Monthly Archives: August 2008

भोपाऴ वायुगऴती दुर्घटना

जन्तर मन्तरच्या चौकात पदपथावर एका मोठया तंबूत बसलेल्या त्या  भोपाऴ वायुगऴती दुर्घटनेतील पीडीतानां आज कित्येक वर्षानंतरही,

 भोपळ दुर्घटनाग्रस्तांचा भोपाळ ते नवीदिल्ली मोर्चा.
भोपळ  वायु दुर्घटनाग्रस्तांचा भोपाळ ते नवीदिल्ली मोर्चा.

न्यायह्क्कासाठी भोपाऴ ते नवीदिल्ली असा पायी प्रवास करुन मोर्च्या आणावा लागतो ही खेदाची गोष्ट आहे. त्यांनी लावलेली छायचित्रेच सर्वकाही सांगत होती.  जमिनीतील विषाचा निचरा करा, पिण्यासाठी शुध्द पाणी द्या, युनियन कर्बाईड  (डाव केमिकल) कम्पनीवर कारवाई करा या  मागण्यांबरोबरच आपल्या देशाचे पंतप्रधान नेमके कोणाच्या बाजुने आहेत? असा प्रश्नही पीडीतांनी विचारला आहे.

थेट जमिनीवर आणणारं : ‘डाऊन टू अर्थ’

( ‘बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवद्याची’ या पुस्तकातून साभार. लेखक – अतुल देऊळगावकर)

भारतामध्ये पर्यावरण जपण्यासाठी १९९० च्या दशकापर्यंत अनेक चळवळी होऊ लागल्या. तरीही केवळ पर्यावरणास वाहिलेलं नियतकालिक निघत नव्हतं. स्टाँकहोम पर्यावरण परिषदेला वीस पूर्ण झाल्यानंतर १९९२ साली ब्राझीलच्या ‘ रियो द जानेरियो ‘ येथे जागतिक वसुंधरा परिषद भरणार होती. पर्यावरण समस्यांनी देशांच्या सीमा केव्हाच ओलांडल्या होत्या. अमेरिका व इतर धनाढ्य देशांनी केलेल्या प्रदूषणाचा ताप गरीब देशांना भोगावा लागतो, हे सिध्द झालं होतं. पर्यावरणाचे जागतिक प्रशासन हा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणात वारंवार येऊ लागला. ही माहिती सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचत नव्हती. मुख्य प्रवाहातील वॄत्तपत्रांमधून पर्यावरण प्रश्नांना मिळणारी जागा फारच तोकडी असायची. ही पोकळू भरुन काढण्यासाठी

 भोपळ वायु दुर्घटनेतील आपातग्रस्त बालक
भोपळ वायु दुर्घटनेतील आपातग्रस्त बालक

अनिल अग्रवालांनी ३१ मे १९९२ रोजी ‘डाऊन टू अर्थ’ या विज्ञान व पर्यावरणास वाहिलेल्या देशातील पहिल्या पाक्षिकाची सुरुवात केली. ‘माहितीचा स्फोट होत असताना माहितीच्या मार्केटमध्ये जागा बळकावण्याकरता हे नियतकालिक सुरु केलेलं नाहि. महत्त्वाची माहिती पोहोचवली जात नाहि व ही पोकळी भरुन काढण्याची आकांक्षा या नियतकालिकाची आहे. पहिल्या संपादकीयात अग्रवाल यांनी स्पष्ट केलं होतं.’मन लवून आपल्या सभोवतालचे आवाज ऐकले तरच खर शिक्षण घडतं. एरवी आपल्या कामांपर्यत न येणारा सभोवतालचा आवाज वाचकांपर्यंत पोहोचवायची आमची इच्छा आहे. त्यामुळे जगण्याचा तीव्र संघर्ष असतो ती गावं व वाडयांमधील वॄत्तांत दिले जातील. शेत, जंगल, कारखाने व प्रयोगशाळांमधील हकिकती वाचकांपर्यंत पोहोचवल्या जातील. आपले अर्थव्यवहार, राजकारण, बाजारपेठ यांच्याबद्दल माहिती असेलच. फक्त त्याकडे पाहताना विज्ञान व पर्यावरणाची दॄष्टी असेल. प्रचलित पत्रकरितेतून विशेष घटनांवर (इव्हेंट) लक्ष केंद्रित करण्याचा प्रघात असतो. त्या घटनांमागील प्रक्रिया उलगडून दाखवण्याला आम्ही प्राधान्य देऊ. दुष्काळाच्या करुण कहाण्यां-सोबतच, दुष्काळ कां व कसा येतो? हे आम्ही तपासून पाहू. मातीची धूप झाल्यानं वाळवंट कसं होत आहे व त्याचे परिणाम कसे भोगावे लागत आहेत, यावर प्रकाशझोत टाकण्यावर आमचा कटाक्ष राहील.’ हा अग्रवालांचा बाणा होता. तो ‘ डाऊ टू अर्थ ‘ नं आजही जपला आहे.

भोपळ वायु दुर्घटनेतील आपातग्रस्त बालक

चपखल मथळे, कल्पक अर्कचित्र, आकर्षक छायाचित्रं, समर्पक तक्ते व आकॄत्या यांमुळे ‘ डाऊ टू अर्थ ‘ नं गंभीर विषय अतिशय वाचनीय केले. कुठल्याही घटना समजावून सांगताना विज्ञानाचे विरहस्यीकरण (डीमिस्टिफिकेशन) करण्याचं त्यांचे कार्य अखंड चालू आहे. ‘ डाऊ टू अर्थ ‘ प्रस्तुत केलेले सखोल वॄत्तांत आणि धारदार विश्लेषण हा आदर्श पत्रकारितेचा कित्ता ठरला.

२ डिसेंबर १९७४ ला भोपाळच्या ‘युनियन कार्बाईड’ (‘एव्हरेडी’ ह विद्दुत घटनिर्मिती करणारा उद्योग) या कारखान्यामधील वायू गळतीनं संहार माजवला.’ डाऊ टू अर्थ ‘ त्याचा आजतागायत पाठपुरावा करत आहे.

कुणी रडावे, रड्वावे कुणी,
कुणी हसावे पिऊन वायू
कुणी दाबुनी जखम आजची
जरा उद्याचा काढावा पू…

भोपळ वायु दुर्घटनाग्रस्तांचा भोपाळ ते नवीदिल्ली मोर्चेक-यांच्या मागण्या.

भोपाळचे वायुग्रस्त गेली २१ वर्षं मर्ढेकरांची ही कविता शब्दश: जगत आहेत. २ डिसेंबर १९८४. रात्रपाळीचे कामगार कामाला लागून तासभर झाला. भोपाळच्या ‘युनियन कार्बाईड लिमिटेड’ या किटकनाशक कारखान्याच्या घड्याळानं दीडचा ठोका दिला. सुमन डे नेहमीप्रमाणे रसायानांच्या टाक्यांची पाहणी करु लागला. कुठून तरी वेगळाच आवाज ऎकू येत होता. हा आवाज नेहमीचा नव्हता. कुठं तरी बिघाड असल्याची ती खूण होती. सुमन डे आवाजाच्या दिशेनं निघाला. तो आवाज टाकीचा होता!  रसायनानी भरलेल्या टाकीच्या काँक्रिटच्या भिंती थडथडत आहेत, हे लक्षात आल्यावर त्या आवाजानं अक्षरश: त्याला कापरं भरलं. स्टेनलेस स्टीलच्या अवाढव्य टाक्यांतून मेथिल आयसिसायनेट या रसायनानं पाणी आणि इतर काही रसायनांवर जोरदार अभिक्रिया चालू केल्यामुळे टाकी हादरत होती. काँक्रिटसुद्धा तापल्याचं सुमन डेला जाणवलं आणि तो नखशिखान्त हादरुन गेला. बत्तीस वर्षाच्या डेच्या डोळ्यांसमोर काजवे दिसू लागले. त्याला दरदरुन घाम फुटला. जिवाच्या आकान्तानं उडी टाकून तो खाली आला. तेवढ्या क्षणांतच टाकीनं काँक्रिट फोडून टाकलं. जबरदस्त गडगडाटी आवाज झाला आणि ३१० नंबरची टाकी, तिच्यामध्ये साठवून ठेवलेला मेथिल आयसोसायनेट बाहेर ओकू लागला. टाकीतील वायुरुप राक्षस सैरावैरा पसरु लागला. काही सेकंदात ‘भोपाळनगरी’ या वायुच्या तावडीत सापडली.

धुरकट पांढ-या रंगाचा हा वायू हवेपेक्षा जड असल्यानं रात्रीच्या मंद झुळुकेच्या साथीनं हळुहळू पुढे सरकू लागला. त्याच्या तडाख्यात सापडणा-या प्रत्येक जिवाला निर्जीव करत निघाला. कारखान्यासमोर रस्त्यापलीकडे जयप्रकाशनगरची झोपडपट्टी होती. पुढे रेल्वे काँलनी, रेल्वे स्टेशन, काझी कँम्प, सिंधी काँलनी, हमीदिया रस्ता या भागांतील सगळ्या जिवांना गुदमरुन टाकत वायू पुढे जात गेला. इकडे ‘युनियन कार्बाइड’ कारखान्यात वायू थांबवन्यासाठी पणी टाकायची व्यावस्था पुरेशी नव्ह्ती. द्रवरुप मिथेल आयसोसायनेट वायुरुप होत होता. हे वायुरुप संहारक असल्याची जाणीव सुमन डेला होती. त्यानं टाकीवर पाणी ओतायचा प्रयत्न करुनही वायु बाहेर येतच  रहीला. कारखान्याचा एकुलता एक अग्निशमन बंब टाकीवर पाणी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न

    भोपळ वायु दुर्घटनेतील आपातग्रस्त बालक

भोपळ वायु दुर्घटनेतील आपातग्रस्त बालक

करत होता. तिकडे तमाम भोपळवाशीय घशाला कोरड पडल्यानं आणि डोळ्यामध्ये आग पडल्यानं हैराण होत जागे होऊ लागले. हे काय होतय ? क होतय ? कही सुचेना. करावे तरी काय ? कदाचित घरात काही गडबड असेल असं वाटून, ते घर सोडून रस्त्याकडे धावले. सैरावैरा पळत सुटले. कुणीतरी सांगितले ” विषारी वायू पसरलाय, आपण सगळे मरणार.” परत पळापळ सुरु झाली. घरातल्या सर्वानां जागे करुन लोक निघाले. होणारा त्रास चालूच होता. श्वास गुदमरतोय, घसा जळजळतोय, सगळीकडे खोकण्याचे आवाज ऐकू येत आहेत. मिळेल ते सामान, पोराबळानां घेऊन घ्रर सोडून कुटुबंच्या कुटुबं रस्त्यावरुन पळत सुटले. दिसेल ते वहान त्यानां मदत करत होत. कुणाला छातीत जळ्जळत होत होती. कुणी रक्ताच्या उलटया करीत होते. कुणी बेशुध्द पडलं तर कुणाला आंधारी आलीय. थोडयाच वेळात ‘भोपाळ’ शहरभर म्रुत्युचं थैमान माजलं.

या घटनेला ३ डिसेंबर १९९४ ला दहा ववर्षे झाली. त्या वेळी मी भोपाळल गेलो होतो. ‘भोजराजाची भोपळनगरी’ भिंतिपत्रक, फलकांवी भरुन गेली होती.म्रुत्युछायेत गेलेल्या कळयाकुट्ट् दशकाची कैफियत शहाजहान उद्यानात मांडली होती. दहा वर्षांपुर्वी वायुगळतीच्या पहिल्या पंधरा दिवसात ‘विषारी वायुमुळे’ २८५० लोकानां प्राण गमवावे लागले होते तर १०,००० वायुग्रस्तांनी उपचार घेतले होते. सपुर्ण शहाजहान उद्यान अशा फलकंनी भरुन गेलं होत. पाहणारे सुन्न होत होते. वायुगळ्ती होऊन लोटली तरी पुढील दहावर्षें दररोज सरासरी तीन बळी जातच होते. भोपाळमधे ‘युनियन कर्बाइड’नं, हिरोशिमा-नगासाकीच्या सारखा चाळीस वर्षांनंतर अगदी तसाच उच्छेद मांडला होता. त्या युनियन कर्बाइड कारखान्या पासून दहा फुटी भिंतीपलीकडच्या जयप्रकाशनगर झोपडपट्टीत घराघरातून हातावर पोट असणारी असंख्य निरपराध आयुष्यं उद्ध्वस्त झाली आहेत. मिथेल आयसोसायनेटचा परिणाम होऊन सईदाबीची फुपसं जवळपास निकामी झाली आहेत. सतत खोकून खोकून त्यांना बोलतासुध्दा येत नाही. ब-याच वेळा घशातून रक्त पडतं. सईदाबीचा भाऊ मुन्नेखान आतडयाच्या कँन्सरने गेला. सईदाबीची मोठी बहीन नसीमला ब्रेस्ट कँन्सरने ग्रासल आहे. ती यातनांमधून सूटका होण्याची वाट पाहतेय. अनिसची छोटी बहीन तीन वर्षांची झुबेदा काळी-नीळी पडून वारली. “डाँक्टर लोग मुफ्त में कुछ भी नही देते. बहोत पैसा लेते है” शिवणकाम करून घर चालवणारी अवीसा सांगते. आई आणि बहिणीच्या उपचारासाठी महिण्याला १५०० ते २००० रुपये जातात. म्रुतांच्या नातेवाईकांना मिळणारी सरकारी भरपाई तिला अजून मिळालेली नाही. सरकार देत आसलेल्या दरमहा दोनशे रुपयांच्या मदतीतून तिचं आणि आई बहिणीचं होणार तरी काय ?

कित्येक जण दरवर्षी वायू दुर्घटनेच्या  ‘श्राध्दाला’ आठवणीनं अनाथ मुलांना भेटायला येतात. वर्तमानपत्रात झाळकण्यासाठी छायचित्रकार आवर्जून आणतात. चेहरा कँमेराकडे आणि हात अनाथ मुलांकडे, असे मदतीचे फोटो छापून आणतात. दुर्घटनेच्यावेळी सदानंद एक वर्षाचा होता. तो आता सोळा वर्षांचा झालाय. त्याच्या सोबत आकरा वर्षांची बहीन अनिताही आहे.दहा वर्षांपूर्वी त्याचे आई-वडिल त्याच्या समोर वारले एवढंच त्याला आठवतंय.कितीही बोललं तरी तो काहीही बोलत नाही. जेमतेम उत्तरं देतो. खेळायच्या-बागडायच्या वयातला छोटा सदानंद,इवल्याशा खांद्यावर मणामणांच ओझ घेऊन वावरतोय. बालपण संपून अकाली प्रौढत्व आल्यच्या खूणा त्याच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत आहेत. नातेवाइकांनी येणं कधीच सोडून् दिलय. शासनानं घर दिलय, दरवर्षी या दिवसी नेते आम्हांला भेटायला येतात एवढीच माहिती त्याच्या कडून मिळू शकते.

पंधरा वर्षांची रेश्मा तिच्या आत्याकडे राहतेय. तिला चार भाऊ असूनही तिच्याकडे कुणीही फिरकत नाही. तिची बहीन लाली, चौदाव्या वर्षीच लग्न करून पाकिस्थानात निघून गेली. पुढे पालीनंही वय नसताना इतरांवर बोजा न टाकण्यासाठी तोच कित्ता गिरवला. आईच्या म्रुत्यूनंतर नुकसान भरपाईचे एक लाख रुपये आले. त्यायून रेश्माच्या वाटयाला केवळ चाळीस हजार रूपये ! त्यावर दरमहा तीनशे रुपये व्याज मिळतं. ते ती आत्याकडे सोपवते. या वर्षी नववीत तीलाही शाळा सोडावी लागणार आहे. पालीला झालेल्या दोन्ही मुली मूक-बधिर आहेत्. दहा वर्षांपुर्वी प्यायलेल्या वायूचे हे परिणाम ! तो वायू अजुनही उमलणा-या जिवांचे वाईट हाल करतोय !

“अनाथ बालकानं घर देणार” यांसारख्या सरकारी घोषणांचीही शतकपूर्ती झाली. घर बांधली गेली आहेत. आतापर्यंत फक्त तिघांनाच घरं मिळू शकलीत. रेहना, शाहीदा संतापून सांगतात. दहा वर्षांपूर्वी झालेल्या वायू संपर्काची दहशत अजूनही अबाधित आहे. कधीही, कोणालाही गंभीर रोग गठू शकतो, कोणाचाही म्रुत्यू होऊ शकतो आणि उरलेल्या आयुष्यात दवाखाने, कोर्टबज्या करण्याची वेळ या चिमुकल्यांवर आलीय.
‘युनियन कर्बाइड’च गालिच्छ तंडव अजुनही चालूच आहे.