशी असूनही सायकलला इतकी अचानक पसंती का असा तुमचा प्रश्न असेल? पण या दोघांसह अजित भुरे व या तिघांचा आणखी एक मित्र धनंजय गोरे हे सध्या वरळी ते माहीम परिसरात चक्क सायकलवरून आपले बरेचसे व्यवहार करताना नजरेस पडत असून त्यामुळे अनेकांचे कुतूहल जागे झाले आहे. संजय मोने फार पूर्वीसुद्धा सायकल वापरायचा, पण आता पुन्हा सायकलला पसंती का असे विचारता, त्याच्या स्वभावानुसार पटकन म्हणाला, ‘एक किडा’ दुसरे काय? पण नंतर गंभीरपणे म्हणाला की, खरे तर आपल्याकडचे हवामान सायकलला साजेसे नाही. उन्हाळ्यात तर सायकलस्वारीचा खूप त्रास  असतो. पण दादर परिसरातील गर्दीत गाडी घेऊन सारखा हॉर्न वाजवत ट्रॅफिक जॅममध्ये अडकण्यापेक्षा ‘सायकल दी बेस्ट’. कुठेही, कशीही वळवता वा घुसवता येते. अगदी सायकलवर बसल्या-बसल्या भाजीदेखील खरेदी करता येते. सायकल चालवताना खूप अ‍ॅलर्ट राहावे लागत असल्याने मानसिक व्यायामही होतो आणि सायकल चालवायचा शारीरिक व्यायाम होतोच. सहज गप्पा करता करता मी व अजितने विचार केला की, या चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करूया, मोकळी हवादेखील मिळेल व लहानसहान कामेही भराभर करता येतील. आमचा ध्यास व त्याचे फायदे पाहून वर्षभरात १०० जणांनी सायकलला पसंती दिली तरी ते आमचे यश म्हणेन.
अजित भुरे तर एवढेही म्हणाला की, नव्या मॉडलेची गाडी म्हणजेच सोशल स्टेटस हे सेलिब्रिटीज्नी डोक्यातून काढावे व ओशिवरा, लोखंडवाला परिसरातील _41931998_delhi416_afpअनेकांनी सायकलला पसंती द्यावी. अवघ्या तीन हजार रुपयांत सायकल मिळते. अगदी स्टायलिश व पुढे सामानासाठी जागा असणारी सायकल १५-१७ हजार रुपयांपर्यंत मिळते. पण प्रदूषणापासून सुटका करते. आपले एक वेगळेपण राहते. सध्या एवीतेवी इतरांपेक्षा वेगळे काही करण्याचा ध्यास लागलाय. तर मग मोकळी हवा, व्यायाम व हौसमौज या त्रिसूत्रीचा फायदा देणारी सायकल घ्या. नकळत लहानपणीचे दिवसही आठवतील आणि सारखी गाडी बाहेर काढण्याचा त्रासही वाचेल. माझी ही सकारात्मक भूमिका पाहून माझे मित्र मला विचारू लागलेत, नवीन चांगली सायकल कुठे मिळेल? सेलिब्रिटीजचे अनुकरण खूप लवकर होते. ते अशा चांगल्या गोष्टीसाठी व्हावे..

किशोर धारगळकर

साभार- लोकसत्ता

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=22925:2009-11-12-15-22-36&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81


Comment Form

top