मुंबाईत बुधवारी रात्री झालेल्या थरारक दहशतवादी ह्ल्ल्यात दिडशेहून अधिक बळी गेले. ‘एन एस जी’ चे कमांडो संदिप उन्निक्रुष्णन आणि त्यांचे एक सहकारी कमांडो गजेंद्र सिंह हे ही हुतात्मा झाले. त्यातच होते तीन जिगरबाज ‘मुंबईकर’ पोलीस अधिकारी…. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि खंडणीविरोधी पथकाचे एन्कउंटर स्पेशालिस्ट विजय साळ्सकर. मुंबईकरांच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणाची बाजी लावणा-या मुंबई पोलीस दलातील या ‘मुंबईकर’ हिरोंना ‘गंगाजल नेचर फौंडेशन’चा विनम्र प्रणाम !
‘कर्तव्यकठोर’

अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झलेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख, पोलीस सहाअयूक्त हेमंत करकरे यांच्या म्रुत्युने केवळ महाराष्ट्र पोलीस दलातच नव्हे, तर भारतीय गुप्तचर यंत्रणेतही हळ्हळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत हुशार, धाडशी व सहका-यांना विश्वासात घेऊन काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. गुप्तचर यंत्रणेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन अलीकडेच त्यांच्याकडे ‘एटीएस’चे प्रमुख म्हणून पदभार सोपवला होता. मुळचे मंगलोरचे असलेले हेमंत करेकरे मेकँनिकल इंजिनीर होते. केंद्रीय प्रशासन सेवेची परीक्षा देऊन १९८४ मध्ये भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांची नेमणूक महाराष्ट्र पोलीस केडरमध्ये झाली. चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त विभागापसून ते अकोला, नांदेड, ठाणे येथे त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून केलेली कामगिरी लक्षणीय ठरली. मुंबईत गँगवाँरने हैदोस घातला होता, तेव्हा करकरे मुंबईच्या परिमंडळ ४ चे उपायुक्त होते. त्या वेळी या परिमंडळात येणा-या भायखळ्यापासून दादर,माटूंगा,परळ, अँण्टाँप हिलपर्यंतच्या परिसरात आरुण गवळी,अमर नाईक,पोत्या ठाकूर यांच्या कारवाया सूरू होत्या. करकरे यांनी या टोळ्यांवर नियत्रंण आणण्यात यश मिळवलं. करकरे यांच कौशल्य आणि धाडस पाहून त्यांना प्रतिनियुक्तीवर केंद्रात पाठवण्यात आले. तेथे ‘राँ’ या गुप्तचर संघटनेत त्यांची नेमणूक झाली. तीन वर्षांपूर्वी ते पुन्हा महाराष्ट्रात आले. काही काळ ते मुंबई पोलीसाच्या प्रशासन विभागाचे सहाअयुक्त होते. अलीकडेच त्यांची नियुक्ती ‘एटीएसचे’ प्रमुख म्हणून झाली होती. या काळात त्यांनी गुजरात येथे झालेल्या बाँम्बस्फोटातील आरोपींना पकडण्यात यश मिळ्वले होते. वादग्रस्त ठरलेल्या मालेगाव बाँम्बस्फोटाचा तपास अत्यंत संवेदनशील वळ्णावर असतानाच बुधवार २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत ते ‘शहीद’ झाले.
‘डेअरडेव्हिल’
पोलीस निरीक्षक पदावर आसतानाही पोलीस आयुक्तांपेक्षाही अधिक चर्चेत राहणारं नाव म्हणजे विजय साळसकर! विजय साळसकर या नावाची गुन्हेगारी विश्वात प्रचंड जरब होती. मुंबईतील रस्ते गुन्हेगारांच्या गोळीबाराने हादरले होते, गुन्हेगार सामान्य लोकांच्या रक्ताचे सडे पाडत होते. त्या काळात विजय साळसकर यांनी ‘सद्सरक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला जागून त्यांनी आपल्या बंदुकीचा चाप ओढला. २४ वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांनी ७८ गुंडांना यमसदनी धाडले. त्यांनी गुन्हेगारीच्या फांद्याच छाटल्या नाही, तर त्या टोळ्यांच्या मुळावरच घाव घातला. मुंबईतील व्यापा-यांना, व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडणा-या आमर नाईक याला ठार करून साळसकर यांनी संपूर्ण ‘बापट गँग’ मुळासकट उखडून फेकली. अरुण गवळीचे बिनीचे शिल्लेदार म्हणून ओळखले जाणारे विजय तांडेल,बंडया अरिवडेकर, गणेश भोसले तसेच दाऊद गँगचा साधू शेटटी अशा म्होरक्यांनच टिपून त्यांनी व्यापारी, व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना दिलासा दिला. माजी पोलीस महासंचालक अरविंद ईनामदार यांच्या तालमीत १९८३ साली तयार झालेल्या विजय साळ्गावकर यांच्या अकस्मित जाण्याने महाराष्ट्र पोलीस दलात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
‘जिगरबाज’
सहा फुटाच्याही वर जाणारी उंची, कमावलेली पिळदार शरीरसंपदा आणि गुन्हेगाराकडे नजर वळवून बघितल तरी त्याने गुन्हा कबुल करवा आशी जरब. परिस्थिती कितीही बिकट असो, अत्यंत थंड डोक्याने तिचा मुकाबला करतानाच गरज भासली तर चर्चेतून तोडगा काढणे ही अशोक कामटे यांची खासियत होती. भारतीय पोलीस सेवेतील १९८९ च्या बँचचे अत्यंत हुशार अधिकारी म्हणून अशोक कामटे यांचा पोलीस वर्तुळात दबदबा होता. कामटे बाँडीबिल्डर होते. जलतरणपटू होते. अँथलीट होते. नेमबाज होते. आणि वेटलिफ्टरही. आजोबांच्या काळापासूनच लष्कर आणि पोलिस सेवेची पार्श्वभूमी कामटे खानदानाला होती. कामटे ख-या अर्थाने गाजले ते आमदार रवी पाटील यांना त्यांनी सुतासारखं सरळ केल्यापसून. पाटील आमदार होते कर्नाटकातील इंडिचे, पण त्यांची व त्यांच्या भावाची दहशत सोलापूरात. कामटे सोलापूरमध्ये पोलिस आयुक्त आसताना इशारा देऊनही कामटे माझे काय वाकडं करणार, अशा गुर्मीत असलेल्या रवी पटील यांनी १० वाजल्यानंतर फटाके फोडण्याचा आचरटपणा केला आणि कामटे यांनी या पाटीलांची भररस्त्यात वरातच काढली. समोर आव्हान कोणतेही असो, जीवची बाजी लावून त्याचा मुकाबला करण्यास सदैव सज्ज असा जिगरबाज पोलिस अधिकारी म्हणजे अशोक कामटे, बुधवारी त्यांनी देह ठेवला तोही लढता लढताच.
भारतमातेच्या या विरपुत्रांना भावपुर्ण श्रध्दांजली !
जय हिंद ! जय भारत !
Bombs And Bullets Cannot Destroy India – As Long As
Its Gates Remain Open !
Whoever were the authors of this week’s terrorist attack in Mumbai, it was a vile act that will only serve reaction in India and internationally. Unquestionably the BJP will seize on the Mumbai atrocity and its horrific toll in human life to try to suppress public discussion of, and derail the investigation, into the Hindu terrorist network
Bombs And Bullets Cannot Destroy India – As Long As Its Gates Remain Open
By Shashi Tharoor
http://www.countercurrents.org/tharoor281108.htm
This atrocity was not homegrown. But if it leads to demonisation of the nation’s Muslims, the terrorists will have won
Once Was Mumbai
By Kumar Ketkar
http://www.countercurrents.org/ketkar281108.htm
Who Benefits From Mumbai Terror Attacks?
By Binu Mathew
http://www.countercurrents.org/mathew291108.htm
India’s 9/11. Who Was Behind The Mumbai Attacks?
By Michel Chossudovsky
http://www.countercurrents.org/chossudovsky011208.htm
Recent Comments