‘गंगाजल‘ नेचर फौंडेशनच्या वर्धापनदिनी
‘नदिमित्र‘ पुरस्काराने सन्मानीत श्री. अभिजीत घोरपडे यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर जे सादरीकरण केले तेव्हा छायाचित्रांच्या मध्यमातून सप्रमाण सिद्ध केलेले काही मुद्दे.
मांजरा, तापी, गोदावरी, कृष्णा, पंचगंगा या नद्या नव्हे तर गटारं झाल्या आहेत.
मेळघाटच्या जंगलातील नद्या सोडून महाराष्ट्रातील सर्व नद्या त्याच मार्गावर.
या सर्वच नद्य्यांमध्ये मानवीविष्टा, घनकचरा आणि उद्योगांची घाण.
श्रीमंतांकडून जास्त घाण, गरीबांचा कोंडमारा.
इचलकरंजीकर कृष्णेचं चांगलं पाणी उचलून पंचगंगेच्या आधिच घाण असलेल्या पाण्यात प्रदुषीत पाण्याची भर घालतात.
राज्यातल्या नगरपालिकांपाशी केवळ १% सांडपाणी शुद्ध करण्याची क्षमता तर महानगरपालिकापाशी केवळ १६% सांडपाणी शुद्ध करण्याची क्षमता. बाकी पाणी तसचं नद्यांमध्ये सोडलं जातं.
नफा थोडा कमी करून पाणी शुद्ध करण्याची मोठ्या उद्योगांची तयारी नाही.
पंचगंगेच्या किनारी मासेमारी करताना पुर्वी १५ ते २० प्रकारचे मासे मिळत, आता एकच प्रकारचा मासा मिळतो जो केवळ घाणपाण्यातच जगतो.
शिवाजी विद्य्यापीठाच्या एका अहवालाप्रमाणे गेल्या दहा वर्षात विस प्रकारचे मासे नष्ट पावले.
बेसुमार झाडं तोडली गेली.
बहुतेक नद्या हिवाळ्यातच कोरड्या.
पाण्यावरील तैलपदार्थ, आणि जलपर्णी मुळे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी.
नदीच्या वाळूवर (डांगर वाडीत) होणारा भाजीपाला आता होत नाही.
वाळूचा बेसुमार उपसा होत असल्याने नदी पात्राची झिज त्यामूळे नद्यांवरील पुलांना धोका.
नद्यांचं स्वरूप बारमाही ते हंगामी.
भुजल पातळीत घट.
अतिक्रमणांचा विळखा.
पुराचंपाणी सर्व शहरात आणि मोठ्या गावात पसरतय.
नदी पात्रातून लाटलेल्या जागांपेक्षा कितीतरी मोठ्ठ नुकसान.
प्रदुषण नियंत्रण मंडळाने डोळ्यांवर कातडं ओढलं आहे.
हे सर्व रोखण्यासाठी जनजागृती आणि निवडणूक आय़ोगा सारख्या बलशाली व सर्वसमावेषक यंत्रणेची गरज.
नरेन्द्र प्रभू
Recent Comments