गंगाजल नेचर फाऊंडेशनचा ‘नदी मित्र’ पुरस्कार !

27 Mar
2009

mmmनद्यांन मातांची उपमा दिली जात असली तरीही आज नद्यांची अवस्था भयावह आहे.गंगेसारख्या पवित्र मान्ल्या गेलेल्या नदीची अवस्था पहावत नाही. गंगानदीच्या प्रदूषणा बाबत विविध उपक्रमाद्वारे गंगाजल नेचर फाऊंडेशन जनसामान्यांचे प्रबोधन करीत आहे. जागतिक ‘नदी वर्ष २००८’ च्या औचित्याने घेतलेल्या दुस-या राष्ट्रीय   छायाचित्र व महितीपट स्पर्धेला देशातील अनेक राज्यांतून प्रतिसाद मिळाला.  या स्पर्धेतील पहील्या क्रमांकाचे पारितोषिक गुजरातच्या घनश्याम कहार यांना मिळाले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक २९ मार्च रोजी रचना संसद सभाग्रहात दुपरी ३ ते ६ दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन मँगसेसे पुरस्कारप्राप्त डाँ. राजेद्रं सिंह हे येणार आहेत.याच कार्यक्रमात, माहाराष्ट्रतील नद्यांच्या प्रदुषणा बाबत ‘लोकसत्ताच्या’ माध्यमाने आपल्या लेखनीद्वारे सर्वसामान्यांनसह प्रशासनला ही दखल घ्यवयास भाग पाडलेले अभिजित घोरपडे यानां त्यांच्या ‘मरणासन्न’ नद्यां उपक्र्मा बध्द्ल गंगाजल नेचर फाऊंडेशन, ‘नदी मित्र’ पुरस्काराने सन्मानित करणार आहे.

Comment Form

top