ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा वन्यप्राणी सप्ताह म्हणुन जगभर साजरा केला जातो. जंगलांच्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी शाळा व महाविद्यालयामध्ये परिसंवाद व व्याख्याने यातून विद्यार्थ्यानां प्रबोधनपर मार्गदर्शन केले जाते. स्वयंसेवी संस्थाही या कामी पुढाकार घेतात. समाजाच्या सगळ्याच थरातून अशा प्रकारच्या प्रबोधनाची अत्यंतीक गरज आहे. राजकिय पक्षाच्या फलकावर वाघ हा प्राणी अत्यंत निर्भयपणे वावरताना दिसला तरी एकूणच व्याघ्र जमातीवर प्राण संकट आल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. १९५२ साली भारतातून ‘चित्ता’ नामषेश झाला. वन्यप्राण्यांच्या वस्तीस्थानांवरच मानवी आक्रमण होत असल्याने वन्यप्राणीही मानवी वस्त्याच्या आसपास भटकताना आढऴतात त्यातूनच नरभक्षक होतात अथवा रहदारीवर येऊन अपघाताने मरण पावतात.
भारतीय राजघटनेमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नद्यां, सरोवरे, वने व त्यामधील निसर्गसाधन संपत्ती आणि वन्यप्राणी, पशूपक्षी, जलचरांचे रक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे असे म्ह्टले आहे.
हे फक्त सरकारचे काम आहे असे म्हणत सर्वसामान्यांनी आपली जबाबदारी टाळणे योय आहे का ?
Recent Comments