चला पंचगंगा वाचवू या !
पंचगंगेला प्रदूषणाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी कोल्हापूर व इचलकरंजीवासीयांनी पंचगंगा बचाओ अभियान यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. गेले १५ दिवस “सकाळ’ने पंचगंगेचे अस्तित्व संपवून टाकणाऱ्या प्रदूषणाविषयी वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला. यातून प्रेरणा घेऊन प्रशासनाला जागे करण्यासाठी मंगळवारी (ता. ३) “सकाळ’च्या पुढाकाराने आयोजिलेल्या पंचगंगा बचाओ अभियानात सहभागी होऊन अभियान यशस्वी करू या. त्यासाठी सकाळी अकरा वाजता सर्वांनी दसरा चौकात जमावयाचे आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रदूषित पाणी वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे.
“सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर शहराबरोबरच शिरोळ, जयसिंगपूर, इचलकरंजी व काठावरील २४ गावे, विविध संघटना पंचगंगा बचाओ अभियानात सहभागी होत आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट बस असोसिएशन, अरिहंत पतसंस्था, शंभूराजे मर्दानी खेळ, समीर ऍडव्हेंचर ऍन्ड ट्रेकर्स, कोल्हापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, जादू ग्रुप, राज ग्रुप, नाथा गोळे तालीम आदी संस्था या अभियानात सहभागी होत आहेत. शिवाय शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठातील
विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी आपण पाऊल उचलले तरच भविष्यकाळ सुखकर होणार आहे. हा प्रश्न जिल्हा प्रशासन, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, राज्यकर्ते, नियोजनकर्ते यांच्यावर दबाव टाकून सोडविला पाहिजे. म्हणूनच
सर्वांनी पंचगंगेबाबत आत्मभान जागृत करावयाचे आहे. त्यासाठीच मंगळवारी होणाऱ्या या अभियानात आपण मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज आहे.
पंचगंगा वाचविण्याचा संकल्प सर्वांनीच केला आहे. या अभूतपूर्व अभियानात येण्यासाठी आपल्या गल्लीत, शेजाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना जरुर सांगा. हात से हात मिलाकर… आपण एकत्र येऊ या आपली आणि भावी पिढ्यांची ती मोठी गरज आहे.
साभार- ई सकाळ
http://beta.esakal.com/2009/03/01235226/panchganga–pollution-issue.html
http://beta.esakal.com/2009/03/02224219/kolhapur–panchganga-polluti.html
http://beta.esakal.com/2009/02/27193701/panchganga-pollution–raju-sh.html
gangajal blog

दैनिक सकाळचा हा उपक्रम स्तुत्य आहे. लोकसहभागातूनच अशा समस्यांवर उपाय सापडू शकतो.
नरेंद्र प्रभू
2 Mar 09 at 9:48 pm